Marathi actress Priya Marathe: 'या सुखानो या' म्हणत टीव्ही पडद्यावर आली अन् मराठीसह हिंदीमध्येही चमकली
'या सुखानो या' मालिकेच्या माध्यमातून टीव्ही पडद्यावर आलेल्या प्रिया मराठेनं अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला. तिने मराठीसह हिंदी मालिकांमधूनही आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली.

Marathi actress Priya Marathe: गेल्या वीस वर्षांपासून टीव्ही मालिकांमधून टीव्हीचा छोटा पडदा गाजवणारी हरहुन्नरी प्रतिभावान मराठी अभिनेत्री प्रिया मराठेची (Marathi actress Priya Marathe) अखेर कॅन्सरशी (Priya Marathe cancer) सुरु असलेली झुंज थांबली आहे. प्रिया मराठेचं आज (1 ऑगस्ट) मुंबईमध्ये मीरा रोडवरील राहत्या घरी निधन झालं. अवघ्या 38 व्या वर्षी जगाचा निरोप घेतल्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सन्नाटा पसरला आहे.
प्रिया मराठेला तीन वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान
प्रिया मराठेला तीन वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झालं होतं. तेव्हापासून प्रिया मराठेचा कर्करोगाशी संघर्ष सुरू होता. मात्र शरीर उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने तिची प्रकृती ढासळत गेली. तिच्या जाण्याने मराठी मालिका क्षेत्रांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे. 'या सुखानो या' मालिकेच्या माध्यमातून टीव्ही पडद्यावर आलेल्या प्रिया मराठेनं अनेक मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमठवला. तिने मराठीसह हिंदी मालिकांमधूनही आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. त्यामुळे अनेक मालिकांमधील भूमिका चाहत्यांच्या स्मरणात राहिल्या.
या सुखानो या' या मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण
प्रिया मराठेने 'या सुखानो या' या मालिकेतून ( Marathi television actress) टेलिव्हिजनवर पदार्पण केले आणि त्यानंतर ती 'चार दिवस सासुचे'या मालिकेसह इतर अनेक मराठी मालिकांमध्ये दिसली. तिचा हिंदी मालिकेत 'कसम से' हा पहिला चित्रपट होता जिथे तिने विद्या बालीची भूमिका केली आणि शेवटी कॉमेडी सर्कसच्या एका सीझनमध्येही ती दिसली. तिने 'पवित्र रिश्ता' या मालिकेत वर्षाची भूमिका केली. 'बडे अच्छे लगते हैं' या मालिकेत ज्योती मल्होत्राची भूमिका केली.
नकारात्मक भूमिकेतही काम
तिने 'तू तिथे मी' या मराठी मालिकेत प्रिया मोहितेच्या नकारात्मक भूमिकेतही काम केले. फेब्रुवारी 2017 मध्ये, ती स्टार प्लसवरील ' साथ निभाना साथिया' या मालिकेत सामील झाली. तिने या मालिकेत भवानी राठोडची भूमिका केली होती, जी एक दुष्ट स्वभावाची स्त्री होती जिने तिच्या पतीची हत्या केली होती. प्रिया मराठेनं तिचा दीर्घकाळचा मित्र, अभिनेता श्रीकांत मोघे यांचा मुलगा शंतनू मोघेशी 24 एप्रिल 2012 रोजी विवाह केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या























