Oscars 2024 Oppenheimer : 'ऑस्कर'वर 'ओपनहायमर' चा डंका! कोण होते शास्त्रज्ञ रॉबर्ट ओपनहायमर?
Oscars 2024 : 'ऑस्कर 2024'मध्ये ख्रिस्तोफर नोलनच्या (Christopher Nolan) 'ओपनहायमर' (Oppenheimer) या सिनेमाला सात पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे जगभरात 'ओपनहायमर' चर्चेत आहे.
Oscars 2024 Oppenheimer : 'ऑस्कर 2024' (Oscars 2024) या पुरस्कार सोहळ्यात बॉक्स ऑफिस गाजवलेल्या 'ओपनहायमर' (Oppenheimer) या सिनेमाने बाजी मारली आहे. ऑस्करमध्ये या सिनेमाला 13 नामांकन जाहीर झाले होते. त्यापैकी सात पुरस्कारांवर या सिनेमाने आपलं नाव कोरलं आहे. भगवद् गीतेचा अभ्यासक ते अणूबॉम्बचा चाहता असणाऱ्या जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांची गोष्ट या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
अणुबाँबचा शोध लावणाऱ्या जे रॉबर्ट ओपनहामयरवर (Oppenheimer) चित्रपट असून या चित्रपटाला जगभरातल्या प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या चित्रपटाच्या प्रसिद्धीवर आता ऑस्करनेही शिक्कामोर्तब केल्याचं दिसतंय. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा ख्रिस्तोफर नोलनने (Christopher Nolan) सांभाळली आहे. या सिनेमासाठी त्यालाही ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.
'ऑस्कर'मध्ये ओपनहायमरचा ठसा
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - रॉबर्ट डाउनी ओपनहायमर (Robert Downey JR Oppnehimer)
- फिल्म एडिटिंग - ओपनहायमर (Oppenheimer)
- सर्वोत्कृष्ट सिनेमॅट्रोग्राफी - ओपनहायमर (Oppneheimer)
- सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर - ओपनहायमर (Oppenheimer)
- सर्वोत्कृष्ट चित्रपट - ओपनहायमर (Oppenheimer)
-सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - ख्रिस्तोफर नोलन (Christopher Nolan - Oppenheimer)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता - सिलियन मर्फी (Cillian Murphy - Oppenheimer)
ख्रिस्तोफर नोलन जगभरातील बॉक्स ऑफिसवरचा राजा!
ख्रिस्तोफर नोलन हा हॉलिवूडमधील आघाडीचा दिग्दर्शक असून त्याचे चित्रपट म्हणजे प्रेक्षकांना एक प्रकारची पर्वणीच असते. नोलन यांच्या कल्पना अशा काही भव्य दिव्य असतात की त्यामुळे त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहतात. टेनेट (Tenet), द डार्क नाइट राइजेस (The Dark knight Rises), इंटरस्टेलर (Interstellar), इन्सेप्शन (Inception), बॅटमॅन बिगिन्स (Batman Begins), इन्सोमॅनिया (Insomnia), द डार्क नाइट (The Dark Night), डंकर्क (Dunkirk), मोमेंटो (Memento), द प्रेस्टिज (The Prestige) हे ख्रिस्तोफर नोलनचे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. बॉक्स ऑफिसवर या सिनेमांनी चांगलाच गल्ला जमवला आहे. त्यामुळे ख्रिस्तोफर नोलन हा जगभरातील बॉक्स ऑफिसवरचा राजा आहे.
कोण आहे जे रॉबर्ट ओपनहायमर? (Who is J. Robert Oppenheimer)
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लागलेल्या अणुबाँबच्या शोधाने अवघ्या जगाला बदलवून टाकलं. अमेरिकेने त्याचा वापर करत जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांना बेचिराख केलं. आजही जगावर अणुबाँबचे संकट कायम असून जग त्याच्या भीतीच्या छायेखाली वावरतंय. त्याच अणुबाँबचा शोध जे रॉबर्ट ओपनहायमर यांनी लावला.
भगवद् गीतेचा अभ्यासक
अणुबाँबचा जनक समजल्या जाणाऱ्या ओपनहायमरने भगवद् गीतेचा अभ्यास केला होता. 16 जुलै 1945 साली मेक्सिकोच्या ट्रिनीटी केंद्रावर अणुबाँबची चाचणी करण्यात आली होती त्यावेळी त्याने भगवद् गीतेतील श्लोकांचा आधार घेत त्याचं समर्थन केलं होतं.
'श्री भगवानुवाच कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्तः। ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः।।'
'या विश्वाचा नाश करणारा मी काल आहे, आता मी अधर्माचा विनाश करण्यासाठी आलो आहे.'
ख्रिस्तोफर नोलन हा 21 व्या शतकातील सर्वात यशस्वी दिग्दर्शकांपैकी एक आहे. द डार्क ट्रायालॉजी, इन्सेप्शन, इंटरस्टेलर, ओपनहायमर सारख्या प्रसिद्ध चित्रपटांचे दिग्दर्शन ख्रिस्तोफर नोलनने केलं आहे.
संंबंधित बातम्या