लग्नाच्या मेहेंदीत श्वानाचं चित्र; मंगलाष्टकेतही खास उल्लेख; त्याला कुत्रा म्हटलेलंही आवडत नाही .. पूजा बिरारीचं डॉग कनेक्शन काय?
पूजाने तिच्या मेहंदीच्या कार्यक्रमात हातावर कुत्र्याचं चित्र रेखाटल्यानं चाहत्यांमध्ये हे नेमकं काय कनेक्शन आहे ? याची उत्सुकता होती.

Puja Birari Soham Bandekar Wedding Dog: अभिनेते आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर (Soham Bandekar) याचं नुकतच लग्न झालं. अभिनेत्री पूजा बिरारीसोबत (Puja Birari) त्यानं लग्न केलं. सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नांच्या फोटोने आणि व्हिडिओची सध्या एकच चर्चा आहे. सोहम आणि पूजाचे लग्नापूर्वीचे विधीही सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. दिमाखात पार पडलेल्या या सोहळ्याला चाहत्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला. पण पूजाच्या मेहंदीच्या कार्यक्रमातील एका फोटोमुळे ती चर्चेचा विषय बनली आहे.
मेहेंदीवर असलेल्या श्वानाचं चित्र कोणाचं?
एरवी कुठल्याही नवरीच्या हातावर दुल्हन- दुल्हन असलेली मेहंदी असते. पण अभिनेत्रीने आपल्या हातावर एका कुत्र्याचे चित्र रेखाटलं होतं. त्यामुळे चाहत्यांना प्रश्न पडला होता की पूजा बिरारीच्या लग्नाच्या मेहंदीवर असलेल्या श्वानाचा नेमका संबंध काय? याचा आता खुलासा झालाय. पूजाच्या हातावर रेखाटलेलं कुत्र्याचं चित्र हे बांदेकरांच्या घरात असणाऱ्या सिंबाचं आहे. सिंबाला जेव्हा घरी आणलं होतं तेव्हा सोहम सुद्धा खूप लहान होता. आता सिंबा 17 वर्षांचा आहे. घरी कधी सिंबा सोहमच्या बेडवर झोपला असेल तर सोहम खाली अंथरूण घालून जमिनीवर झोपतो इतकं घट्ट नातं त्या दोघांमध्ये आहे. सिंबा सोहमचा अत्यंत लाडका आहे, त्यामुळे पूजाला सुद्धा त्याचा खूप लळा लागलाय.
पूजा आणि सोहम बांदेकर यांचा नुकताच लग्न सोहळा पार पडला. खरंतर या दोघांच्याही लग्नाच्या बातमीमुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण त्यांच्या नात्याबद्दल दोघांनीही कधीच उघडपणे सांगितलं नव्हतं. पूजाने दिवाळीच्या एका पोस्टमध्ये काही फोटो शेअर केले होते ज्यावर सोहमने हार्ट इमोजी शेअर केल्याने त्यांच्या नात्याच्या चर्चा होत्या. पण त्यांनी तेव्हा उघडपणे कबुली दिली नव्हती. सेटवर पूजाने केळवण्याच्या वेळी सोहमच्या नावाचा उखाणा घेतला तेव्हा पहिल्यांदा या दोघांचं नातं जगजाहीर झालं. सध्या पूजाने तिच्या मेहंदीच्या कार्यक्रमात हातावर कुत्र्याचं चित्र रेखाटल्यानं चाहत्यांमध्ये हे नेमकं काय कनेक्शन आहे? याची उत्सुकता होती.
बांदेकरांच्या घरात सिम्बा आला कसा?
एका जुन्या मुलाखतीमध्ये अभिनेते आदेश बांदेकर यांनी सिम्बाविषयी सांगितलं होतं. "पूर्वी मला कुत्र्यांची प्रचंड भीती वाटायची. ज्या घरांमध्ये कुत्रा असेल त्या घरांमध्ये होम मिनिस्टर कार्यक्रमाचे शूटिंगसुद्धा करायला मी घाबरायचो. पण अचानक एके दिवशी माझ्या मित्राने कुत्र्याचं पिल्लू मला गिफ्ट केलं. त्याचं करायचं काय हे मला कळेना. मी सुचित्राला जेव्हा त्या कुत्र्याच्या पिल्ला बद्दल सांगितलं तेव्हा ती मला म्हणाली की तू आणि ते पिल्लू दोघेही घरी येऊ नका. पण जेव्हा मी त्या पिलाला रात्री घरी घेऊन आलो तेव्हा सुचित्राने अगदी मायेनं त्याचा औक्षण करत स्वागत केलं होतं. नंतर त्याने आम्हाला इतका लळा लावला की त्याला कोणी कुत्रा म्हटलेलं सुद्धा मला आवडत नाही. त्याच्या सर्टिफिकेटवर सुद्धा सिम्बा आदेश बांदेकर असं नाव आहे. तुमच्या घरातील एक सदस्यच आहे.
सिंबा आता 17 वर्षांचा आहे. खूप वय झाला असल्याने आता त्याला चालता येत नाही पण तो कायम सोहम सोबत असतो. राजश्री मराठी ला दिलेल्या एका मुलाखतीत आदेश बांदेकर यांनी सांगितलं होतं की सिंबाला घरी आणलं तेव्हा सोहमही खूप लहान होता. त्यांच्या तितकी घट्ट मैत्री आहे की जर कधी सिंबासोहमचा बेडवर झोपला असेल तर सोहम खाली अंथरूण घालून जमिनीवर झोपतो. सिंबाला आम्ही कधीच काही कमी पडू नये याची काळजी घेतो. सोहमने आपल्या लग्नात सिंबाला सुधारणायचंच हे ठरवलेलं होतं. त्यामुळे त्याच्यासाठी खास गाडी करून आम्ही त्याला लग्नात आणलं. बऱ्याचदा माणसांनाही जे कळत नाही ते मुक्या जनावरांना कळतं. त्यामुळे सिंबा आमच्यासाठी फार खास आहे. हीच आपुलकी पूजालाही सिंबासाठी वाटते. तिचेही सिम्बावर खूप प्रेम आहे त्यामुळे तिने तिच्या लग्नाच्या मेहंदीवर सिंबाचं चित्र रेखाटलं होतं. केवळ मेहंदीवरच नाही तर सोहमच्या आणि पूजाच्या लग्नात मंगलाष्टकेमध्येही सिंबाचा उल्लेख केला होता.























