VIDEO : भर पावसात प्रिया वॉरियरचा तुफान डान्स, मनमोहक अदांनी नेटकऱ्यांची मने जिंकली
Priya varrier dance video : भर पावसात प्रिया वॉरियरचा तुफान डान्स, मनमोहक अदांनी नेटकऱ्यांची मने जिंकली

Priya varrier dance video : अभिनेत्री प्रिया वॉरियर (Priya varrier dance video) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘Ente Thenkasi’ या गाण्यावर तिने तुफान डान्स केलाय. यावेळी तिने क्रीम कलरची साडी नेसली असून तिचा डान्स व्हिडीओ (Priya varrier dance video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. प्रियाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला असून काही तासांतच लाखो लोकांनी तो पाहिला आहे. तिच्या या डान्सला (Priya varrier dance video) नेटकऱ्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. चाहत्यांनी तिच्या अदा, तिच्या स्माईल आणि लूकवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. कमेंट बॉक्समध्ये फॅन्सनी “क्वीन ऑफ एक्स्प्रेशन्स”, “ गॉर्जियस लूक” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
View this post on Instagram
एका व्हिडीओमुळे प्रिया वॉरियर देशात फेमस
प्रिया वॉरियरने 2018 साली ‘ओरु अडार लव्ह’ या मल्याळम चित्रपटातून पदार्पण केले होते. या चित्रपटातील एका गोड ‘विंक सीन’मुळे ती रातोरात स्टार झाली. तिचा तो छोटासा क्लिप व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की ती ‘विंक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झाली. त्या एकाच सीनमुळे प्रिया वॉरियरला संपूर्ण देशभरात लोकप्रियता मिळाली. तिच्या या लोकप्रियतेचा फायदा तिला बॉलिवूडमध्येही मिळाला आणि तिने श्रीदेवी बंगलो व लव्ह हॅकर्स सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.
चित्रपटांसोबतच प्रिया सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. तिच्या इन्स्टाग्रामवर लाखोंच्या संख्येने फॉलोअर्स आहेत. फॅशन, डान्स आणि तिच्या एक्स्प्रेशन्समुळे ती नेहमी चर्चेत राहते. नुकत्याच व्हायरल झालेल्या या डान्स व्हिडीओमुळे पुन्हा एकदा तिची लोकप्रियता किती मोठी आहे हे सिद्ध झाले आहे. प्रिया वॉरियर सध्या साऊथ इंडस्ट्रीत आपली ओळख अधिक मजबूत करण्यासाठी काम करत आहे. तिच्या प्रत्येक लूकला, फोटोशूटला आणि डान्स व्हिडीओला चाहत्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतो. तिचा Ente Thenkasi वरील डान्स हा त्याचाच एक नवा पुरावा आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या























