Rashmika Mandanna : अटल सेतूवरुन रश्मिकाचं विकासाला मत देण्याचं आवाहन; पंतप्रधान मोदींनी मानले आभार, म्हणाले, 'मला लोकांचं आयुष्य सुखकर...'
Rashmika Mandanna : अभिनेत्री रश्मिका मंदाना हीने अटल सेतूसाठी केलेल्या व्हिडिओवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आभार मानले आहेत.
Rashmika Mandanna : निवडणुकांच्या वातावरणात अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) ही एका विशेष कारणामुळे चर्चेत आहेत. नुकतच या अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर अटल सेतूचा (Atal Setu) एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये रश्मिका अटल सेतूचं कौतुक करत असल्याचं पाहायला मिळतंय. तसेच तिने अटल सेतूविषयी माहिती देत विकासकामांचं देखील कौतुक केलंय. यावर पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) देखील तिचे आभार मानले आहेत.
रश्मिकाने या व्हिडिओच्या शेवटी त्यामुळे तुम्ही विकासाला मत द्या असं आवाहनही मतदारांना केलंय. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर रश्मिकाच्या या व्हिडिओची बरीच चर्चा आहे. परंतु तिच्या चाहत्यांना मात्र हा व्हिडिओ काही पसंतीस पडला नसल्याचं पाहायला मिळतंय. कारण या व्हिडिओमुळे अनेकांनी रश्मिकाला ट्रोल केलं आहे.
पंतप्रधान मोदींनी मानले आभार
रश्मिकाच्या या व्हिडिओवर कमेंट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील तिचे आभार मानले आहेत. रश्मिकाचा हा व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'मला लोकांचं आयुष्य सुखकर बनवायला आवडतं.' दरम्यान या व्हिडिओमध्ये रश्मिकाने म्हटलं की, मला पाहू नका, बाहेर बघा. मुंबई ट्रान्स हार्बर हा भारतातला सगळ्यात मोठा पूल आहे. दोन तासाचा प्रवास 22 मिनिटांत पूर्ण होतो. विश्वास बसत नाहीये. गेल्या 7 वर्षात आपण हे स्वप्न पूर्ण करून दाखवलं आहे. त्या,त्यामुळे विकासाला मत द्या.'
South India to North India… West India to East India… Connecting people, connecting hearts! 🤍 #MyIndia pic.twitter.com/nma43rN3hM
— Rashmika Mandanna (@iamRashmika) May 16, 2024
Absolutely! Nothing more satisfying than connecting people and improving lives. https://t.co/GZ3gbLN2bb
— Narendra Modi (@narendramodi) May 16, 2024
रश्मिकाच्या व्हिडिओवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
दरम्यान रश्मिकाच्या या व्हिडिओवर आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सध्या आदित्य ठाकरेंच्या प्रतिक्रियेची देखील सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. आदित्य ठाकरेंनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत बऱ्याच गोष्टींची उजळणी केली आहे. त्याचप्रमाणे त्यांनी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक विषयी काही गोष्टी देखील मांडल्या आहेत. त्यामुळे सध्या रश्मिकाच्या या व्हिडिओमुळे सोशल मीडियावरही बरीच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं आहे.