एक्स्प्लोर

Raj Thackeray: निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मतदार यादीत 96 लाख बोगस मतदार घुसवलेत; राज ठाकरेंचा खळबळजनक आरोप

Raj Thackeray on Election Commission: राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांचा व्हिडीओ दाखवला. मतदार यादीत प्रचंड मोठा घोळ केल्याचा आरोप. मनसे पदाधिकाऱ्यांना सावध केलं.

Raj Thackeray on Election Commission: निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार यादीत नव्याने 96 लाख बोगस मतदार घुसवले आहेत, असा खळबळजनक आरोप मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केला. मला असं कळालं की, 1 जुलैला निवडणूक आयोगाने (Election Commission) मतदारांची यादी बंद केली. त्यानंतर महाराष्ट्रात मतदारांच्या यादीत 96 लाख खोटे मतदार भरले आहेत, अशी माहिती मला खात्रीलायक सूत्रांनी दिल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले. मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे अशा सर्व शहरांमध्ये तब्बल आठ ते साडेआठ लाख मतदार घुसवण्यात (Voters) आले आहेत. प्रत्येक शहरात आणि गावातील याद्यांमध्ये हे खोटे मतदार घुसवण्यात आले आहेत, असे राज ठाकरे यांनी म्हटले. ते रविवारी मुंबईतील नेस्को मैदानावर झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

राज ठाकरेंच्या सभांना फक्त गर्दी होते, त्यांना मतं मिळत नाहीत, असे सत्ताधारी म्हणत असतात. त्यांचा एकही आमदार आणि खासदार नाही, असेही म्हटले जाते. पण अशाप्रकारे बोगस मतदार घुसवून निवडणुका घेतल्या जात असतील तर आमचे आमदार-खासदार कसे निवडून येणार, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. सत्ताधाऱ्यांकडून मतदार यादीतच गणित सेट केले जात आहे. मग तुम्ही मतदान करा नाहीतर नका करु. मग सामान्य जनतेच्या मतदानाला काय अर्थ उरतो? आम्ही निवडणूक आयोगावर बोललो की, सत्ताधारी चिडतात. तुम्हाला कोणी विचारलंय? आम्ही केलेले आरोप मनाला लागतात म्हणूनच सत्ताधारी बोलत आहेत ना? तुम्हाला राग येतोय कारण तुम्ही शेण खाल्लंय. गल्लीगल्लीत माहिती आहे, कशी सत्ता आली, कसे राजकारण सुरु आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

यंदा विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 232 आमदार निवडून आले. इतकं प्रचंड यश मिळूनही महाराष्ट्रात प्रचंड सन्नाटा होता. कुठेही विजयी मिरवणुका काढण्यात आल्या नाहीत, जल्लोष झाला नाही. मतदारही हा निकाल पाहून अवाक झाले. निवडून आलेल्यांना कळलं नाही, आपण कसे निवडून आलो. मतदार याद्यात बोगस मतदार घुसवून सत्ताधारी स्थानिक पक्षांना संपवत आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. जोपर्यंत महाराष्ट्रातील मतदार याद्या साफ होत नाही, तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊनच दाखवा, असे आव्हानही राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला दिले.

आणखी वाचा

राज ठाकरे कडाडले, जयंत पाटलांनी पुरावे दाखवले; उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूका रद्द करा; निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Accident News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Radhakrishna Vikhe Patil: 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
Tiger Attack: वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar:पार्थ पवारांवर गुन्हा का नाही हे फडणवीसच सांगू शकतील, नातवावरील आरोपांवर पवारांचे भाष्य
Sharad Pawar : पार्थ पवारांवर गुन्हा का नाही हे गृहमंत्री फडणवीसच सांगू शकतील - पवार
Sharad Pawar : प्रशासकीय गोष्टी वेगळ्या, कौटुंबिक गोष्टी वेगळ्या - पवार
Sharad Pawar PC : आमच्या पक्षात सामूहिक निर्णय घेतले जातात - पवार
Narayan Rane : कणकवलीत ठाकरेंशी युती होणार नाही, राजन तेलींचं जे म्हणणं आहे ते मला मान्य नाही - राणे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Accident News: पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव बाईकस्वाराचा भीषण अपघात; बीआरटी स्टँडच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकलं तरुणाचे डोके अन्...
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शक्तिपीठ मार्ग कोणाला हवाय? झाल्यास शेतकरी भिकेला लागेल; जोपर्यंत तुम्ही सरकारचा गळा पकडून श्वास कोंडत नाही तोपर्यंत कोणी लक्ष देणार नाही, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Radhakrishna Vikhe Patil: 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
Tiger Attack: वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
Ambadad Danve on Ajit Pawar: व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
व्यवहार झालाच नाही, तर रद्द करण्याची वेळ का आली? अजित दादांची वक्तव्ये 'जोक ऑफ द डे'; अंबादास दानवेंचा हल्लाबोल, सीएम फडणवीसांनाही फटकार
Weather Update: पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
पावसाच्या शक्यता ओसरल्या, राज्यभरात गुलाबी थंडीला सुरुवात, जळगावचा पारा 10 अंश! कुठे किती तापमान ?
Sharad Pawar & Parth Pawar: पुणे जमीन घोटाळाप्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
पुणे जमीन घोटाळाप्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही? शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला
Revanth Reddy: काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस; तेलंगणा सीएम रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने ज्युबली हिल्स पोटनिवडणुकीत आरोपांचा धुरळा
काँग्रेस म्हणजे मुसलमान आणि मुसलमान म्हणजे काँग्रेस; तेलंगणा सीएम रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने ज्युबली हिल्स पोटनिवडणुकीत आरोपांचा धुरळा
Embed widget