Barack Obama : बराक ओबामा यांची भारतीय सिनेमाला पहिली पसंती, पायल कपाडियाच्या 'All We Imagine as Light'चा समावेश
Barack Obama : पायल कपाडियाचा All We Imagine as Light हा सिनेमा बराक ओबामा यांच्या आवडत्या सिनेमांच्या यादीत अगदी पहिल्या क्रमांकावर आहे.
All We Imagine as Light in Barak Obama Favourite Movie List : पायल कपाडिया दिग्दर्शित 'ऑल वी इमॅजिन अॅज लाईट' (All We Imagine as Light) हा सिनेमा सध्या बऱ्याच चर्चेत आहे. भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात आलेल्या 'लापता लेडीज' (Laapataa Ladies) या सिनेमासोबत पायल कपाडियाचा (Payal Kapadia) हा सिनेमाही शर्यतीत होता. इतकच नव्हे तर लापता लेडीज ऐवजी पायल कपाडियाच हा सिनेमाच ऑस्करसाठी पाठवायला हवा होता, असं अनेकांचं म्हणणं होतं. तसेच मे महिन्यात झालेल्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्येही या सिनेमाने बाजी मारली होती. त्यातच आता अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनीही त्यांच्या आवडत्या सिनेमांची यादी प्रदर्शित केली आहे. या यादीमध्ये पायल कपाडियाचा ऑल वी इमॅजिन अॅज लाईट या सिनेमाचाही समावेश आहे.
बराक ओबामा यांच्या सोशल मीडियावरुन ही यादी प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये 2024 या बराक ओबामा यांनी भारतीय सिनेमाला पहिली पसंती दिली आहे. तसेच या यादीमध्ये ऑल वी इमॅजिन अॅज लाईट, कॉनक्लेव्ह, द पियानो लेसन, द प्रॉमिस्ड लँड,द सीड ऑफ द सॅक्रेड फिग, ड्यून: पार्ट टू,अनोरा,Dìdi, शुगरकेन,अ कम्प्लिट अननोन या सिनेमांचा समावेश आहे.
ऑल वी इमॅजिन अॅज लाईट सिनेमाची कामगिरी
ऑल वी इमॅजिन अॅज लाईट या चित्रपटाने कान्समध्ये पाल्मे डी’ओर हा पुरस्कार मिळवला होता. अशी कामगिरी करणारा हा चित्रपट 30 वर्षातील पहिला भारतीय चित्रपट ठरला होता. त्याचप्रमाणे या सिनेमाने कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ग्रँड प्रिक्स जिंकून इतिहास रचला. तसेच या सिनेमाला 82 व्या वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (मोशन पिक्चर) श्रेणीमध्ये नामांकन मिळालं आहे.महत्त्वाची बाब अशी 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' एकूण दोन नामांकने मिळाली असून दुसरी एक सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर - (इंग्रजी नसलेली भाषा) साठी आहे. विशेष म्हणजे या श्रेणीमध्ये भारतीय दिग्दर्शकाचे नामांकन होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
View this post on Instagram