Smriti Mandhana Palash Muchhal: पलाशचं स्मृतीला क्युट सरप्राईज, स्टेडियममध्ये गुडघ्यावर बसून प्रपोज; VIDEO शेअर करुन दिली गूड न्यूज!
Smriti Mandhana Palash Muchhal: मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर स्मृतीला सरप्राईज देत पलाशनं प्रपोज केलं. या व्हिडीओमध्ये स्मृतीसोबत पलाशही काहीसा इमोशनल झाल्याचं पाहायला मिळतंय.

Smriti Mandhana Palash Muchhal: म्युझिक कंपोजर (Music Composer) आणि फिल्म मेकर (Film Maker) पलाश मुच्छल (Palash Muchhal) आणि स्मृती मानधना (Smriti Mandhana) आता लवकर लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. दोघांनी साखरपुडा उरकला असून स्मृतीनं नुकतीच तिच्या इन्स्टाग्रामवरुन हटके अनाउन्समेंट केलेली. पण, आता स्मृती पाठोपाठ तिचा होणारा नवरा पलाश मुच्छलनंही इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये पलाश त्याची होणारी बायको स्मृती मानधनाला चक्क क्रिकेटच्या मैदानात गुडघ्यावर बसून प्रपोज करताना दिसतोय. मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमवर स्मृतीला सरप्राईज देत पलाशनं प्रपोज केलं. या व्हिडीओमध्ये स्मृतीसोबत पलाशही काहीसा इमोशनल झाल्याचं पाहायला मिळतंय. पलाशनं शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत असल्याचं पाहायला मिळतंय. दरम्यान, क्रिकेटपटू स्मृती मानधना 23 नोव्हेंबर रोजी पलाश मुच्छल याच्याशी लग्न करणार आहे.
लग्नापूर्वी पलाशचं स्मृतीला सरप्राईज
पलाश मुच्छलनं त्याच्या ऑफिशियल अकाउंटवरुन एक व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओच्या सुरुवातीलाच पलाश आणि स्मृती डीव्हाय पाटील स्टेडियममध्ये एन्ट्री करताना दिसतायत. पण, स्मृतीचे डोळे झाकलेले आहेत आणि पलाश तिला हात पकडून स्टेडियममध्ये घेऊन येतोय. पण, जसं स्मृती तिच्या डोळ्यावरची पट्टी काढते, तसा तिला आश्चर्याचा धक्का बसतो. तेवढ्यात पलाश गुडघ्यावर बसून तिला प्रपोज करत एक लाल गुलाबांच्या फुलांचा गुच्छ देतो आणि गुडघ्यावर बसून तो तिला अंगठी घालून प्रपोज करतो. त्याच क्षणी स्मृती खूपच इमोशनल होते. तसा पलाशही काहीसा भावूक होतो आणि स्मृतीला मिठी मारतो.
View this post on Instagram
स्मृती मानधनाचा होणारा नवरा पलाश मुच्छल कोण?
22 मे 1995 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे जन्मलेले पलाश मुच्छल एका मारवाडी कुटुंबात वाढलाय, जिथे संगीत म्हणजे, जवळजवळ या कुटुंबाची मातृभाषाच होती. त्याची बहीण, पलक मुच्छल एक लोकप्रिय पार्श्वगायिका आहे, पण पलाशनं खूप लहान वयातच आपली स्वतःची ओळख निर्माण केली.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलेल्या पलाशनं अशा वेळी संगीत रचना करण्याचा प्रयोग सुरू केला, जेव्हा बहुतेक मुलं अजूनही त्यांच्या आवडींचा शोध घेत होती. मुच्छल भावंड त्यांच्या धर्मादाय कार्यासाठी देखील ओळखली जातात, हृदय शस्त्रक्रियेची गरज असलेल्या वंचित मुलांसाठी हे दोघे बहीण-भाऊ मोठा निधी उभारतात. आता, स्मृती लवकरच पलाशसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























