एक्स्प्लोर

प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' नं 100 कोटींचा टप्पा ओलांडला, अभिनेता प्रसाद ओकची लय भारी पोस्ट, म्हणाला...

Prasad Oak on Deool Band 2: 'देऊळ बंद 2' सिनेमानं 100 कोटींचा टप्पा ओलांडला.

Deool Band 2: 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) या सिनेमाचा जगभरात जयजयकार होताना दिसत आहे. या सिनेमाला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली.  चित्रपटाच्या रेकॉर्डमध्ये आणखी एक भर पडली आहे. 'देऊळ बंद 2' या सिनेमानं 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 'राजा शिवाजी' (Raja Shivaji) या सिनेमानंतर 'देऊळ बंद 2' हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा ओलांडणारा  चित्रपट ठरला आहे. अवघ्या 10 कोटींमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने 100 कोटींचा टप्पा ओलांडल्यामुळे अनेक सेलिब्रिटींकडून 'देऊळ बंद 2'च्या टीमचं विशेष कौतुक होत आहे. अलिकडेच मराठी अभिनेता  प्रसाद ओकने (Prasad Oak) या सिनेमाच्या टीमचं कौतुक करत प्रवीण तरडे यांचंही कौतुक केलं आहे. 

प्रसाद ओक यांनी प्रवीण तरडेंचं कौतुक केलं (Deool Band 2 Crosses 100 crore worldwide collection)

प्रसाद ओक हा 'देऊळ बंद 2' या सिनेमाचा भाग आहे.  त्यानं या सिनेमात लहान पण प्रभावी भूमिका साकारली आहे.  त्यांनी इन्स्टाग्रामवर एक लाइव्ह व्हिडीओ शेअर केला आहे.  प्रसाद ओक व्हिडीओत म्हणाले की, 'नमस्कार,  'देऊळ बंद 2'   या सिनेमानं 100 कोटींचा यशस्वी टप्पा पार केला आहे.  ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडेचं विशेष अभिनंदन. केवळ आपल्या महाराष्ट्रातून नाही तर जगभरातून या सिनेमाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे'.

'गेले 40 दिवसांपासून या सिनेमानं उत्तम कामगिरी केली आहे. मराठी सिनेसृष्टीला सुगीचे दिवस आले आहेत, असं आपण म्हणू शकतो. 'राजा शिवाजी' या सिनेमानं  130 कोटींचा टप्पा पूर्ण केला आहे.  'तुंबाडची मंजुळा' हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर उत्तम चालला. 'घबाडकुंड'लाही चांगलं यश मिळालेलं आहे.  आता 'देऊळ बंद 2' या सिनेमाला यश मिळत आहे. मला असं वाटतं, प्रवीण तरडे याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे'.

'आजपर्यंत त्याच्यावर माता सरस्वती आणि माता लक्ष्मी प्रसन्न होत्याच, पण आता त्याच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ देखील ठामपणे उभे आहेत.  आता प्रवीण तरडेला कसलीच चिंता नाही. आता प्रवीण तरडे पुढची 50 वर्षे तरी मागे वळून बघणार नाही, एवढं मात्र नक्की. प्रवीण तरडेनं हा सिनेमा हाल - अपेष्टा सहन करुन हा सिनेमा साकारला आहे.  मी या सिनेमाचा भाग आहे.  त्यामुळे त्याने काय काय सोसलंय हे मी पाहिलंय.  पावसामुळे त्याचं काय काय नुकसान झालं आहे. त्याला कसं थांबायला  लागलं, हे आम्ही जवळून पाहिलंय. प्रवीणने अत्यंत प्रामाणिकपणे श्री स्वामी समर्थ यांच्यावर निष्ठा ठेवून हा सिनेमा साकारला आहे.  त्यामुळे हा सिनेमा एवढं यश पाहतो आहे', असं म्हणत प्रसाद ओक यांनी प्रवीण तरडेंचं कौतुक केलंय. 

'आमच्या पिढीतील माझ्या माहितीतील प्रवीण हा असा एकमेव दिग्दर्शक आहे,  ज्याने बॅक 2 बॅक सिनेमे तयार करुन  ते सक्सेसफूल करुन दाखवले आहेत. 'धर्मवीर'पासून तू सिनेमांसाठी किती मेहनत घेतो आहेस, हे मी जवळून पाहिलं आहे.   'देऊळ बंद 2'साठी तू तितकेच कष्ट घेतलेस, रात्रभर जागा राहिला असशील.  याचसाठी श्री स्वामी समर्थ यांनी तुझ्या पदरात  मोठं यश टाकलं आहे. प्रवीण  मित्रा, असंच काम करत राहा. देऊळ बंद 2 टीमचं मनापासून अभिनंदन', असं प्रसाद ओक म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'आश्रम'मध्ये बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन्स, लिप-लॉक अन्...; 'नको त्या सीन्स'मुळे अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडनं नातंच तोडलं

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Jeetendra Nephew Award Winning Director: एकता कपूरचा भाऊ 'हा' अवॉर्ड विनिंग डायरेक्टर, अभिनयात ठरला फ्लॉप, मग बनवली सुपरहिट 'कल्ट क्लासिक फिल्म', ओळखलं का कोण?
एकता कपूरचा भाऊ 'हा' अवॉर्ड विनिंग डायरेक्टर, अभिनयात ठरला फ्लॉप, मग बनवली सुपरहिट 'कल्ट क्लासिक फिल्म', ओळखलं का कोण?
Salman Khan Ramayan: सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
सलमान खान प्रभू श्रीराम, तर मराठमोळी अभिनेत्री बनणार होती सीता, सिनेमा अपूर्णच राहिला कारण...
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
Maharashtra Live blog updates: ब्लिंक इटच्या डिलिव्हरी बॉयवर सहकाऱ्यांचा हल्ला, अंतर्गत स्पर्धेतून वाद, दोघांना अटक
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकारांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकारांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Embed widget