Zol Zaal : निर्मात्याचं अभिनय क्षेत्रात पाऊल! ‘झोलझाल’ चित्रपटतून अभिनेता अमोल कागणे प्रेक्षकांच्या भेटीला
Amol Kagane : मेडिकलचा विद्यार्थी असलेला अमोल फावल्या वेळात मनोरंजनासाठी नाटकं करू लागला आणि त्यातूनच त्याला करिअरची अचूक दिशा गवसली.
Amol Kagane : 'हलाल', 'भोंगा', 'बेफाम', 'वाजवूया बँड बाजा', 'लेथ जोशी' यांसारख्या दर्जेदार चित्रपटांच्या निर्मितीनंतर अमोल कागणेने 'बाबो' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले असून, येत्या 1 जुलैला पुन्हा एकदा तो नव्याकोऱ्या आणि हास्यांची मैफिल घेऊन 'झोलझाल' (Zol Zaal) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. पदार्पणातच एक ना अनेक पारितोषिकं पटकावणारा हा तरुण निर्माता, अभिनेता म्हणजे एक अजब रसायनच आहे. हा मेडिकलचा विद्यार्थी आपल्या फावल्या वेळात मनोरंजनासाठी नाटकं करू लागला आणि त्यातूनच अमोलला त्याच्या करिअरची अचूक दिशा गवसली.
नेहमी बॅक ऑफ द कॅमेरा रमणारा अमोल सध्या फ्रंट कॅमेरा एन्जॉय करतोय. 'झोलझाल' या चित्रपटात अमोलला पाहणे रंजक ठरणार आहे. 'झोलझाल' या चित्रपटात अमोल ‘जय’ या पात्राची भूमिका साकारत आहे. जय आणि वीरूची ही गोष्ट आहे. जय हा वीरूचा मोठा भाऊ असून, तो त्याच्या प्रत्येक गोष्टीत वीरूला सहभागी करतो. चित्रपटातील प्रत्येक सिन हा कॉमेडी आहे. चित्रपटात जशा घटना घडत जातात, तसे विनोदाचे पदर उघडत जातात.
दिग्गज कलाकारांसोबत शेअर केली स्क्रीन!
अमोलने पहिल्यांदाच या चित्रपटातून विनोदी भूमिका साकारली आहे, याआधी अमोलने गंभीर भूमिकांमध्ये किंवा आशयघन कथांमध्ये काम केले आहे. अमोल उत्कृष्ट निर्माता तर आहेच, मात्र तो एक उत्तम अभिनेता देखील आहे. पुन्हा एकदा अभिनयाचा प्रवास त्याने सुरु केला असून, लवकरच तो 'झोलझाल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मल्टीस्टारर 'झोलझाल' या चित्रपटात बऱ्याच दिग्गज कलाकारांनी काम केलंय.
या चित्रपटात काम करण्याचा मोठा ब्रेक त्याला चित्रपटाचे निर्माते गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता यांनी दिला असून दिग्दर्शक मानस कुमार दास यांनी सेटवर खूपच सांभाळून घेतलं. 'युक्ती इंटरनॅशनल प्रॉडक्शन' निर्मित आणि 'अमोल कागणे स्टुडिओ' आणि 'रोलिंगडाईस' प्रस्तुत हा चित्रपट अमोलसाठी कायमच अविस्मरणीय असेल यांत शंकाच नाही.
विनोदी अभिनेता साकारणं खरंच खूप अवघड!
एकूणच या चित्रपटाच्या अनुभवाबद्दल अमोल म्हणाला की, 'एक विनोदी अभिनेता साकारणं खरंच खूप अवघड गोष्ट आहे आणि मी विनोदी अभिनेता म्हणून प्रेक्षकांसमोर येतोय ही माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. 'झोलझाल' हा चित्रपट मल्टीस्टारर असल्याने यांत मनोज जोशी, मंगेश देसाई, उदय टिकेकर यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याचा माझा अनुभव खूपच चांगला होता. इतके अनुभवी कलाकार असूनही त्यांनी कधीही सेटवर त्यांच्या अनुभवाचा बोलबाला न करता आम्हाला सांभाळून घेतलं आणि त्यामुळे आमच्यावरील दडपणही कमी झालं. शिवाय चित्रपटाचा दिग्दर्शक मानस कुमार दास हा गमतीशीर आणि कॉमेडी असल्याने त्याने हसण्यातच आमच्याकडून सर्व सीन करून घेतले.’ येत्या 1 जुलैला 'झोलझाल' हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून या चित्रपटात तब्ब्ल 22 कलाकारांनी मिळून काय झोल केलाय, हे लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा :
Zol Zaal : रसिकांना मिळणार हास्याची नवी मेजवानी, 'झोलझाल' चित्रपटाची धमाकेदार गाणी रिलीज!
Zol Zaal : मल्टीस्टारर 'झोलझाल' सिनेमाचे पोस्टर आऊट; 1 जुलैला सिनेमा होणार प्रदर्शित