Parag tyagi: पराग त्यागीला घरात जाणवतोय शेफाली जरीवालाच्या आत्म्याचा वावर; म्हणाला 'अचानक कापूर जळण्याचा वास सुटतो अन्...'
Parag tyagi: घरात त्याच्यासोबत अशा काही घटना घडल्या आहेत की त्याला शेफालीच्या असण्याची जाणीव होत असल्याचं त्याने सांगितलं आहे.

Parag tyagi: अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या (shefali jariwala) निधनानंतर पती पराग त्यागीला घरामध्ये तिचा भास होतो. परागने त्याला घरात आलेला अनुभव सांगत घरात अजूनही शेफालीचा (shefali jariwala) आत्मा आहे असा दावा केला आहे. घरात त्याच्यासोबत अशा काही घटना घडल्या आहेत की त्याला शेफालीच्या असण्याची जाणीव होत असल्याचं त्याने सांगितलं आहे.
अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या (shefali jariwala) निधनाला आता काही महिने लोटले असले तरी तिचा नवरा पराग त्यागी अजूनही तिच्या आठवणीत जगतो आहे. २७ जून २०२५ रोजी शेफालीचं निधन झालं होतं. मात्र तिच्या जाण्यानंतरही पराग तिच्या आठवणींमध्ये रमलेला आहे. तो अधूनमधून सोशल मीडियावर पत्नीच्या आठवणीत भावनिक पोस्ट शेअर करताना दिसतो. अलिकडेच त्याने शेफालीचा टॅटूही काढला होता. यावेळी पराग त्यागीने असा अनुभव शेअर केला आहे. ज्यामुळे चाहत्यांनाही विचार करायला भाग पाडलं आहे. त्याने सांगितलं की, त्याला घरात अजूनही शेफालीचा (shefali jariwala) आत्म्याचा आभास होतो. परागच्या म्हणण्यानुसार, तिच्या निधनानंतर त्याला असे अनेक अनुभव आले आहेत ज्यामुळे त्याला ठामपणे वाटतं की शेफाली (shefali jariwala) आजही त्याच्या आसपासच आहे.
View this post on Instagram
त्याने म्हटलं, “कधी कधी घरात एक वेगळीच ऊर्जा जाणवते, जणू ती इथेच आहे. काही सुगंध, काही क्षण, काही आवाज, सगळं तिची आठवण करून देतं.” परागच्या या कबुलीनंतर त्याचे आणि शेफालीचे चाहते भावूक झाले आहेत. शेफाली जरीवाला ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून ओळखली जायची आणि तिच्या अकाली निधनाने मनोरंजनसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली होती. पराग म्हणाला की त्याला अजूनही शेफालीची उपस्थिती जाणवते, जणू ती कुठेतरी जवळ आहे, फक्त अदृश्य आहे. शेफालीच्या जाण्यानंतर तिचा पती, अभिनेता पराग त्यागी अजूनही त्या दु:खातून सावरू शकलेला नाही.
शेफालीच्या आठवणींनी भारावलेल्या पराग त्यागीने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये तिच्याशी संबंधित एक भावनिक आणि रहस्यमय अनुभव शेअर केला. त्याने सांगितलं की, शेफालीच्या मृत्यूनंतर जवळपास एक महिन्यानं त्यांच्या घरात ‘पॅरानॉर्मल अॅक्टिव्हिटी’चा अनुभव आला. पराग म्हणाला, “एका दिवशी मी घरी एकटाच बसलो होतो. शेफालीचा फोटो पाहत होतो आणि म्हणत होतो, ‘बाबू, तू मला सोडून का गेलीस?’ असं म्हणताच खोलीत अचानक कापूरचा सुगंध पसरला. शेफालीला कापूरचा वास खूप आवडायचा. ती रोज संध्याकाळी दिवा लावताना त्यामध्ये कापूर घालत असे. तोच सुगंध माझ्या आजूबाजूला पसरला होता.”
त्याने पुढे सांगितले, “मी खोलीत इकडे-तिकडे पाहिलं, पण कुठेही दिवा लावलेला नव्हता. मात्र कापूरचा वास इतका तीव्र होता की असं वाटलं जणू ती माझ्याजवळच आहे. मी हसत विचारलं, ‘बाबू, तू इथेच आहेस का?’ आणि त्याच क्षणी मला एक वेगळीच ऊर्जा जाणवली. माझे केससुद्धा हवेत उडू लागले. तो अनुभव शब्दांत सांगता येणार नाही.” परागच्या म्हणण्यानुसार, तो आजही पत्नीची उपस्थिती जाणवतो. तो पुढे सांगतो की, “अनेकदा मी असं काही बोलतो जे शब्द फक्त शेफाली वापरायची. त्यामुळे मला खात्री वाटते की ती आजही माझ्यासोबत आहे.”























