Bigg Boss Marathi 6 Promo Video: 'बिग बॉस मराठी 6'शी कोकण हार्टेड गर्लच्या नवऱ्याचं खास कनेक्शन; पोस्ट शेअर करत म्हणाली...
Bigg Boss Marathi 6 Promo Video: 11 जानेवारीपासून 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन सुरू होणार आहे. त्यापूर्वी अंकिता वालावलकरनं या सीझनशी तिच्या नवऱ्याचं खास कनेक्शन असल्याचं सांगितलं.

Bigg Boss Marathi 6 Promo Video: काही दिवसांपूर्वीच सलमान खान (Salman Khan) होस्ट करत असलेल्या 'बिग बॉस 19'नं (Bigg Boss 19) प्रेक्षकांचा निरोप घेतला. टेलिव्हिजन सुपरस्टार गौरव खन्नानं (Gaurav Khanna) यंदाच्या सीझनची ट्रॉफी उंचावली. जसा 'बिग बॉस 19'चा फिनाले जवळ आला, तशी 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) सहाव्या पर्वाची घोषणा करण्यात आली. 'बिग बॉस मराठी'चा होस्ट रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) बिग बॉस हिंदीच्या घरात जाऊन स्वतः नव्या सीझनची घोषणा केलेली. अखेर आता, 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनचा पहिली प्रोमोही समोर आली आहे. अशातच आता कलर्स मराठीवर बिग बॉसचं दणक्यात प्रमोशन सुरू झालं आहे. 11 जानेवारीपासून 'बिग बॉस मराठी'चा सहावा सीझन सुरू होणार आहे.
'बिग बॉस मराठी 6'चा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. पण, प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर 'बिग बॉस मराठी'च्या आधीच्या सीझनमध्ये झळकलेल्या एका स्पर्धकाच्या एका पोस्टनं सर्वांचं लक्ष वेधलं. तो स्पर्धक म्हणजे, कोकण हार्टेड गर्ल (Kokan Hearted Girl) अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) . सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमध्ये अंकितानं तिचा नवरा कुणाल भगतचं 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वाशी खास कनेक्शन असल्याचं सांगितलं आहे. अंकिताच्या पोस्टवरुन तिचा नवरा तर आता बिग बॉसच्या घरात जाणार नाही ना? अशी चर्चा रंगलेली.
अंकितानं सोशल मिडिया पोस्टमध्ये काय सांगितलं?
'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या सीझनच्या प्रोमोचं आणि अंकिता वालावलकरच्या नवऱ्याचं खास कनेक्शन आहे. याबाबत स्वतः अंकितानं पोस्ट करुन माहिती दिली आहे. अंकितानं सांगितलं की, तिच्या नवऱ्यानं म्हणजेच, कुणाल भगतनं 'बिग बॉस मराठी 6'च्या प्रोमोचं म्युझिक दिलं आहे. तसेच, 'बिग बॉस मराठी 6'चा प्रोमो अंकिता वालावलकरच्या नवऱ्याच्या मड आय स्टुडिओमध्ये एडिट केला गेला आहे. अंकितानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये स्टुडिओमध्ये प्रोमो एडिट करतानाची झलकही दाखवली आहे. त्यासोबतच तिनं 'बिग बॉस मराठी 5'च्या प्रोमोचं म्युझिकही कुणालनंच केलं होतं, अशी माहिती दिली आहे. "हे काम बघताना आमचा सीझन आठवला", असंही अंकिता व्हिडीओत म्हणाली आहे.
View this post on Instagram
दरम्यान, बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझननं प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन केले. या सीझनचा विजेता सूरज चव्हाण आणि इतर स्पर्धकही चाहत्यांच्या मनात राहिले आहेत. बिग बॉस 19 संपल्यानंतर बिग बॉसच्या मंचावर अभिनेता रितेश देशमुख गेल्यानं प्रेक्षकांच्या भुवया उंचावल्या होत्या. सलमान खाननं बिग बॉस मराठी सुरू होत असल्याची घोषणा करताच प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























