त्यांची प्रकृती उत्तम; नफीसा अली यांनी धुडकावल्या गायक लकी अलींच्या निधनाच्या अफवा
प्रेक्षक, श्रोत्यांचं विशेष प्रेम मिळालेल्या याच गायकाच्या निधनाच्या वृत्तानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.
Lucky Ali Death Rumor: नव्वदच्या दशकातील काळ गाजवणारा आणि आजही अनेकांच्याच काळजाचा ठाव घेणारा गायक लकी अली, अवघा काही सेकंद गुणगुणला तरीही समोरची व्यक्ती वेगळ्याच दुनियेत पोहोचते. प्रेक्षक, श्रोत्यांचं विशेष प्रेम मिळालेल्या याच गायकाच्या निधनाच्या वृत्तानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. सोशल मीडियावर त्याच्या निधनाच्या अफवांनी असा काही जोर धरला की अनेकांनीच याबाबतीच चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली. ज्यानंतर अभिनेत्री नफिसा अली यांनी या अफवा धुडकावून लावत सत्य उघड केलं.
लकी अलीची प्रकृती उत्तम असून, त्यांना कोविडचा संसर्गही झाला नसल्याचं नफिसा यांनी स्पष्ट केलं. मंगळवारी नफिसा यांनी ट्विट केलं, 'लकी अली यांची प्रकृती उत्तम असून, दुपारच्या सुमारासच आमचं बोलणं झालं. सध्या ते कुटुंबासमवेत असून, त्यांना कोविडची लागण झालेली नाही'.
सेलिब्रिटी फॅशन डिझायनर्सही कंगना विरोधात; घेतला मोठा निर्णय
Lucky is totally well and we were chatting this afternoon. He is on his farm with his family . No Covid . In good health.
— Nafisa Ali Sodhi (@nafisaaliindia) May 4, 2021
सध्याच्या घडीला लकी अली हे त्यांच्या बंगळुरु येथील त्यांच्या फार्महाऊसवर असल्याची माहिती नफिसा यांनी एका दैनिकाला दिली. लकी अली यांना कोरोनाची लागण झाली नसून, त्यांच्याकडे अँटीबॉडीज आहेत. सध्या ते त्यांच्या आगामी कार्यक्रमांची आखणी करत आहेत. व्हर्च्युअल इव्हेंटवर ते जास्त लक्ष देत आहेत. त्याचसंदर्भात आपलं त्यांच्याशी बोलणं झाल्याचं नफिसा म्हणाल्या. नफिसा यांच्या या ट्विटनंतर अखेर सोशल मीडियावर हे अफवांचं वादळ शमलं.