Marathi Serial Satvya Mulichi Satavi Mulgi Updates : 'सातव्या मुलीची सातवी..'मध्ये विरोचकाचा होणार वध; ऐश्वर्या नारकरांची मालिकेतून एक्झिट?
Marathi Serial Satvya Mulichi Satavi Mulgi Updates : विरोचकाचा वध होणार असल्याने आता या मालिकेतून ऐश्वर्या नारकर देखील मालिकेतून एक्झिट घेणार का, याची चर्चा रंगली आहे.
![Marathi Serial Satvya Mulichi Satavi Mulgi Updates : 'सातव्या मुलीची सातवी..'मध्ये विरोचकाचा होणार वध; ऐश्वर्या नारकरांची मालिकेतून एक्झिट? Marathi Serial Satvya Mulichi Satavi Mulgi Updates Netra will killed Virochak in upcoming episode of Satvya Mulichi Satavi Mulgi serial aishwarya narkar titiksha tawade Marathi Serial Satvya Mulichi Satavi Mulgi Updates : 'सातव्या मुलीची सातवी..'मध्ये विरोचकाचा होणार वध; ऐश्वर्या नारकरांची मालिकेतून एक्झिट?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/06/16f66bc0a38576b05402c75c5c8c66e21722926367778290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Marathi Serial Satvya Mulichi Satavi Mulgi Updates : छोट्या पडद्यावर सध्या सुरू असलेल्या मालिकांच्या कथानकात वेगवेगळे ट्वीस्ट पाहायला मिळत आहे. झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेतही नवीन ट्विस्ट येणार आहे. त्रिनयना देवीच्या मदतीने नेत्रा आता विरोचकाचा वध करणार आहे. विरोचकाचा वध होणार असल्याने आता या मालिकेतून ऐश्वर्या नारकर देखील मालिकेतून एक्झिट घेणार का, याची चर्चा रंगली आहे.
झी मराठी वाहिनीवर 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका चांगलीच प्रसिद्ध आहे. मागील काही दिवसांपासून मालिकेत नवे ट्विस्ट येत आहेत. नेत्राच्या नेत्रा व राजाध्यक्ष कुटुंबाला त्रिनयना देवीचा आशीर्वाद कळतो तो म्हणजे नेत्रा पाच नाही तर सात महिन्यांची गरोदर आहे. नेत्राला जुळी मुलं होणार असल्याची बातमी कळून सगळ्यांच्याच आनंदाला पारावार उरलेला नाही. राजाध्यक्ष कुटुंब विरोचकाला या जुळ्या मुलांची कुठल्याच प्रकारे माहिती न देण्याचं ठरवतात.
विरोचकाचा होणार वध
देवीनेच विरोचकाचा वध रचला आहे या विचाराने जल्लोषात नेत्राचं डोहाळेजेवण साजरं होतं आणि नेत्राला प्रसूतीकळा सुरू होतात. रुपालीही त्याचसाठी सज्ज झालेली असताना अद्वैत नेत्राला रुपालीच्या तावडीतून वाचवत हॉस्पिटलला घेऊन जायला निघतो. इंद्राणी व राजाध्यक्ष कुटुंब रुपालीला घरात थोपवून धरतात. अद्वैत नेत्राला हॉस्पिटलला घेऊन चाललेला असतानाच गाडी बिघडते. उपाय म्हणून अद्वैत हातगाडीवरून नेत्राला घेऊन जात असताना त्या हातगाडीचं चाक निखळतं आणि तेव्हाच नेत्राचा जीव वाचवायला एक हात येऊन ती हातगाडी धरतं आणि दिसतं की नेत्राला घेऊन जाणारी... अद्वैत च्या मदतीला धावून आलेली डॉक्टरचा वेश धारण केलेली त्रिनयना देवी आहे... ती त्रिनयना देवीच्या मंदिरालाच हॉस्पिटल म्हणून सांगत नेत्राला मंदिरात घेऊन जाते.
त्रिनयना देवीच्या मंदिरात एक दिव्य प्रकाशझोत पसरतो आणि नेत्रा जुळ्या बाळांची आई होते. देवी तिच्या मूर्त रूपात दर्शन देत नेत्राच्या हाती कट्यार देते. तिची पूर्वसूचना (Premonition) मिळण्याची जी ताकद आहे ती विरोचक वधासोबतच नष्ट होईल असं सांगते. नेत्रा विरोचकाचा वध करते. वध होताच त्रिनयना देवीवर रक्ताचा अभिषेक होतो परंतु त्या रक्ताचाच एक थेंब प्रवाही दिसतो. आता या मागील नेमकं रहस्य काय? कोणत्या नव्या संकटाची चाहुल आहे का, हे आता येणाऱ्या भागात दिसेल.
View this post on Instagram
ऐश्वर्या नारकर मालिका सोडणार?
या मालिकेत ऐश्वर्या नारकर या विरोचक आहेत. ऐश्वर्या यांनी खलनायिका भूमिका मोठ्या ताकदीने साकारली आहे. आता, मालिकेत नेत्राकडून विरोचकाचा वध होणार आहे. त्यामुळे ऐश्वर्या नारकर यांची मालिकेतून एक्झिट होणार का, याची चर्चा सुरू झाली आहे. मालिकेतील एका एपिसोडमध्ये विरोचक आहे, असे सांगण्यात आले. त्यामुळे खरंच विरोचकाचा मृत्यू होणार की आणकी कोणत्या नव्या रुपात विरोचक येणार, याकडे ही प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)