RCB Vs PBKS IPL Final 2025: पंजाब किंग्जच्या पराभवानंतर प्रीती झिंटाला हुंदका अनावर, चाहते म्हणाले, 'तुला रडताना पाहू शकत नाही...'
Preity Zinta IPL 2025 Final: आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रीति झिंटाच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. संघाच्या पराभवानंतर अभिनेत्री मैदानात हमसून हमसून रडताना दिसली.

Preity Zinta IPL 2025 Final: रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं पंजाबचा पराभव करुन पहिल्यांदाच आयपीएलचं विजेतेपद पटकावलं. आयपीएल 2025 ची ट्रॉफी उंचावत तब्बल 18 वर्षांचा दुष्काळ आरसीबीच्या संघानं संपवला. अठरा वर्षांत पहिल्यांदाच आरसीबीनं आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. तर, आरसीबीच्या विरोधात मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्सचं स्वप्न मात्र भंगलं. पंजाब किंग्सची मालकीण बॉलिवूडची डिंपल गर्ल प्रीति झिंटा आहे. पहिल्याच सामन्यापासून पंजाब धुवांधार खेळी खेळत असल्याचं पाहायला मिळालं होतं.
यंदाच्या सीझनमध्ये जेवढी चर्चा पंजाबच्या संघाची झाली, तेवढीच चर्चा संघाची मालकीण प्रीति झिंटाचीही झाली. तिच्या गालावरच्या खळीवर फक्त पंजाबचेच नाहीतर इतर संघांचे चाहतेही फिदा झालेले. मैदानातील प्रीतिचा वावर चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारा होता. पण, संपूर्ण सीझनभर आपल्या हसऱ्या चेहऱ्यानं वावरणारी प्रीति संघानं सामना गमावल्यावर मात्र, हमसून हमसून रडताना दिसली. प्रीतिच्या डोळ्यांतलं पाणी पाहून चाहते भावूक झालेच, पण नेटकऱ्यांना फार वाईट वाटलं. अनेकांनी कमेंट करत प्रीतिला न रडण्याची गळ घातली आहे. तर, अनेकांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे.
Feeling sad for preity zinta..even she has been waiting for a long time! Well player Punjab Kings! #PunjabKings #RCBvsPBKS #preityzinta pic.twitter.com/vigUg1P5in
— Tanay Singh Thakur (@TanaysinghT) June 3, 2025
संघाच्या पराभवावर प्रीति झिंटा भावूक
सध्या सोशल मीडियावर प्रीति झिंटाचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये संघाच्या पराभवानंतर अभिनेत्री खूप भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रीतिला भावूक झाल्याचं पाहून तिचे चाहतेही फार दुःखी झाले. त्यांनी इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. एका युजरनं लिहिलंय की, आम्ही तुम्हाला रडताना पाहू शकत नाही. दुसऱ्या एका युजरनं विराट-अनुष्कावर टीका करत प्रीतिला सल्ला दिलाय की, 'जर तू सुद्धा प्रेमानंद महाराजांना भेट दिली असती तर तुम्ही जिंकला असता.', तिसऱ्या युजरनं लिहिलंय की, 'असं दिसतंय की, पंजाब नाही, प्रीति झिंटाची टीम पराभूत झाली आहे.'

दुसऱ्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचलेली प्रीतिची टीम
प्रीति झिंटाचा आयपीएल संघ Punjab Kings नं दुसऱ्यांदा अनेक संघांवर मात करत फायनलमध्ये आपली जागा बनवली होती. पण, यावेळीही त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला. अशातच फक्त Punjab Kings चे खेळाडू आणि प्रीति झिंटाच नाहीतर पंजाब किंग्सचे खेळाडूही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. प्रत्येकजण संघाच्या पराभवावर भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.
























