Ashok Saraf : 'बरोबर दहा वर्षांनी भेट झाली!' हास्यजत्रेच्या मंचावरुन ओंकार राऊतची अशोक सराफांसाठी खास पोस्ट
Ashok Saraf : ओंकार राऊतने महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
Onkar Raut on Ashok Saraf : संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांच्या विनोदांनी खळखळून हसवलं अशा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफांकडून कौतुकाची थाप मिळणं ही प्रत्येक कलाकारासाठी खूप खास गोष्ट असते. अशोक सराफांचे (Ashok Saraf) सिनेमे हे आजच्या तारखेलाही प्रत्येक पिढीला तितकेच पसंतीस उतरतात. त्यामुळे त्यांच्या अभिनयावर आणि त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग हा फार मोठा आहे.
अशोक सराफांनी काम पाहणं आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळणं ही कलाकार म्हणून प्रत्येकासाठी आनंदाची गोष्ट असते. अशीच एक खास पोस्ट अभिनेता ओंकार राऊत याने शेअर केली आहे. अशोक सराफ यांनी नुकतीच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी ओंकार राऊतने याने अशोक सराफांसोबतचे फोटो शेअर करत त्यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.
'बरोबर दहा वर्षांनी भेट झाली!'
ओंकारने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलं की, बरोबर दहा वर्षांनी भेट झाली! खूप छान वाटलं! काय लिहू? काय नको? हे कळत नाहीये. तुमच्या सोबत काम करण हे अनेकांचं स्वप्न असत आणि ते स्वप्न माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकातच पूर्ण झालं! तेव्हा जे जे तुमच्याकडून शिकलो ते आता थोडफार वापरण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला भेटून तुम्ही माझ्याशी काय बोलाल याची उत्सुकता होती. “आता अजून चांगल करायला लागलास रे!! गुड! कीप इट अप!!” हे वाक्य तुमच्या तोंडून ऐकलं आणि मी धन्य झालो!! Thank You अशोक मामा!!MHJ चे skits बघताना तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मलाच जास्त भारी वाटलं.
View this post on Instagram
लाईफलाईन सिनेमातून अशोक सराफ प्रेक्षकांच्या भेटीला
महाराष्ट्र भूषण अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अशोक सराफ यांच्यासोबत माधव अभ्यंकर यांची प्रमुख भूमिका असणार आहे. नुकतच बहुचर्चित 'लाईफलाईन' (Lifeline) या सिनेमचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. येत्या 2 ऑगस्ट रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमा आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरा यांच्यातील संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून प्रख्यात डॉक्टर आणि एका किरवंतामध्ये ही चुरस रंगणार आहे.