(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'कोटा फॅक्टरी'च्या तिसऱ्या सीझनसह जीतू भैय्या येणार, 'या' आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?
OTT Release This Weekend : बहुप्रतिक्षीत कोटा फॅक्टरी या वेब सीरिजचा पुढील सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोमान्स, अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा अशा वेगवेगळ्या धाटणीच्या प्रेक्षकांना चित्रपट, वेब सीरिज पाहता येणार आहेत.
OTT Release This Weekend : हा वीकेंड प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. या आठवड्यात ओटीटीवर वेगवेगळ्या जॉनरचे चित्रपट, सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. बहुप्रतिक्षीत कोटा फॅक्टरी (Kota Factoru Season 3) या वेब सीरिजचा पुढील सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोमान्स, अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा अशा वेगवेगळ्या धाटणीच्या प्रेक्षकांना त्यांच्या आवडीच्या जॉनरचे चित्रपट, वेब सीरिज पाहता येणार आहेत.
>> कोटा फॅक्टरी सीझन 3 Kota Factory Season 3
नीट-जेईईच्या परीक्षा देण्यासाठी देशभरातील विद्यार्थी राजस्थानमधील कोटा येथे जाऊन तयारी करत असतात. या कोटामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांच्या भावविश्वावर आधारीत असलेली 'कोटा फॅक्टरी' ही वेब सीरिज गाजली. आता या वेब सीरिजचा पुढील सीझन या आठवड्यात रिलीज होत आहे.
कोणत्या ओटीटीवर कधी रिलीज होणार? - नेटफ्लिक्सवर 20 जून रोजी रिलीज होणार
>> अरनमनई-4 Aranmanai 4
तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना यांची भूमिका असलेला हॉरर-कॉमेडीपट 'अरनमनई 4' ओटीटीवर रिलीज होणार आहे. तमिळ भाषेत असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती.
कोणत्या ओटीटीवर कधी रिलीज होणार? - डिस्नी हॉटस्टार प्लसवर 21 जून रोजी रिलीज होणार
>> हाऊस ऑफ ड्रॅगन सीझन 2 House Of Dragon Season 2
जॉर्ज आरआर मार्टिन यांच्या 'फायर अॅण्ड ब्लड' कांदबरीवर आधारीत 'हाऊस ऑफ ड्रॅगन' ही वेब सीरिज आहे. या सीझनमधील कथानक हे किंग वायसर्सच्या मृत्यूनंतर काय घडतं यावर आधारीत आहे.
कोणत्या ओटीटीवर रिलीज? - ही वेब सीरिज 17 जूनपासून जिओ सिनेमावर स्ट्रीम होत आहे.
>> एजेंट्स ऑफ मिस्ट्री
सस्पेन्स-थ्रिलर असलेली एजेंट्स ऑफ मिस्ट्री ही वेब सीरिज तुम्हाला पाहता येईल. काही चौकशी अधिकाऱ्यांना एक टास्क दिला जातो. आता हा टास्क कसा पूर्ण करतील, त्यात काय अडचणी येतील, गूढ काय याभोवती ही वेब सीरिज आहे.
कोणत्या ओटीटीवर रिलीज? ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर 18 जूनपासून स्ट्रीम होत आहे.
>> आऊटस्टँडिंग - ए कॉमेडी रिव्होल्यूशन
LGBTQIA+ समुदाय आणि त्यांच्याशी संबंधित काही महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य करणारी ही डॉक्युमेंटरी सीरिज आहे.
कोणत्या ओटीटीवर रिलीज? ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर 19 जूनपासून स्ट्रीम होत आहे.
>> लव्ह इज ब्लाइंड
लव्ह इज ब्लाइंड या वेब सीरिजचे पहिले तिन्ही सीझन हिट झाले होते. चौथ्या सीझनमध्ये काही नवीन चेहरे दिसणार आहेत.
कोणत्या ओटीटीवर रिलीज? ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर 19 जूनपासून स्ट्रीम होत आहे.
>> गँग्स ऑफ गॅलिसिया
या वेब सीरिजची गोष्ट अॅना नावाच्या एका वकिलाच्या भोवती फिरते. एका शहरात स्थायिक झाल्यानंतर एका ड्रग्ज डिलरसोबत तिची गाठ पडते. त्यानंतर अॅनाच्या आयुष्यात घडामोडी घडतात की जिचा विचार तिने केलेला नसतो.
कोणत्या ओटीटीवर रिलीज? ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर 21 जूनपासून स्ट्रीम होणार आहे.