रात्री घरी उशीरा आल्यावर मला वेश्या म्हणायचे, वडील कसे त्रास द्यायचे? अभिनेत्रीनं सांगितला हादरवणारा किस्सा
Actress Father Called Her Prostitute: एक टीव्ही अभिनेत्री आहे, जिच्या वडिलांना तिनं शूटिंगसाठी उशिरापर्यंत थांबणं आवडत नव्हतं. त्यांनी अभिनेत्रीला 'वेश्या' असंही म्हटलेलं. याबद्दल स्वतः अभिनेत्रीनं खुलासा केला आहे.

Actress Father Called Her Prostitute: ग्लॅमरची दुनिया अशी आहे, जिथे पोहोचण्यासाठी लोकांना केवळ प्रोफेशनल लेवलवरच नाहीतर पर्सनल लेव्हलवरही खूप संघर्ष करावा लागतो. या कठीण काळात, अनेक कलाकारांचे कुटुंबीय त्यांना सोडून जातात. किंवा कुटुंबाशी फारकत घ्यावी लागले. अनेकांच्या नात्यात दुरावा येतो, तर अनेकांना आपलं घरदार सोडावं लागतं. अशीच एक टीव्ही अभिनेत्री आहे, जिच्या वडिलांना तिचं शूटिंगला उशिरापर्यंत थांबणें आवडत नव्हतं आणि ते तिला खूप फटकारायचे, टोमणे मारायचे, कधीकधी तर भयंकर शिवीगाळही करायचे.
आपण 'पांड्या स्टोअर' आणि 'जमाई राजा' सारख्या सीरिअल्समुळे बरीच प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्री शायनी दोशीबद्दल (Shiny Doshi ) बोलत आहोत. अभिनेत्रीनं अलिकडेच तिच्या वडिलांच्या वाईट वृत्तीबद्दल भाष्य केलं आहे. तिनं खुलासा केला आहे की, जेव्हा ती 16 वर्षांची होती, तेव्हा तिचे वडील तिला वेश्या म्हणून तिचा अपमान करायचे. तिला सतत टोमणे मारायचे, शिवीगाळ करायचे.
'माझे वडील मला वेश्या म्हणायचे...'
सिद्धार्थ काननला दिलेल्या मुलाखतीत शायनी दोशी म्हणाल्या की, "माझे वडील मला वेश्या म्हणायचे. माझे प्रिंट शूटिंग अहमदाबादमध्ये बराच काळ चालायचं. कधीकधी रात्री 2 किंवा 3 वाजता पॅक-अप व्हायचं. आई प्रत्येक शूटमध्ये माझ्यासोबत असायची, तेव्हा मी फक्त 16 वर्षांची होते, त्यावेळी माझे वडील मला कधीच विचारायचे नाहीत की, तू ठीक आहेस ना? तुम्ही सुरक्षित आहात का? त्याऐवजी ते फक्त आणि फक्त वाईट शब्द बोलायचे. शिवीगाळ करायचे, ते आईला म्हणायचे की, रात्री-अपरात्री तू मुलीला बाहेर घेऊन जातेयस, वाईट कामं करायला लावतेयस का?
दोन वर्ष वडिलांशी बोललेच नाही...
शायनी दोशीचे वडील आता या जगात नाहीत आणि अभिनेत्रीनं सांगितलं की, ती तिच्या वडिलांच्या मृत्यूच्या दोन वर्षांपूर्वीपर्यंत त्यांच्याशी बोलत नव्हती. शायनी म्हणाली की, तिला आता याचा पश्चात्ताप होतोय. अभिनेत्री म्हणते की, "आयुष्यातील काही गाठी अशा आहेत, ज्या तुम्ही सोडवू शकत नाही. मी या जीवनातून धडे घेतले आहेत, पण आजही कधीकधी मला खूप एकटेपणा जाणवतो. कारण माझ्या आयुष्यात वडिलांसारखा दुसरा कोणी नाही, जो मला आधार देईल."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























