एक्स्प्लोर

Sigham Again : 'सिंघम अगेन' लिहिणाऱ्या मराठी लेखकाचं अभिनेत्याने केलं कौतुक, म्हणाला, 'डायलॅागबाजी नाही तर नितीमत्तेचे संदेश...'

Sigham Again : सिंघम अगेनची कथा मराठी लेखक क्षितीज पटवर्धन याने लिहीली असून त्याच्यासाठी एका मराठी अभिनेत्याने खास पोस्ट केली आहे.

Sigham Again : बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'सिंघम अगेन' (Singham Again) हा सिनेमा सध्या बराच चर्चेत आहे. सिनेमाची कथा, गाणी, अॅक्शन आणि आशय या सगळ्यामुळे बॉक्स ऑफिसवरही सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं चित्र आहे. तसेच आता या सिनेमाची कथा लिहिणाऱ्या मराठी लेखकाचंही बरंच कौतुक केलं जातंय. क्षितीज पटवर्धनने (Kshitij Patwardhan) सिंघम अगेनची कथी लिहिली आहे. त्याच्यासाठी अभिनेता पृथ्वीक प्रतापने (Prithvik Pratap) सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. 

क्षितीजच्या लेखणीचं पृथ्वीकने या पोस्टमध्ये कौतुक केलं आहे. तसेच त्याने ज्याप्रकारे या ही कथा गुंफली आहे, त्यावरही भाष्य पृथ्वीकने केलं आहे. चित्रपटसृष्टीची निर्मिती असो वा तिचं पुनरुत्थान ‘मराठी माणूस’ हवाचं, असं म्हणत क्षितीजच्या कामाविषयी पृथ्वीक व्यक्त झाला आहे. यावर कलाकारांनीही कमेंट्स करत कौतुक केलं आहे. 

पृथ्वीकची पोस्ट नेमकी काय?

पृथ्वीकने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं की, काल सिंघम सिनेमा पाहिला. खूप दिवसांनी बॉलिवूडने तयार केलेला mass entertainment cinema एंजॉय केला. लेखकांसाठी साधारण  2 ते 2.30 मिनिटं वाजलेल्या टाळ्या आणि स्टँडिंग ओव्हेशन प्रेक्षकांच्या मनात काय आहे हे सांगत होत्या.लहानपणी सगळ्यांनीच दूरदर्शन वर रामायण पाहिलयं, अनेक वर्षे ते आपण वाचत आलोय, ऐकत आलोय, पाहत आलोय. त्यामुळे या महाकाव्याची संपूर्ण गोष्ट सगळ्यांना तोंडपाठ असणं स्वाभाविकच आहे.याच पवित्र महाकाव्या भोवती सिंघम सिनेमा बागडत राहतो.

पुढे त्याने म्हटलं की,सिनेमात फक्त ॲक्शन नाही तर कलियुगात सुद्धा श्री रामांची तत्व जपणारा एक नायक आहे, जो आपल्याला ही श्री रामांचा मार्ग पत्करायला प्रवृत्त करत असतो. फक्त डायलॅागबाजी नाही तर नितीमत्तेचे संदेश आहेत. फक्त रंजन नाही तर एक दिशा आहे आयुष्य जगण्याची आणि हे सगळं कथेत, कथेभोवती गुंफण्याचं काम क्षितीज पटवर्धन याने केलेलं आहे.सिनेमा इतक्या कमालीच्या वेगाने स्क्रीनवर आणि मनावर पकड घेतो की, आपल्याला दाद द्यायला ही उसंत मिळत नाही. सिनेमाचा शेवट काय होणार आहे आपल्याला माहिती असतं पण तरीही तो पाहण्याची उत्सुकता कमी होतं नाही आणि इथेच हा सिनेमा मनं जिंकतो.

धोनी सिनेमाच्या शेवटी MSD वर्ल्डकप विनिंग सिक्सर मारणार हे माहित असूनही उत्कंठा वाढते की नाही? अगदी तसंच सिंघम बाबतही होतं. त्यामुळे ज्यांना सिनेमे एंजॅाय करायला आवडतात त्यांनी हा सिनेमा OTT वर येण्याची वाट पाहू नका. सरळ तिकीटं बुक करा आणि सिनेमागृहात पाहा. ही पोस्ट लिहिण्याचं कारणं ह्या सिनेमाची कथा माझ्या one of the favourite writers क्षितीज पटवर्धन याने लिहीली आहे. ‘Cinema is a director’s medium’ हे जरी खरं असलं तरी ‘Cinema is writers message to society and a firm opinion of him’ हे अमान्य करून चालणार नाही. आणि हो चित्रपटसृष्टीची निर्मिती असो वा तिचं पुनरुत्थान ‘मराठी माणूस’ हवाचं, असं म्हणत पृथ्वीकने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.  

View this post on Instagram
 
A post shared by PRITHVIK PRATAP (@prithvikpratap)

ही बातमी वाचा : 

Savita Malpekar : 'सायनिंग अमाऊंटही मिळाली होती, पण रंजनामुळे सिनेमातून काढून टाकलं'; सविता मालपेकरांचे दिग्गज अभिनेत्रीवर गंभीर आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Rane on Disha Salian Aaditya Thackeray : सत्यमेव जयते! तुम्ही खोटं लपवू शकत नाही : नितेश राणेZero Hour Disha Salian : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी चौकशीची मागणी, आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार?Journalism Awards Mandar Gonjari:प्रतिनिधी मंदार गोंजारींना रामनाथ गोएंका एक्सलन्स जर्नलीझम पुरस्कारABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 19 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
Embed widget