Lata Mangeshkar-PM Modi Conversation: लतादीदी मोठ्या बहिणीसमान! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्ये ऐकवला होता आपुलकीचा फोन कॉल!
PM Modi-Lata Mangeshkar : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर यांच्यात भावा-बहिणीसारखे नाते होते. एकदा रक्षाबंधनाच्या दिवशी लतादीदींनी पंतप्रधान मोदींकडे वचन मागितले होते की, ते भारताला नेहमी यशाच्या विकासाच्या उंचीवर नेतील.
Lata Mangeshkar : प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. लतादीदींच्या निधनाने देशात निर्माण झालेली पोकळी भरून काढता येणार नाही, असे ट्विट त्यांनी केले. लता मंगेशकर यांनी रविवारी (6 फेब्रुवारी) वयाच्या 93व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहताना पीएम मोदींनी आणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, त्यांना लतादीदींकडून नेहमीच आपुलकी मिळाली. लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांशी फोनवरून बोलून पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर यांच्यात भावा-बहिणीसारखे नाते होते. एकदा रक्षाबंधनाच्या दिवशी लतादीदींनी पंतप्रधान मोदींकडे वचन मागितले होते की, ते भारताला नेहमी यशाच्या विकासाच्या उंचीवर नेतील.
लतादीदींना फोन कॉलवर दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
लता मंगेशकर यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला नरेंद्र मोदी विसरले नाहीत. सप्टेंबर 2019मध्ये अमेरिकेला जाण्यापूर्वी त्यांनी 'मोठी बहीण' मानलेल्या लता मंगेशकर यांना फोन केला आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पीएम मोदींनी रेडिओवरील त्यांच्या 'मन की बात' कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्याशी फोनवरील त्यांच्या मनोरंजक संभाषणाचा ऑडिओ देखील श्रोत्यांना ऐकवला होता. वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारतान लतादीदी मोदींना म्हणाल्या होत्या की, 'जेव्हापासून तुम्ही या पदावर आला आहात तेव्हापासून भारताचे चित्र बदलू लागले आहे. यामुळे मला खूप आनंद होतो.' याशिवाय त्यांनी आपुलकीने एकमेकांची कौटुंबिक चौकशी देखील केली.
ऐका संपूर्ण संभाषण :
या ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादीदींचा हा फोन सर्वांना ऐकवला होता. परदेश दौऱ्यामुळे वैयक्तिकरित्या शुभेच्छा देता येणार नसल्याने, त्यांनी लतादीदींना फोनवरुन शुभेच्छा दिल्या होत्या. आपण पुढच्यावेळी भेटू, तेव्हा तुमच्या हातचे गुजराती पदार्थ मला नक्की खाऊ घाला, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लतादीदींना केली होती.
संबंधित इतर बातम्या :
Lata Mangeshkar passes away : युग संपले! लतादीदींच्या निधनानंतर संजय राऊत यांचे ट्वीट
Lata Mangeshkar Death : गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Remembering Lata Mangeshkar LIVE: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha