एक्स्प्लोर

New OTT Release: आर. माधवन करणार 'हिसाब बरारबर', मिथिला म्हणणार 'स्‍वीट ड्रीम्‍स'; 'या' आठवड्यात 7 नव्या फिल्म्स अन् वेब सीरिजची मेजवानी

New OTT Release on Netflix: या आठवड्यात ओटीटीवर 7 नवे चित्रपट आणि वेब सीरिज भेटीला येणार आहेत. आर. माधवन आणि कीर्ती कुल्हारी यांचा 'हिसाब बराबर', तर मिथिला पालकरचा 'स्वीट ड्रीम्स' देखील ओटीटीवर रिलीज होणार आहे.

New OTT Release on Netflix, Prime Video and Hotstar: 'पाताल लोक 2' (Paatal Lok 2), 'चिडीया उड' (Chidiya Udd) आणि 'गृहलक्ष्मी' (Grehlakshmi) सारख्या धमाकेदार वेब सीरिज (Web Series) जानेवारीच्या नव्या आठवड्यात ओटीटीवर रिलीज झाल्या. आता त्यानंतर या आठवड्यातही धमाकेदार वेब सीरिज आणि फिल्म्सची मेजवाणी चाहत्यांनी मिळणार आहे. आर. माधवनचा हजारो कोटींच्या घोटाळ्यावर आधारित असलेला डार्क कॉमेडी 'हिसाब बराबर' रिलीज होणार आहे. तर आपल्या आगळ्या-वेगळ्या अंदाजात चुलबुली गर्ल मिथिला पालकर 'स्‍वीट ड्रीम्‍स' घेऊन भेटीला येत आहे. यामध्ये मिथिला पालकर आणि अमोल पराशर यांची एक गोड आणि तितकीच तिखट लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे. 

'द नाईट एजंट 2' अॅक्शन आणि थ्रिलर प्रेमींसाठी प्रदर्शित होत आहे, तर के-ड्रामा प्रेमींसाठी 'द ट्रॉमा कोड' ही एक नवी सीरिज देखील रिलीज होत आहे. जाणून घेऊयात, या आठवड्यात (20 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 दरम्यान) ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या 7 नवे चित्रपट आणि सीरिजबद्दल जाणून घेऊयात... 

हिसाब बराबर (24 जानेवारी)

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये चर्चेत आलेला आर. माधवनचा 'हिसाब बाराबर' (Hisaab Barabar) ही फिल्म या आठवड्यात ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. हा एक डार्क कॉमेडी चित्रपट आहे, जो हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणूक आणि घोटाळ्यावर आधारित आहे. 'हिसाब बराबर'ची कथा राधे मोहन शर्मा (आर. माधवन) भोवती फिरते, जो एक साधा रेल्वे तिकीट निरीक्षक म्हणजेच, टीसी असतो. त्याला त्याच्या बँक खात्यात एक छोटीशी चूक आढळते. जेव्हा तो काही रुपयांचा प्रश्न सोडवण्यासाठी बँकेत पोहोचतो, तेव्हा सर्वजण त्याची चेष्टा करतात. पण नंतर असं उघडकीस येतं की, ही अनियमितता प्रत्यक्षात हजारो कोटी रुपयांचा एक अकल्पनीय घोटाळा होता. यामध्ये धूर्त बँकर मिकी मेहता (नील नितीन मुकेश) चा समावेश आहे. राधे मोहन जसजसे या भ्रष्टाचारात खोलवर उतरतो, तसतसे कथेचा सूर बदलतो. या चित्रपटात आर. माधवनसोबत कीर्ती कुल्हारी, रश्मी देसाई आणि अनिल पांडे देखील मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 24 जानेवारी 2025 रोजी Zee5 वर रिलीज केला जाणार आहे.

Sweet Dreams (January 24)

अमोल पराशर आणि मिथिला पालकर यांनी एक गोड आणि तिखट लव्हस्टोरी आणली आहे. 'स्वीट ड्रीम्स' ही दोन अनोळखी व्यक्तींची कथा आहे, केनी आणि दिया, जे खऱ्या आयुष्यात कधीही भेटलेले नाहीत. पण ते स्वप्नात पुन्हा पुन्हा एकमेकांना पाहतात. या सीरिजमधली गंमतीशीर गोष्ट म्हणजे, त्याला दररोज एकच स्वप्न पडतं आणि हेच स्वप्न त्यांना एकमेकांना शोधण्यास भाग पाडतं, जी पुढे एका जादुई प्रेमकथेत बदलते. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट 24 जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने+ हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे.

Harlem season 3 (January 23)

दोन शानदार सीझननंतर, 'हार्लेम' वेब सिरीजचा तिसरा सीझन देखील या आठवड्यात ओटीटीवर येत आहे. हा सीरिजचा शेवटचा सीझन आहे. ही चार महत्त्वाकांक्षी महिलांची कहाणी आहे, जी कॅमिल (मेगन गुड), टाय (जेरी जॉन्सन), क्विन (ग्रेस बायर्स) आणि अँजी (शोनिक्वा शांडाई) यांच्याभोवती फिरते. ज्या न्यू यॉर्क शहरातील हार्लेममध्ये प्रेम, करिअर आणि मैत्रीच्या गुंतागुंतीतून मार्गक्रमण करतात. 'हार्लेम सीझन 3' या आठवड्यात 23 जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राईम व्हिडीओवर (Prime Video) स्ट्रीम होणार आहे.

The Night Agent season 2 (January 23)

स्पाय-अ‍ॅक्शन-थ्रिलर 'द नाईट एजंट' त्याच्या दुसऱ्या सीझनसह परतला आहे. या सीझनमध्ये अधिक धमाकेदार अॅक्शन आणि थ्रील अनुभवता येणार आहे. भरभरून स्पाय आणि थ्रील अनुभवायला मिळणार आहे. पीटर सदरलँड (गॅब्रिएल बासो) अजूनही त्याच्या मागील भेटीतून बरा होत असताना, त्याला सीआयएमधील एका देशद्रोही व्यक्तीचा पर्दाफाश करण्यासाठी एका नव्या मोहिमेवर पाठवलं जातं. त्याच्या शोधामुळे नवे खुलासे आणि धक्कादायक गोष्टी समोर येतात. पीटर पुन्हा एकदा रोझ लार्किन (लुसिएने बुचानन) सोबत एकत्र येऊन रहस्य उलगडतो. या सीरिजमध्ये ब्रिटनी स्नो, बर्टो कोलन, लुई हर्थम आणि टेडी सियर्स यांच्याही भूमिका आहेत. ही सीरिज मॅथ्यू क्विर्क यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. 'द नाईट एजंट सीझन 2' 23 जानेवारीपासून ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रसारित होईल.

Shafted (January 24)

'शाफ्टेड' ही फिल्म प्रत्यक्षात 'अल्फा मेल्स' या स्पॅनिश कॉमेडी सीरिजचा फ्रेंच रिमेक आहे. ही कथा चार मध्यमवयीन मित्रांभोवती फिरते, जे पॅरिसच्या आधुनिक जगात समस्यांना तोंड देत आहेत. सेड्रिक (मनु पायेट), टॉम (अँटोइन गौई), जेरेमी (व्हिन्सेंट हेनिन) आणि टोनियो (गुइलॉम लॅबे) यांना असं वाटतं की, या महिलांच्या रोमँटिक आणि व्यावसायिक जीवनात प्रचंड उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं. हे चौघेही पुरुषत्व आणि आधुनिक विचारसरणीच्या पारंपारिक कल्पनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. ही सीरिज 24 जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

The Sand Castle (January 24)

'द सँड कॅन्सल' हा एक लेबनीज थ्रिलर चित्रपट आहे. ही कथा एका नाजूक परिस्थितीत अडकलेल्या कुटुंबाची आणि भूतकाळात लपलेल्या काळ्या सत्याची आहे. या कुटुंबात चार लोक आहेत. नदीन लबाकी, झियाद बकरी, झैन अल रफीया आणि रॅमन अल रफीया या भूमिका साकारत आहेत. ते चौघेही जगापासून दूर एका वेगळ्या बेटावर अडकतात. जगण्यासाठी संघर्ष करत असताना, त्यांना काळ्या रहस्यांचा सामना करावा लागतो. हा चित्रपट 24 जानेवारीपासून नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल.

