Priya Bapat Umesh Kamat Love Story: 'घरच्यांनी लग्नाला होकार दिला नसता, तर आम्ही...'; उमेश आणि प्रियानं ठरवूनच ठेवलेलं, मुलाखतीत बोलताना सगळंच सांगितलं
Priya Bapat Umesh Kamat Love Story: सेलिब्रिटी आणि त्यांच्या लव्हस्टोरी ऐकण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. उमेश कामत आणि प्रिया बापटचं लग्न 2011 मध्ये दसऱ्याच्या दिवशी झालं.

Priya Bapat Umesh Kamat Love Story: मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film Industry) प्रसिद्ध सेलिब्रिटी कपल उमेश कामत (Umesh Kamat) आणि प्रिया बापट (Priya Bapat) नेहमीच चर्चेत असतं. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. तसेच, दोघांना एकत्र पडद्यावर पाहायलाही प्रेक्षकांना खूप आवडतं. लवकरच प्रिया आणि उमेश यांचा नवाकोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या निमित्तानं दोघांनी नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना उमेश आणि प्रियानं त्यांच्या लग्नाच्या वेळी काय-काय घडलेलं? सगळं सांगितलं आहे.
सेलिब्रिटी आणि त्यांच्या लव्हस्टोरी ऐकण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. उमेश कामत आणि प्रिया बापटचं लग्न 2011 मध्ये दसऱ्याच्या दिवशी झालं. त्यापूर्वी अनेक वर्ष दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. रिलेशनशिपच्या सुरुवातीच्या काळात दोघांनी आपलं नात लपवून ठेवलेलं. अशातच 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना उमेश आणि प्रियानं मोठा खुलासा केला आहे. जर, घरच्यांनी त्यांच्या नात्याला परवानगी दिली नसती, तर ते काय करणार होते? याबाबत दोघांनी खुलासा केला आहे.
'लोकमत फिल्मी'च्या मुलाखतीत उमेश आणि प्रियाला आता जसं नात्याला तपासून पाहिलं जातं. आता अनेक जण लिव्ह-इनमध्ये राहतात, लग्नाआधी एकत्र राहून पाहतात. आता नात्याच्या व्याख्या बदलत आहेत. लग्न करण्यापुर्वी वेळ घेतला जातोय. जेव्हा तुम्ही प्रेमात पडलात, तेव्हा तेव्हाचा काळ कसा होता? असा प्रश्न विचारण्यात आला.
View this post on Instagram
उमेश आणि प्रियानं लग्न करण्याचा निर्णय केव्हा घेतला?
प्रश्नाचं उत्तर देताना प्रिया बापट म्हणाली की, "आम्ही काही प्रेमात पडलो आणि लगेच दोन दिवसात लग्न केलं असं नाही. लग्नीपूर्वी आम्ही 7-8 वर्षं एकत्र होतो. फक्त आम्ही लिव्ह-इनमध्ये राहात नव्हतो. पण, आम्ही वेळ घेतला होता..." यावरच पुढे बोलताना उमेश कामत म्हणाला की, "पटकण ठरवलं आणि लग्न केलं असं काही नव्हतं. आम्ही घरी सांगण्यासाठीसुद्धा वेळ घेतला होता. मैत्री होणं, मग मैत्रीतून एकमेकांना आवडणं, तर खरंच तसं आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठीसुद्धा वेळ घेतला. पण त्यावेळी आधी लिव्ह-इनमध्ये राहून बघूयात का? मग लग्न करू हे पर्याय आमच्या डोक्यात कधीच आले नाही..."
जर घरच्यांनी परवानगी दिली नसती तर काय करणार होते उमेश-प्रिया?
लग्नाबाबत बोलताना उमेश म्हणाला की, "तेव्हा आमच्या मनात असेच विचार होते की, लग्न करायचं... उलट आम्ही असं ठरवलेलं की, जर घरच्यांनी परवानगी नाही दिली आपल्या नात्याला... तर एकवेळ कुणाशीच लग्न करणार नाही... पण, त्यांच्या मनाविरुद्ध किंवा पळून जाऊन वगैरे काही करायचं नाही, हा विचार आमचा होता. आई वडिलांना दुखवायचं नाही, हे आमच्या मनात होतं. बाकी आम्ही वेळ घेतला. जर त्यावेळी आम्हाला जाणवलं असतं की, आमची मतं, किंवा काही महत्त्वाच्या गोष्टींमध्येच साम्य नाहीये, तर कादाचित आम्ही पुढे गेलो नसतो..."
दरम्यान, नात्यांचा गुंता, प्रेमाची गोडी आणि थोडीशी नोकझोक… हे सगळं सांगणारी प्रिया बापट आणि उमेश कामत यांची 'बिन लग्नाची गोष्ट' 12 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात उमेश आणि प्रियासोबतच निवेदिता सराफ आणि गिरीश ओकसुद्धा दिसणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























