Rohit Sharma: रोहित तब्बल 224 दिवसांनी मैदानात उतरुन फेल ठरला, तरीही भारतीय क्रिकेटमध्ये पराक्रमाचा नवा अध्याय जोडला! असा पराक्रम अवघा पाचवा क्रिकेटर
Rohit Sharma: रोहित शर्माचा आंतरराष्ट्रीय प्रवास संस्मरणीय राहिला आहे. 2007 मध्ये आयर्लंडविरुद्ध पदार्पण करणाऱ्या या तेजस्वी फलंदाजाने भारतीय क्रिकेटला अनेक अविस्मरणीय क्षण दिले आहेत.

Rohit Sharma: पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा अपयशी ठरला. अवघ्या 8 धावांवर बाद झाल्याने चाहत्यांची घोर निराशा झाली. तब्बल 225 दिवसांनी मैदानात उतरत असल्याने चाहत्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या, पण रोहितला मोठी कामगिरी करता आली नाही. मात्र, या सामन्यात रोहितने मैदानात पाय टाकताच ऐतिहासिक टप्पा गाठला. या सामन्यासह रोहितने त्याच्या कारकिर्दीतील 500 वा आंतरराष्ट्रीय सामना खेळून भारतीय क्रिकेट इतिहासात एक नवा अध्याय जोडला. ही कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय क्रिकेटपटू ठरला. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर (664), विराट कोहली (551), एमएस धोनी (535) आणि राहुल द्रविड (504) यांनी ही कामगिरी केली होती.
𝐀 𝐦𝐚𝐣𝐨𝐫 𝐦𝐢𝐥𝐞𝐬𝐭𝐨𝐧𝐞 🙌
— BCCI (@BCCI) October 19, 2025
𝐀𝐧 𝐞𝐱𝐜𝐥𝐮𝐬𝐢𝐯𝐞 𝐜𝐥𝐮𝐛 🔝
Congratulations to Rohit Sharma on becoming just the 5️⃣th Indian player to play 5️⃣0️⃣0️⃣ international matches 🇮🇳#TeamIndia | #AUSvIND | @ImRo45 pic.twitter.com/BSnv15rmeH
रोहित शर्माचा आंतरराष्ट्रीय प्रवास संस्मरणीय राहिला आहे. 2007 मध्ये आयर्लंडविरुद्ध पदार्पण करणाऱ्या या तेजस्वी फलंदाजाने भारतीय क्रिकेटला अनेक अविस्मरणीय क्षण दिले आहेत. कसोटी, एकदिवसीय आणि टी20 या तिन्ही स्वरूपात त्याचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर दोन द्विशतके आहेत, जी कोणत्याही फलंदाजासाठी दुर्मिळ कामगिरी आहे.
भारताने सलग 16व्यांदा टॉस गमावला
तथापि, या ऐतिहासिक दिवशीही टॉसमुळे टीम इंडियाचे दुर्दैव कायम राहिले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा सलग 16 वा एकदिवसीय सामना नाणेफेक हरला, ही चिंताजनक आकडेवारी आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक उपांत्य फेरीत भारताने शेवटचा नाणेफेक जिंकला होती, जेव्हा त्यांनी वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडला हरवले होते. तेव्हापासून, भारताने प्रत्येक एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावली आहे.
3 खेळाडूंनी पदार्पण केले
या सामन्यात, अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी भारताकडून पर्दापण केले. नितीशला रोहित शर्माने एकदिवसीय सामन्याची कॅप दिली. दरम्यान, मिचेल ओवेन आणि मॅथ्यू रेनशॉ यांनी ऑस्ट्रेलियासाठी एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले.
इतर महत्वाच्या बातम्या