The Trauma Code: Heroes on Call (January 24)

के-ड्रामा प्रेमींसाठी, 'द ट्रॉमा कोड: हीरोज ऑन कॉल' ही एक नवी आणि रोमांचक दक्षिण कोरियन सीरिज रिलीज होत आहे. हा एक मेडिकल ड्रामा आहे, जो तुम्हाला ऑपरेशन थिएटर आणि सर्जनच्या जगात घेऊन जातो. ही सीरिज बेक गँग-ह्योक (जू जी-हून) ची कथा सांगते, जो एक अपवादात्मक सर्जन आहे. तो एका वैद्यकीय विद्यापीठातील ट्रॉमा टीमचा भाग आहे. पण बेक गँग-ह्योकच्या अपारंपरिक पद्धती आणि दृष्टिकोनामुळे उर्वरित कर्मचाऱ्यांमध्ये तणाव निर्माण होतो. दरम्यान, कथा जसजशी पुढे सरकते तसतसे बेक या संघाला पुन्हा आकार देण्यास सुरुवात करतो. 24 जानेवारीपासून तुम्ही नेटफ्लिक्सवर 'द ट्रॉमा कोड: हिरोज ऑन कॉल' पाहू शकता.

Dìdi (January 26)

Dìdi ही एका नवीन पिढीच्या तरुणाची हृदयस्पर्शी कहाणी आहे. कथानक 2008 मध्ये घडते. ही कथा हायस्कूल, उन्हाळ्याचे शेवटचे महिने आणि 13 वर्षांचा ख्रिस वांग (इझाक वांग) यांच्यावर केंद्रित आहे. क्रिसला एका मुलीवर प्रेम आहे. तो तिला आकर्षित करण्यासाठी स्केटिंग करायला सुरुवात करतो. तो त्याची स्थलांतरित आई चुंगसिंग (जोन चेन) सोबत ही स्केट संस्कृती समजून घेण्याचा प्रयत्न करतो. हा चित्रपट कॅलिफोर्नियामध्ये आशियाई अमेरिकन असण्याचा अनुभव बारकाईने मांडतो. याचे दिग्दर्शन शॉन वांग यांनी केले आहे. तुम्ही ते 26 जानेवारीपासून ओटीटी प्लॅटफॉर्म जिओसिनेमावर पाहू शकता.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy : खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
Radhakrishna Vikhe Patil: काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
Justice Krishna S Dixit on Constitution : कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 22 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सTop 80 at 8AM 22 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याDatta Bharne : तीन पक्ष एकत्र असल्याने मतमतांतर असतं, दत्ता भरणेंचं सूचक वक्तव्यABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 22 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy : खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
खलिस्तानी संघटनेचा दावा, महाकुंभात स्फोट घडवून आणला, ईमेल पाठवून घेतली जबाबदारी; म्हणाले, हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला
Radhakrishna Vikhe Patil: काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
काल कृषीमंत्री म्हणाले योजनेत दोन-चार टक्के भ्रष्टाचार चालतो, आता विखे-पाटील म्हणतात वाळूचे ट्रक आपल्याच लोकांचे, नव्या वादाला तोंड फुटलं
Justice Krishna S Dixit on Constitution : कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणाले, संविधान निर्मितीत ब्राह्मणांचे योगदान; रामाची पूजा करत आलो आहोत, त्यांची मूल्ये राज्यघटनेत समाविष्ट
Saif Ali Khan Jabalpur Property: डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार, प्रकरण नेमकं काय?
डिस्चार्जनंतर घरी परतला, पण सैफ आता नव्या संकटात अडकला; 15000 कोटींची संपत्ती ताब्यात घेणार सरकार
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी, वाहनांचा चक्काचूर
वाशिमच्या कारंजा पोहा मार्गावर 3 वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, 9 गंभीर जखमी
Bombay High Court : मुंबई हायकोर्टानं ईडीला ठोठावला 1 लाखाचा दंड, तपास यंत्रणा नागरिकांचा छळ करु शकत नाहीत, निरिक्षण नोंदवत दिला दणका
ईडी सारख्या तपास यंत्रणांनी कायद्याच्या कक्षेत काम करावं, नागरिकांना छळू नये, मुंबई हायकोर्टाकडून 1 लाख रुपयांचा दंड
Beed : सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
सुटीवर असलेल्या पोलिसाचा कर्तव्यदक्षपणा, चोराकडे सापडले 63 मोबाईल, आंतरराज्यीय टोळीचा छडा लागला
Horoscope Today 22 January 2025 : आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget