![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nitesh Rane : 'याला आता मालवणी हिसका दाखवावाच लागेल', मुनव्वरच्या फारुकीच्या वक्तव्यावर नितेश राणेंचा इशारा
Nitesh Rane : मुनव्वर फारुकीच्या वक्तव्यावर आता नितेश राणे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
![Nitesh Rane : 'याला आता मालवणी हिसका दाखवावाच लागेल', मुनव्वरच्या फारुकीच्या वक्तव्यावर नितेश राणेंचा इशारा Nitesh Rane reaction on Munawar Faruqui statement on Kokani Manus in his Stand up comedy Show Nitesh Rane : 'याला आता मालवणी हिसका दाखवावाच लागेल', मुनव्वरच्या फारुकीच्या वक्तव्यावर नितेश राणेंचा इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/12/20f96d43f730fa29a48885f9b821dcec1723478697211720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nitesh Rane : मुनव्वर फारुकीने (Munawar Faruqui) कोकणी माणसाबद्दल वापरलेल्या अपशब्दामुळे आता राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. कोकणी माणसाचा उल्लेख करत त्याने जो शब्दप्रयोग केला, त्यावर आता मनसे आक्रमक झाली. त्यानंतर आता भाजपचे नेते नितेश राणे यांनी देखील यावर आक्रमक भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळतंय. नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मुनव्वरने केलेल्या शब्दप्रयोगांविरोधात आक्षेप नोंदवला आहे.
मुंबईतील एका स्टँडअप कॉमेडी शोदरम्यान मुनव्वरने कोकणी माणसं हे सगळ्यांना चुXX बनवतात, असा उल्लेख केला. त्यानंतर मनसेने त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता नितेश राणे यांनी देखील त्याच्याविरोधात कारवाईची मागणी केली. मुनव्वरने याआधी हिंदू देव देवतांचा अपमान केल्यामुळे त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर त्याला अटक देखील झाली होती.
नितेश राणे यांनी काय म्हटलं?
नितेश राणे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, 'मुनव्वर फारुकीला कोकणी माणसाबद्दल त्याच्या स्टँडअप कॉमेडीमध्ये टिंगल उडवण्याची हौस असेल तर त्याच्या घरच्या पत्ता आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर लवकरच त्याला मालवणी हिसका असा दाखवावा लागेल की, त्याचा पुढचा स्टँडअप कॉमेडी शो तो मालवणीमध्ये करायला लागेल.कोकणातल्या लोकांचा जर अपमान केला तर तुझ्यासारख्यांना पाकिस्तानात पाठवायला जास्त'
मुन्नवरने नेमकं काय म्हटलं?
मुनव्वरच्या एका कार्यक्रमामध्ये लोकांना तो विचारतो की, सगळे मुंबईचेच आहेत ना? इथे येण्यासाठी कुणी प्रवास करुन आलं आहे का? त्यावर प्रेक्षकांमधून एकाने उत्तर दिलं की, मी तळोजावरुन आलोय. आज मी विचारलं तर तळोजा वेगळं झालं आणि जेव्हा यांच्या गावचे लोक विचारतात की, कुठे राहतात, तेव्हा हे लोकं सांगतात की आम्ही मुंबईला राहतो. ही कोकणी माणसं सगळ्यांना च#$ बनवतात. मुनव्वरच्या या जोकवर प्रेक्षकांमधूनही टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट झाला.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)