एक्स्प्लोर

महेश भट्ट यांच्यासोबतचं नातं, अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याच्या चर्चा; सिनेसृष्टीतून अचानक का गायब झाल्या होत्या परवीन बाबी?

Parveen Babi Birthday : इंडस्ट्रीतील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ज्यांची ओळख आहे, त्या परवीन बाबी यांचा आज वाढदिवस आहे.

Parveen Babi Birthday : बॉलीवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये ज्यांचं नाव घेतलं जातं त्या परवीन बाबी यांची आज जयंती आहे. परवीन बाबी यांनी 1973 मध्ये 'चरित्रीरा' चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. रुपेरी पडद्यावर अनेक हिट चित्रपट देणारी ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे कायमच चर्चेत राहिली आहे. परवीन बाबी (Parveen Babi) यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण कधी महेश भट्ट यांच्यासोबतच्या अफेअरच्या अफवांमुळे तर कधी अंडरवर्ल्डशी असलेल्या कनेक्शनमुळे परवीन बाबी या कायमच चर्चेचा विषय ठरल्या. 

त्या काळातील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री असलेल्या परवीन बाबी या इतर अभिनेत्रींपेक्षा जरा जास्तच मानधन घ्यायच्या. एक काळ गाजवलेल्या या अभिनेत्रीच्या आयुष्याचा शेवट मात्र एकाकीच झाला. परवीन बाबी यांनी 20 जानेवारी 2005 रोजी अखेरचा श्वास घेतला. परवीन बाबी या पॅरानोइड स्किझोफ्रेनिया या आजाराने त्रस्त होत्या. त्यामुळे आयुष्यातल्या एका काळानंतर परवीन यांनी सिनेसृष्टीतल्या लोकांपासून लांबच राहण्याचा निर्णय घेतला. 

आणि परवीन बाबी बॉलीवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्री झाल्या

गुजरातमधील जुनागढ येते 4 एप्रिल 1954 रोजी परवीन बाबी यांचा जन्म झाला. परवीन बाबी यांचा नवाबांच्या घरातील घराणं होतं. पण परवीन या पाच वर्षांच्या असताना त्यांच्यावरुन वडिलांच छत्र हरवलं. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर परवीन यांनी त्या काळात मॉडेलिंग करायला सुरुवात केली. ही बोल्ड अभिनेत्रीला कॉलेजच्या दिवसांपासूनच सिगारेट ओढण्याची सवय होती. चित्रपट निर्माते बीआर इशारा यांनी त्यांना एके दिवशी सिगारेट ओढताना पाहिलं. तो दिवस परवीन यांच्यासाठी खास ठरला आणि परवीन बॉलीवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्री झाल्या. 

अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याच्या चर्चा

आपल्या करिअरच्या यशाच्या टप्प्यावर असणारी ही अभिनेत्री अचानक एक दिवस गायब झाली होती. 1983 मध्ये एका शुटींगदरम्यान परवीन यांच्याशी अचानक सर्वांचा संपर्क तुटला. त्यावेळी त्या कुठे गेल्या, कोणासोबत गेल्या, का गेल्या असे अनेक प्रश्न पडले होते, ज्याची उत्तरं कोणाजवळच नव्हती. त्यानंतर अशी माहिती समोर आली की, परवीन यांच्यावर काही अंडरवर्ल्डची लोकं नजर ठेवून होती आणि त्यांनीच परवीनला गायब केल्याचं म्हटलं जात होतं. अखेर 6 वर्षांनी परवीन या मुंबईत परतल्या. त्यावेळी त्यांनी अध्यात्मसाठी इंडस्ट्री सोडल्याचं सांगितलं होतं. 

महेश भट्ट यांच्यासोबत अफेअरच्या चर्चा

बॉलीवूड अभिनेत्रीचं तिच्या यशाच्या काळात अनेकांशी नाव जोडलं होतं. परवीन बाबी या देखील त्यातील एक होत्या. परवीन बाबी यांचं डॅनी डेन्झोंगपा, कबीर बेदी आणि महेश भट्ट यांच्यासोबत अफेअर असल्याचं समोर आलं होतं. पण त्यांचं नातं हे चार वर्षांपेक्षा जास्त काळ टिकू शकलं नाही. पण परवीन बाबी यांचं महेश भट्टसोबतचं नातं हे विशेष चर्चेत आलं. जेव्हा परवीन आणि महेश भट्ट यांची भेट झाली त्यावेळी महेश भट्ट यांचं लग्न झालं होतं. पण तरीही परवीन आणि महेश भट्ट यांचे संबंध होते, असं म्हटलं जातं. महेश भट्ट यांनी 2006 मध्ये दिग्दर्शित केलेला 'वो लम्हें' हा चित्रपट परवीन बाबी यांच्यासोबतच्या नात्यावर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. 

ही बातमी वाचा : 

Jaya Bachchan Amitabh Bachchan : 'सिलसिला'मध्ये जया बच्चन यांची झाली होती अचानक एन्ट्री, 'या' अभिनेत्रीला दाखवला बाहेरचा रस्ता

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget