एक्स्प्लोर

Neeraj Chopra Video : 'यावेळी भाला उचललाय ब्लॅक पँथरसाठी,' भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा ब्लॅक पँथरच्या टीझरमध्ये

Black Panther Wakanda Forever : बहुचर्चित हॉलीवुड सुपरहिरो फिल्म ब्लॅक पँथर 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होत असून सध्या सोशल मीडियावर फिल्मचे विविध टीझर प्रदर्शित होत आहेत.

Neeraj Chopra in Black Panther Teaser : जगातील प्रत्येक देशात ज्या सिनेमांची क्रेज असते, अशा सुपरहिरो सिनेमांमधील मार्वल स्टुडिओजच्या (Marvel Studios) 'ब्लॅक पॅंथर' सिनेमाच्या दुसऱ्या भागाची (Black Panther 2) जगभरात उत्सुकता दिसून येत आहे. विशेष म्हणजे या भव्य सिनेमाला प्रदर्शित होण्यासाठी काही दिवस असून नुकत्याच आलेल्या एका टीझरमध्ये भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) दिसून आला आहे. नीरजने त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला असून एक भारतीय खेळाडू मार्वलच्या सुपरहिरो सिनेमाचं प्रमोशन करताना दिसत आहे. 

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून दिल्यानंतर सर्व जगभरात नीरजची हवा होऊ लागली. भारतीयांनी तर नीरजला अक्षरश: डोक्यावर चढवून घेतलं. नीरजने कितीतरी जाहिरांतीमध्येही काम केलं असून त्याचा खेळ अजूनही दमदार असल्याचं दिसत आहे. अशामध्ये आता एका बिग बजेट हॉलीवुड सिनेमाच्या ट्रेलरमध्ये नीरज दिसल्यामुळे भारतीय चाहते आणखीच आनंदी झाले आहेत. 'ब्लॅक पॅंथर 2' सिनेमा 11 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली. ज्यानंतर आता सिनेमाला प्रदर्शित होण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना सोशल मीडियासह सर्वत्र सिनेमाचं जोरदार प्रमोशन होत आहे. याचवेळी आता भालाफेकपटू नीरज चोप्रा असणारा टीझर मार्वलनं समोर आणला आहे.

'यावेळी भाला उचललाय ब्लॅक पँथरसाठी'

नीरजनं व्हिडीओ त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट करत अगदी दमदार कॅप्शनही दिलं आहे. त्याने लिहिलं आहे,'खेळ असो किंवा लढाई तोच जिंकतो ज्याचा निशाणा कधी चुकत नाही.' 'कधी देशासाठी खेळलो, कधी स्वत:साठी आता भाला उचललाय ब्लॅक पँथर साठी' सोबतच त्याने सिनेमा प्रदर्शनाची तारीखही लिहिली आहे.

पाहा VIDEO

View this post on Instagram
 
A post shared by Neeraj Chopra (@neeraj____chopra)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद

व्हिडीओ

Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report
CBSE Syllabus : CBSE भोंगळ कारभारावर शिवप्रेमींचा संताप Special Report
Nashik Tapovan Kumbhmela :  तपोवनचा वाद, संतापला हरित लवाद Special Report
Shiv Sena-BJP Alliance : महानगर पालिका निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना यांच्यात युती Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI : आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले, कोणाला फायदा होणार? 
आरबीआयनं रेपो रेट घटवला, स्टेट बँक ऑफ इंडियाचा मोठा निर्णय, कर्जांचे व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं घटवले
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर गगनाला भिडले, विमान प्रवासभाडे नियंत्रणाबाबत केंद्रीय मंत्र्यांचं स्पष्ट उत्तर, म्हणाले....
इंडिगोच्या गोंधळानंतर विमान तिकीट दर नियंत्रणावर केंद्रीय मंत्र्यांचं लोकसभेत उत्तर, नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या
ट्रम्प यांनी टॅरिफ लादलं, भारतानं जुमानलं नाही, रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली, नोव्हेंबरमध्ये विक्रमी तेल खरेदी
ट्रम्प टॅरिफला न जुमानता भारताची रशियाकडून विक्रमी तेल खरेदी, नोव्हेंबरची आकडेवारी समोर
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिकच मुख्य सूत्रधार; सरकारी वकिलांचा हायकोर्टात युक्तिवाद
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
देशासाठी मरण्याची नाही, जगण्याची गरज; अंदमानात अमित शाहांचे उद्गार, वीर सावकरांचा पुतळा साकार
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
भारतात धुमाकूळ घालणाऱ्या अक्षय खन्नाच्या 'धुरंदर' सिनेमाला 6 देशात बंदी? काय आहे आंतरराष्ट्रीय राज'कारण'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 डिसेंबर 2025 | शुक्रवार
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
इंडिगोवर कारवाईचा हातोडा, 4 फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक निलंबित; दुसऱ्या दिवशी सीईओंची झाडाझडती, आजही बेंगळुरू विमानतळावरून 54 उड्डाणे रद्द
Embed widget