Paatal Lok 2 : Free मध्ये पाहा पाताल लोक 2, फक्त करावं लागेल 'हे' काम; जियोकडून कोट्यवधी युजर्ससाठी गूड न्यूज
Paatal Lok 2 Watch Free : 17 जानेवारीला पाताल लोक 2 वेब सीरिज रिलीज झाली आहे. ही सीरीज फ्रीमध्ये कशी पाहता येईल, ते जाणून घ्या.
Paatal Lok 2 Web Series Watch Free : बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पाताल लोक 2 वेब सीरीज 17 जानेवारीला प्रदर्शित झाली आहे. ही वेब सीरिज प्राईम व्हिडीओवर पाहता येईल. यादरम्यान, रिलायन्सने जिओने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे. जिओने सुमारे 49 कोटी ग्राहकांसाठी चांगली बातमी दिली आहे. जर तुम्ही ओटीटी कंटेटचे चाहते असाल, म्हणजेच तु्म्हाला वेब सीरिज पाहण्याची आवड असेल, तर ही ऑफर तुमच्यासाठी खास आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला नुकतीच रिलीज झालेली वेब सीरिज 'पाताल लोक 2' फ्रीमध्ये पाहात येईल. ही वेब सीरिज पाहण्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शनसाठी कोणतही अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नाही. ही ऑफर नेमकी काय आहे आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल ते जाणून घ्या.
फ्रीमध्ये पाहता येईल पाताल लोक 2
जिओच्या एका खास रिचार्ज प्लॅनसह, तुम्ही 'पाताल लोक 2' ही वेब सीरीज कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय पाहू शकता. या खास ऑफरमुळे अनेक मोबाईल युजर्सची एक मोठी चिंता दूर झाली आहे. मोफत वेब सीरीज पाहण्यासोबत, जिओच्या या खास रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला दीर्घ वैधता, अमर्यादित मोफत कॉलिंग आणि भरपूर डेटा देखील मिळेल. एकाच रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात.
जिओची ग्राहकांसाठी खूशखबर
जिओच्या अनेक रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक ओटीटी ॲप्सचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. 'पाताल लोक 2' वेब सीरिज 17 जानेवारीपासून अमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम होत आहे. ही वेब सीरीज पाहण्यासाठी तुम्हाला Amazon Prime Video चे सबस्क्राईब करावं लागेल. पण जर तुम्हाला यासाठी वेगळं सबस्क्रिप्शन घ्यायचं नसेल, तर तुम्ही जिओच्या खास रिचार्ज प्लॅनसह पाताल लोक 2 मोफत पाहू शकता.
जिओचा 1029 रुपयांचा प्लॅन (Reliance Jio Rs 1029 Plan)
रिलायन्स जिओने 1029 रुपयांचा एक भन्नाट प्लॅन आणला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांची वैधता मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित मोफत कॉलिंग करू शकता. याशिवाय, तुम्हाला दररोज 100 मोफत एसएमएस देखील मिळतील.
जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला एकूण 168 जीबी हाय-स्पीड डेटा मिळेल. तुम्ही दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा वापरू शकता. या प्लॅनमध्ये अमेझॉन प्राइम लाइटचे 84 दिवसांचे सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे. याद्वारे तुम्हील पाताल लोक 2 सीरीज मोफत पाहू शकता. या प्लॅनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला एकाच प्लॅनमध्ये मोफत कॉलिंग आणि ओटीटी सबस्क्रिप्शन दोन्ही मिळणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :