Panchayat Season 4 Official Trailer: 'फुलेरा'मध्ये निवडणुकीची रणधुमाळी, सचिवजी खाणार मार, तर समोसा-चटणीवरच बनराकसचं ध्यान; Panchayat 4 चा ट्रेलर रिलीज
Panchayat Season 4 Official Trailer: 'पंचायत सीझन 4'मध्ये फुलेरा गावात निवडणुकीची धामधूम सुरू असल्याचं पाहायला मिळणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात एकीकडे टीम मंजू देवी आणि दुसरीकडे टीम क्रांती देवी आमने-सामने उभ्या ठाकल्या आहेत.

Panchayat Season 4 Official Trailer: 'पंचायत सीझन 4'ची (Panchayat Season 4) अनेकजण आतुरतेनं वाट पाहत आहेत. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे, अशातच आता या सीरिजचा ट्रेलर रिलीज (Panchayat Season 4 Official Trailer) करण्यात आला आहे. ट्रेलर पाहून एक गोष्ट स्पष्टपणे जाणवतेय की, पुन्हा एकदा वेब सीरिजचे (Web Series) कलाकार आपल्या प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करण्यास उत्सुक आहेत. जवळपास 2 मिनिटं 38 सेकंदांच्या या ट्रेलर प्रेक्षकांवर भूरळ घालत आहे.
'पंचायत सीझन 4'मध्ये फुलेरा गावात निवडणुकीची धामधूम सुरू असल्याचं पाहायला मिळणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात एकीकडे टीम मंजू देवी आणि दुसरीकडे टीम क्रांती देवी आमने-सामने उभ्या ठाकल्या आहेत. निवडणुकीचं मैदान मारण्यासाठी दोन्हीकडून जोर लावला जात आहे आणि त्यांचा हाच प्रयत्न लोकांना खळखळवून हसवणार आहे. या निवडणुकीच्या रिंगणात एकवेळ मोठी भांडणं होतात आणि चक्क सचिवजींनाच मारहाण होते. त्यातच सचिवजी आणि रिंकी यांची मैत्री आणखी फुलतेय. तर बनराकसची नजर यावेळीही चोहीकडे असल्याचं पाहायला मिळतंय.
'फुलेरा' गावात निवडणुकीची रणधुमाळी
'पंचायत 4'च्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलंय की, कसं फुलेरा गाव यावेळी रणांगण बनणार आहे. निवडणुकीच्या रिंगणात मंजू देवी आणि क्रांती देवी आमने-सामने उभ्या ठाकल्या आहेत. निवडणूक रॅलीतली गाणी, मतदारांना दिली जाणारी मोठमोठी आश्वासनं आणि दोन्ही बाजूनं केला जाणारा जोरदार प्रचार पाहायला मिळणार आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांना पराभूत करण्यासाठी कट रचले जात आहेत. गावातील रस्त्यांवर वाजणाऱ्या देशी गाण्यांमध्ये आणि भावनिक घोषणांमध्ये, हा ट्रेलर एका पूर्ण देसी लढाईची मजा देतो, ज्यामध्ये ड्रामा आणि फुलेराचं राजकारण मनोरंजक बनवणारा असेल.
'पंचायत'च्या चौथ्या सीझनची सर्वांनात आतुरता लागली आहे. प्रेक्षक लवकरच फुलेरा गावातली निवडणुकीची धामधूम पाहू शकणार आहेत. जिथे लहान-सहान भांडणांसोबतच प्रेक्षकांचं डबल मनोरंजन होणार आहे. 'पंचायत'चा हा नवा सीझन पुन्हा एकदा एका लहान गावातलं राजकारण, इमोशन्स आणि तिथल्या लोकांची मानसिकता दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. या सीझनमध्ये नव्या आव्हानांसह प्रेक्षकांचे लाडके चेहरे पुन्हा एकदा मनोरंजन करण्यासाठी परतत आहेत. या शोमध्ये पुन्हा एकदा जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्विका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवार आणि पंकज झा सारखे उत्तम कलाकार दिसतील.
'पंचायत 4'ची रिलीज डेट
'पंचायत 4' या महिन्यात 24 जूनपासून प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. 'पंचायत'ची निर्मिती 'द व्हायरल फिव्हर' (टीव्हीएफ) द्वारे करण्यात आली आहे. या सीझनची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार यांनी केली आहे आणि पटकथा चंदन कुमार यांनी लिहिली आहे. दीपक कुमार मिश्रा आणि अक्षत विजयवर्गीय यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
पाहा ट्रेलर :























