OTT Upcoming Do Patti : दो पत्तीच्या ऑडिशनवेळी कृती सेननं 10 अॅक्टर्सना डावलून केली 'या' टेलिव्हिजन स्टारची निवड; कोण आहे 'हा' अभिनेता?
OTT Upcoming Do Patti : कृतीनं तब्बल 10 अॅक्टर्सचे ऑडिशन्स घेतल्यानंतर 'ध्रुव'च्या भूमिकेसाठी प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याची निवड केली.
OTT Upcoming Do Patti : कृती सेननचा (Kriti Senan) आगामी चित्रपट 'दो पट्टी'चा (Do Patti) ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या चित्रपटात कृती आणि काजोल स्क्रिन शेअर करणार आहेत. तसेच, या दोघींचा तुम्ही यापूर्वी कधीही पाहिली नसेल, असा अंदाज पाहता येणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, आगामी चित्रपटात कृती दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. 'दो पत्ती'मध्ये अभिनयासोबतच कृतीनं या चित्रपटाची निर्मिती देखील केली आहे. चित्रपटाच्या लेखिका कनिका ढिल्लननं बोलताना सांगितलं की, कृतीनं तब्बल 10 अॅक्टर्सचे ऑडिशन्स घेतल्यानंतर 'ध्रुव'च्या भूमिकेसाठी प्रसिद्ध टीव्ही अभिनेता शाहीर शेखची निवड केली.
कनिका ढिल्लन बोलताना म्हणाली की, "कृतीनं या चित्रपटात अभिनय केला आहे. तसेच, ती या चित्रपटाची निर्मातीसुद्धा आहे. कृतीनं स्वतः सर्व ऑडिशन्स घेतल्यात. ती म्हणाली, शेवटच्या 10 राऊंडसाठी मी स्वतः ऑडिशन घेईन. ती स्वतः जाऊन सर्वांची ऑडिशन घ्यायची.कृती ऑडिशन्ससाठी आली आहे, या विचारानंच कित्येक अॅक्टर्स घाबरले होते. कनिका ढिल्लनच्या म्हणण्यानुसार, कृतीनं तिला सांगितलं होतं की, चित्रपटासाठी योग्य ध्रुव मिळणं तिच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
शाहीर शेखसोबत जुळली केमिस्ट्री
कृती सेनननं लेखिकेला सांगितलं होतं की, तिला तिच्या चित्रपटातील ध्रुवच्या भूमिकेसाठी परफेक्ट अॅक्टर हवा आहे. कारण चित्रपटात तिची ध्रुवसोबतची केमिस्ट्री खूप महत्त्वाची आहे. शाहीर शेखसोबतच्या ऑडिशनच्या वेळी तिला वाटलं की, त्याच्यासोबतच केमिस्ट्री जुळतेय. त्यामुळे कृतीनं बॉलिवूड स्टार्सना सोडून टेलिव्हिजन स्टारची निवड केली.
'दो पत्ती' कधी रिलीज होणार?
काजोल, कृती सेनॉन आणि तन्वी आझमी स्टारर 'दो पट्टी' हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहून हा मर्डर मिस्ट्री असल्याचा अंदाज बांधता येतो. सस्पेन्स आणि थ्रिलनं भरलेला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 'दो पत्ती' 25 ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :