Priya Bapat : 'रात जवान हैं', प्रिया बापट पुन्हा एकदा करणार ओटीटीवर धमाका, 'या' कलाकारांसोबत झळकणार नव्या भूमिकेत
Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापट हीने नुकतच तिच्या नव्या कामाविषयी माहिती दिली आहे. दरम्यान प्रिया बापट पुन्हा एकदा ओटीटीसाठी सज्ज झाली आहे.
Priya Bapat New Project : अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही तिच्या कामामुळे प्रेक्षकांच्या कायमच पसंतीस उतरली आहे. प्रियाने हिंदी, मराठीमध्ये मोठ्या पडद्यासह ओटीटी माध्यमांवरही तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सिटी ऑफ ड्रीम्स (City Of Dreams) या वेब वेबशोमधून ओटीटीवर पाऊल ठेवलं. तिच्या पोर्णिमा गायकवाड या भूमिकेलाही बरीच पसंती मिळाली. तसेच आता प्रियाने तिच्या नव्या ओटीटी शोविषयी सोशल मीडियावरुन माहिती दिली आहे.
प्रिया बापट या रात जवान हैं या वेबशोमध्ये झळकणार आहे. तिच्या या वेबशोच्या शुटींगला सुरुवात झाल्याचं तिनं सांगितलंय. यामिनी पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित आणि प्रतिभावान सुमीत व्यास यांनी या वेबशोचे दिग्दर्शन केलं आहे. या वेबशोमध्ये प्रियासोबत 'इस प्यार को क्या नाम दूँ' आणि असूर या वेबशोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला वरुण सोबती आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली अंजील आनंद यामध्ये असणार आहे.
View this post on Instagram
प्रियाचा अभिनयाचा प्रवास
प्रिया बापटने आतापर्यंत अनेक मालिकांमधून तसेच नाटक आणि वेब वेबशोमध्ये काम केलं आहे. वजनदार, टाइमपास 2,आंधळी कोशिंबीर, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तसेच तिने लगे राहो मुन्ना भाई आणि मुन्ना भाई एम.बी.बी.एस हिंदी चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तसेच आता ती रात जवान हैं या वेबशोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
रात जवान है' हा रोमँटिक कॉमेडी शो असणार आहे. 'परमनंट रुममेट्स' फेम सुमित व्यासने या वेब शोचं दिग्दर्शन केलं आहे. या शोविषयी बोलताना सुमित व्यासनं म्हटलं की, लोकांना वाटतं आईवडील झाल्यानंतर तुमचं तारुण्य संपतं, पण आम्ही या शोमधून तोच गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढे बोलताना त्यानं म्हटलं की, ही तीन मित्रांची गोष्ट आहे. लग्न आणि मुलं झाल्यानंतरही हे तिघेजण वेळ काढून एकमेकांना भेटतात आणि मैत्रीतला वेडेपणा जपतात.