एक्स्प्लोर

Highest Paid Actor In South: ना अल्लू अर्जुन, ना महेश बाबू; 'हा' साऊथचा हाईएस्ट पेड अ‍ॅक्टर; 'या' फिल्मसाठी घेतलंय मोठ्ठं मानधन!

Pawan Kalyan Become Highest Paid Actor: अभिनेता आणि राजकारणी पवन कल्याण लवकरच त्याच्या आगामी तीन चित्रपटांचं चित्रीकरण पूर्ण करणार आहेत. आणि यापैकी एका चित्रपटासाठी त्यानं मोठ्ठी रक्कम वसूल केल्याची माहिती मिळत आहे. 

Pawan Kalyan Become Highest Paid Actor: दाक्षिणाच्य सिनेमा (South Movie), त्यांच्या कथा आणि साऊथचे दमदार अॅक्शन सीन्स (South's Powerful Action Scenes) करणारे अ‍ॅक्टर्स, यांनी संपूर्ण देशाला भूरळ घातली आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत रिलीज होणारे चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुवांधार कमाई करत असल्याचं पाहायला मिळतं. बॉलिवूडला जणू आता साऊथ इंडस्ट्रीची भितीच जाणवू लागली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशातच आता साऊथच्या हाईएस्ट पेड अ‍ॅक्टरच्या नावाची चर्चा रंगली आहे. या अभिनेत्यानं त्याच्या आगामी चित्रपटासाठी एवढी मोठी रक्कम मानधन म्हणून घेतली आहे की, जो आकडा ऐकून आपल्यालाच काय, बॉलिवूडवर कित्येक वर्षांपासून राज्य करणाऱ्या शाहरुख, सलमानलाही भोवळ येईल. 

हे ऐकून तुमच्या डोळ्यांसमोर अल्लू अर्जुन (Allu Arjun), महेश बाबू (Mahesh Babu), ऋषभ शेट्टी (Rishab Shetty), विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda), नागार्जुन (Nagarjun), विजय सेतुपती (Vijay Sethupathi) यांसारख्या अनेक अभिनेत्यांची नावं आली असतील. पण, सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता यांपैकी कुणीच नाही. आम्ही ज्या साऊथ अॅक्टरबाबत बोलत आहोत, त्याचं नाव आहे, तेलुगू सुपरस्टार पवन कल्याण (Pawan Kalyan). 

View this post on Instagram
 
A post shared by Pawan Kalyan (@pawankalyan)

चाहत्यांनी पवन कल्याणला मोठ्या पडद्यावर पाहून बरीच वर्ष झालीत. एकेकाळी मोठ्या पडद्यावरचा नावाजलेला आणि नियमित दिसणारा चेहरा असलेला पॉवरस्टार, अशी पवन कल्याणची ओळख होती. पण, त्यानंतर पवन कल्याणनं राजकारणात प्रवेश केला आणि सध्या तो आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडत आहे. त्याच्यावरच्या राजकीय जबाबदाऱ्यांमुळे त्यांचे चित्रपट लांबणीवर पडत आहेत, ज्यामुळे कोट्यवधी रुपये गुंतवणाऱ्या निर्मात्यांवर दबाव वाढत आहे. अनेक चित्रपट अडकल्यामुळे, निर्माते पवन कल्याण सेटवर परतण्याची वाट पाहत आहेत. अखेर, अभिनेतानं अलीकडेच त्याच्या तीन चित्रपटांच्या निर्मात्यांना भेटून त्यांना लवकरच शूटिंग पूर्ण करण्यासाठी तारखा देण्याचं आश्वासन दिलं आहे.

'उस्ताद भगत सिंह'साठी आकारलं भलंमोठ्ठ मानधन 

Siasat.com च्या रिपोर्टनुसार, पवन कल्याणनं उस्ताद भगतसिंगसाठी 170 कोटी रुपयांची फी आकारली आहे. तेलुगू अभिनेत्याला संपूर्ण भारताबाहेरील चित्रपटासाठी दिलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम आहे. यावरून एक गोष्ट सिद्ध होते की, बराच काळ चित्रपटांपासून दूर असूनही, निर्मात्यांना पवन कल्याणच्या बॉक्स ऑफिसच्या ताकदीवर खूप विश्वास आहे.

पवन कल्याण तीन सिनेमांचं शूटिंग पूर्ण करणार 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता-राजकारणी पवन कल्याण लवकरच तीन चित्रपट पूर्ण करण्यास सहमती दर्शवली आहे, त्यापैकी हरि हरा वीरा मल्लू (HHVM) मे मध्ये पूर्ण होईल. तर ओजीचं चित्रीकरण जूनमध्ये नियोजित आहे. तर उस्ताद भगतसिंह याचं चित्रीकरण जुलैमध्ये सुरू होईल. तसेच, पवन कल्याण त्याच्या वेळापत्रकाबद्दल स्पष्टीकरण दिल्यानंतर एएम रत्नम, डीव्हीव्ही दानय्या आणि मैथ्री मूव्ही मेकर्स सारख्या निर्मात्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Sania Mirza on Motherhood: सानियाने ब्रेस्ट फिडिंगचा अनुभव सांगितला, म्हणाली, 3 वेळा प्रेग्नंट राहीन, पण ते तेव्हढं नको!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Omkar Tarmale : तीन लाखांचा कर्ज, बापाची जिद्द अन् पोराचे कष्ट.... महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
तीन लाखांचा कर्ज, बापाची जिद्द अन् पोराचे कष्ट.... महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?
Dhananjay Munde meet Amit shah : कोकाटे आऊट, मुंडे इन? ; धनंजय मुंडेंनी घेतली अमित शाहांची भेट

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Omkar Tarmale : तीन लाखांचा कर्ज, बापाची जिद्द अन् पोराचे कष्ट.... महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
तीन लाखांचा कर्ज, बापाची जिद्द अन् पोराचे कष्ट.... महाराष्ट्रातील ओंकार तरमाळेला काव्या मारच्या संघाने इतक्या लाखांत केलं खरेदी
मावळमधील जमीनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
मावळमधील जमिनीवर विनापरवाना उत्खनन, हजारो झाडांची कत्तल; आमदार सुनील शेळकेंच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याला विलंब का? शशिकांत शिंदेंनी भाजप- सेनेच्या मंत्र्यांवरील आरोपांचा संदर्भ सांगितला
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
गुटखा विकणाऱ्यांवर नव्या वर्षात थेट मोक्का; 'हार्म आणि हर्ट'नुसार कायद्यात बदल, नरहरी झिरवळांनी स्पष्टच सांगितलं
Manikrao Kokate Resignation: अटक वॉरंट निघण्याची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
अटक वॉरंटची कुणकुण लागताच माणिकराव कोकाटेंचं ब्लडप्रेशर वाढलं, श्वास घेण्यात अडचण, डॉक्टरांनी ICU मध्ये अॅडमिट का केलं?
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
मोठी बातमी! क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; राज्यपालांकडूनही मंजूर, खाते अजित पवारांकडे वर्ग
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Embed widget