Bollywood Actor Post On Tukaram Mundhe Transfer: तुकाराम मुंढेंच्या बदलीवरून बॉलिवूड अभिनेत्याची थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पोस्ट; म्हणाले ...
आपल्या धडक कारवायांमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचं सोशल मीडियासह राज्यभरातून कौतुक होताना दिसतंय.

Paresh Raval On Tukaram Mundhe: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) चे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या जोरदार धडक कारवाया सुरु आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचे निर्णय, बदल्या या सगळ्याची महाराष्ट्रभर चर्चा कायमच रंगलेली असते. अनेकदा बदल्यांना सामोरे जावं लागणाऱ्या तुकाराम मुंढे यांच्या बदलीबाबत आता बॉलीवूडमधील एका अभिनेत्याने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोस्ट करत विनंती केलीय.
अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी नुकतीच एक पोस्ट करत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली किंवा हकालपट्टी होऊ नये याची खात्री करावी, अशी पोस्ट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे. या पोस्टची सध्या सगळीकडे चर्चा आहे. एफडीएच्या आयुक्तपदाचा कारभार हाती घेतल्यापासून भेसळयुक्त पनीर, दूध, हॉटेल्समधील अस्वच्छता त्यांच्या रडारवर आली आहे. आपल्या धडक कारवायांमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांचं सोशल मीडियासह राज्यभरातून कौतुक होताना दिसतंय.
काय म्हटलंय परेश रावल यांनी?
अभिनेते परेश रावल यांनी 9 ऑगस्टला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत एक पोस्ट लिहिली. यात त्यांनी म्हटलं 'मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्रपणे आणि आदरपूर्वक असे सांगावेसे वाटते की, श्री तुकाराम मुंढे यांचे संरक्षण आणि त्यांची सध्याच्या विभागातून बदली, किंवा त्यांना या विभागातून हटवले जाणार नाही याची काळजी घेणं हे तुमचं कर्तव्य आणि प्राधान्य असलं पाहिजे.'
To put it with humility and respect that it should the priority and Dharm of Honourable CM @Dev_Fadnavis ji to protect Shri @Tukaram_IndIAS that he should not be xfered or shunted out of his department.
— Paresh Rawal (@SirPareshRawal) August 9, 2026
🙏🙏🙏
ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त झाल्यापासून तुकाराम मुंढे यांनी अनेक धडक कारवया करण्यास सुरुवात केली आहे.दुधामधील भेसळ, भेसळयुक्त पनीर, हॉटेलमधील अस्वच्छता, घाण आणि अन्नसुरक्षेवर गदा आणणाऱ्या अनेक मोठी मोठी हॉटेल्स, कॅन्टीन तसेच राज्यभरातील विविध छोट्या मोठ्या ठिकाणी छापेमारी करत कारवाया करण्यात आल्या.अनलॉग पनीरवर वर्षभरासाठी बंदी घालण्यात आली.राज्यभरात भेसळयुक्त पनीर,दूध मिठाई जेवण तसेच गुटखा विक्रीवर छापे टाकण्यात आले.इतकच काय तर उच्च न्यायालयाच्या कॅन्टीनपर्यंत या कारवाया झाल्या आहेत.





















