एक्स्प्लोर

Nithya Menon On Motherhood Without Marriage: लग्न न करताच मूल जन्माला घालणं योग्यच, 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचं स्पष्ट मत; म्हणाली, 'आजकाल आई होण्यासाठी कित्येक मार्ग...'

Nithya Menon On Motherhood Without Marriage: काही दिवसांपूर्वी कन्नड अभिनेत्री भावना हिनं लग्न न करताच आई होण्याचा निर्णय घेतला. पण, तिच्या या निर्णयाचा अनेकांनी निषेध केला. तसेच, तिच्यावर अनेकांनी जोरदार टीकाही केली.

Nithya Menon On Motherhood Without Marriage: बॉलिवूडची (Bollywood News) सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पादुकोण (Actress Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंह (Actor Ranveer Singh) दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. नुकतीच दोघांनी आपल्या चाहत्यांसोबत गूड न्यूज शेअर केली आहे. चाहत्यांकडून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच एका अभिनेत्रीनं केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. कन्नड अभिनेत्री नित्या मेनन (Nithya Menen) सध्या तिच्या सिनेमांमुळे नाहीतर नातेसंबंध आणि मुलांविषयी तिनं केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. मुलं होण्यासाठी किंवा आई होण्यासाठी लग्न करण्याची गरज नसते, असं वक्तव्य अभिनेत्री नित्या मेनन हिनं केलं आहे. 

लग्न न करताच आई होण्याचा निर्णय कन्नड अभिनेत्री भावना हिनं घेतला होता. नित्यानं तिच्या निर्णयाचं समर्थन केलंय. नित्याचं असं मत आहे की, यात काहीही चुकीचं नाही आणि त्या अभिनेत्रीचा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे. 

विवाहाशिवाय आई होण्याच्या निर्णयावरुन निर्माण झालेला वाद 

काही दिवसांपूर्वी कन्नड अभिनेत्री भावना हिनं लग्न न करताच आई होण्याचा निर्णय घेतला. पण, तिच्या या निर्णयाचा अनेकांनी निषेध केला. तसेच, तिच्यावर अनेकांनी जोरदार टीकाही केली. अनेकांनी भावनाच्या निर्णयावर अनेक प्रश्नही उपस्थित केले. लग्न करणं म्हणजे, केवळ मुलं जन्माला घालणंच असतं का? काही वर्षांपूर्वी या विचारावर आधारित 'कदलिक्का नेरमिले' (Kadalikka Neramille) हा सिनेमा आलेला. या सिनेमात नित्या मेनननं मुख्य भूमिका साकारली होती. सिनेमाच्या प्रमोशनवेळी, तिनं 'इंडिया ग्लिट्झ तमिळ' (India Glitz Tamil) या युट्यूब चॅनेलला एक मुलाखत दिली होती. आता याच मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे.  

लग्न न करताच गरोदर होण्यात वावगं काय? : नित्या मेनन 

मुलाखतीत ज्यावेळी नित्या मेनन हिला विचारण्यात आलं की, लग्नापूर्वी गरोदर होणं योग्य आहे की, नाही? त्यावेळी नित्यानं म्हटलेलं की, "लग्नानंतर गरोदर राहण्याच्या तुलनेत लग्नापूर्वी गरोदर राहणं उत्तम आहे. लग्न न करताच गरोदर राहणं यात वावगं काय? जर तुम्हाला मूल हवंय, तर लग्न न करणंही योग्यच आहे... "

हल्ली मूल जन्माला घालण्याचे अनेक पद्धती आहेत आणि कित्येकजण याचा अवलंब करतात, असंही नित्या मेनन म्हणाली. यावेळी जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आलं की, तुझी पसंत काय आहे? वैवाहित आयुष्य की, मूलाशिवाय आयुष्य? यावर अभिनेत्रीनं म्हटलं की, वैवाहिक संबंध आणि मूलाशिवाय आयुष्य... माझी आवड आहे. नित्याचं हे वक्तव्य सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतंय. 

लग्नाबाबत करण्याची अजिबात घाई नाही

बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी नित्या मेनन आता 38 वर्षांची झाली आहे, तरीही ती अजूनही अविवाहित आहे. लग्नाबाबतच्या एका जुन्या मुलाखतीत नित्यानं सांगितलं होतं की, लग्न करण्यासाठी तिला कोणतीही घाई नाही. या अभिनेत्रीनं म्हटलेलं की, "घरातून माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकला जात होता. लहानपणापासूनच मला एका जोडीदाराची ओढ होती आणि त्याच्यासोबत एक सुंदर आयुष्य व्यतीत करण्याची माझी इच्छा होती. मात्र, मला तसा जोडीदार कधीच मिळाला नाही..."

नित्या मेनच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, नित्या अखेरची गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'इडली कडाई' (Idli Kadai) सिनेमात दिसलेली. या सिनेमात मुख्य भूमिका साकारणाऱ्या धनुषसोबत तिनं काम केलं होतं. याव्यतिरिक्त, 'थलाईवन थलाईवी' (Thalaivan Thalaivi) या सिनेमात ती विजय सेतुपतीसोबत दिसलेली. तसेच, तिनं नुकतंच स्वतःचं प्रोडक्शन हाऊस देखील सुरू केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Filmfare Marathi 2026‘गोंधळ’चा 'फिल्मफेअर मराठी' मध्ये डंका; 19 नामांकनांपैकी 6 पुरस्कार! शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
‘गोंधळ’चा 'फिल्मफेअर मराठी' मध्ये डंका; 19 नामांकनांपैकी 6 पुरस्कार! शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
'मुसाफिर कॅफे'मधील अभिनेत्रीची ही क्राईम थ्रिलर पाहून चक्रावून जाल; 2 तास 55 मिनिटांचा जबरदस्त थरार, कुठे पाहाल?
'मुसाफिर कॅफे'मधील अभिनेत्रीची ही क्राईम थ्रिलर पाहून चक्रावून जाल; 2 तास 55 मिनिटांचा जबरदस्त थरार, कुठे पाहाल?
Swara Bhasker Hospitalised: 'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
Joru Ka Ghulam Director Arrested: नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?
नशेचे पदार्थ दिले, घरी बोलावून नको नको ते केले; अभिनेत्रीच्या आरोपानंतर 'जोरु का गुलाम' चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अटक, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Mojtaba khamenei Video: कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
कधी मृत्यू, कधी गंभीर जखमी, तर कधी इराणमध्ये नाहीतच अशी चर्चा रंगली असतानाच सर्वोच्च इराणी नेते मोजतबा खामेनींचा पहिला व्हिडिओ समोर! जमिनीवर बसून सहकाऱ्यांशी 'मन की बात'
Manoj Jarange Patil: 'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
'मी समाजासाठी जीव देऊ शकतो अन् वेळ पडली तर जीव घेऊही शकतो'; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा
IND vs SL : यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
यशस्वीने शून्यावर लाज सोडली, पंत-जुरेलही आले अन् गेले; पडिक्कलने 142 धावा ठोकत सगळं चित्रच पालटलं, अन् सगळ्यांना गप्प केलं
Team India Injury Crisis : टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
टीम इंडियाचे 13 खेळाडू BCCI च्या रुग्णालयात; VVS लक्ष्मणला तातडीने बोलावले, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेआधी नेमकं काय घडतंय?
Embed widget