एक्स्प्लोर

Pravin Tarde on Trollers: 'चित्रपट झोंबला म्हणजे तीर निशाण्यावर लागला'; प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद 2' ट्रोल करणाऱ्यांवर पलटवार, म्हणाले..

अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत, चित्रपटाला ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. 

Pravin Tarde On Trollers: मराठमोळे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला 'देऊळ बंद 2' ( Deool Band 2) चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर ( Box Office Collection) धुमाकूळ घालतोय. या चित्रपटाला महाराष्ट्र भरातील प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतोय. 'देऊळ बंद 2: आता परीक्षा देवाची' या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांमध्ये Top 5 मध्ये स्थान मिळवलं आहे. मात्र, काहींनी या चित्रपटाला ट्रोलही केलं आहे. अभिनेते, दिग्दर्शक प्रवीण तरडे ( Pravin Tarde) यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत, चित्रपटाला ट्रोल करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे. 

दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हटलं की एक रांगडा राकट माणूस डोळ्यासमोर येतो. आपल्या चित्रपटाच्या कथानकामुळे, ठसकेबाज, रोखठोक बोलल्यामुळे कायम चर्चेत असतात. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद 2 सिनेमात बायकोला प्रमुख रोल दिल्याने त्याच्यावर टीका झाली. शिवाय अनेकांनी श्रद्धेच्या नावावर सुरू असलेला भंपकपणा दाखवत असल्याची टीकाही त्यांच्यावर केली. मात्र, या सगळ्यावर प्रवीण तरडे यांनी थेट उत्तर दिलं आहे. 

प्रवीण तरडेचं ट्रॉलर्सला सडेतोड उत्तर

देऊळ बंद चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर तब्बल 11 वर्षांनी प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांसमोर आणला. मोहन जोशी, स्नेहल तरडे यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाला मुंबई, पुण्यामध्ये जबरदस्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रभरात बहुतांश ठिकाणी प्रेक्षकांची पसंती या चित्रपटाला मिळाली.  अनेकांनी या चित्रपटाला ट्रोलही केले. यावर अलीकडेच दिलेला मुलाखतीत प्रवीण तरडे म्हणाले ' जे देव मानत नाहीत त्यांना हा सिनेमा जास्त झोंबला. माझ्या देवाचा उदो उदो मीच करणार. त्यामुळे मी तो केला. त्याचा कोणाला त्रास झाला याबद्दल मला काही देणंघेणं नाही. उलट मी जास्त आनंदी झालो. म्हणजे 'तीर निशाने पे लगा है.' शेतकऱ्यांचा आत्महत्या थांबण्यासाठी माझा देव मैदानात उतरलाय. शेतकरी बनवून तो बांधा बांधावर फिरला. ग्रामीण भागात थेरडा म्हणण्याची पद्धत आहे.पण देवाने तेही हसत हसत स्वीकारलं. कुठल्याही चमत्काराशिवाय शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवली . मी माझ्या धर्माचं -देवाचं पालन केलं नाही तर फॉरेनवरून कोणी येणार आहे का? त्यामुळे हे ट्रॉलिंग मी मजेने घेतो' असं प्रमाण तरडे म्हणाले. मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

'देऊळ बंद 2' चित्रपटाची आतापर्यंतची कमाई

देऊळ बंद 2 चित्रपटाने चित्रपटाचा पहिला दिवशी दोन कोटी 45 लाखांची कमाई केली. मात्र नंतरच्या वीकेंडचा या चित्रपटाला चांगलाच फायदा झाला. आतापर्यंत या चित्रपटाचं वर्ल्डवाइड कलेक्शन 66.56 कोटी रुपये झाले आहे. एकूण 29 हजार शोध मधून या चित्रपटाने 56. 60 कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे. वीकेंडसह विकडेजलाही हा चित्रपट आवर्जून पाहायला लोक जात आहेत. प्रदर्शनाच्या तिसऱ्या शनिवारी या चित्रपटाने 3.7 कोटी रुपयांची कमाई केली.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare Marathi 2026‘गोंधळ’चा 'फिल्मफेअर मराठी' मध्ये डंका; 19 नामांकनांपैकी 6 पुरस्कार! शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
‘गोंधळ’चा 'फिल्मफेअर मराठी' मध्ये डंका; 19 नामांकनांपैकी 6 पुरस्कार! शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
'मुसाफिर कॅफे'मधील अभिनेत्रीची ही क्राईम थ्रिलर पाहून चक्रावून जाल; 2 तास 55 मिनिटांचा जबरदस्त थरार, कुठे पाहाल?
'मुसाफिर कॅफे'मधील अभिनेत्रीची ही क्राईम थ्रिलर पाहून चक्रावून जाल; 2 तास 55 मिनिटांचा जबरदस्त थरार, कुठे पाहाल?
Swara Bhasker Hospitalised: 'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
Joru Ka Ghulam Director Arrested: नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
Advertisement

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Crime News: पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
पुण्यातील कंपनीच्या संचालकांनी महिलेला चक्क पोर्तुगालमधील बिअर शॉपच्या मालकाला विकले; अंगावर काटा आणणारी घटना
Dharmendra Pradhan: राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
राजीनामा का दिला? धर्मेंद्र प्रधानांनी दोन आठवड्यांनी मौन सोडलं, Gen Z बाबतही मोठं वक्तव्य; म्हणाले...
Embed widget