एक्स्प्लोर

Navra Maza Navsacha 2 : 'गणपतीपुळ्याच्या नॉनस्टॉप कॉमेडी प्रवासाचे प्रवासी confirmed,' हटके कॅप्शन देत नवरा माझा नवसाचा-2 सिनेमाचं पोस्टर लॉन्च

Navra Maza Navsacha 2 : दमदार कलाकारांच्या अभिनयाने नटलेला नवरा माझा नवासाचा -2 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Navra Maza Navsacha 2 : तब्बल 19 वर्षांनी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या 'नवरा माझा नवासाचा-2' (Navra Maza Navsacha 2) या सिनेमाची घोषणा झाली. त्यानंतर येत्या 20 सप्टेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचीही उत्सुकता आता शिगेला पोहचलीये. त्यातच आता या सिनेमाचं पोस्टर नुकतच लॉन्च करण्यात आलं. सोशल मिडियावर सध्या या पोस्टरची बरीच चर्चा सुरु आहे. 

सचिन पिळगांवकर यांनी सोशल मीडियावर हे पोस्टर शेअर केलं आहे. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती   असलेल्या "नवरा माझा नवसाचा 2" या चित्रपटाची निर्मिती,  कथा - पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या पोस्टरवर पहायला मिळत आहे, त्यामुळे प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन होणार यात शंका नाही. 

19 वर्षांनी येणार सिनेमाचा सिक्वेल

सचिन पिळगावकर दिग्दर्शित "नवरा माझा नवसाचा" या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल 19 वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. येत्या 20 सप्टेंबर रोजी या सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्यात येणार आहे. एस टी बस प्रवासात "नवरा माझा नवसाचा" चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता "नवरा माझा नवसाचा 2" चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे. 

प्रेक्षकांचा लाडका कंडक्टर झाला TC

नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. नवरा माझा नवसाचा या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांची लालू कंडक्टरची भूमिका फार पसंतीस उतरली होती. ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. पण, नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटात लालू कंडक्टर दिसणार नाही. पण, यामुळे प्रेक्षकांनी निराश होण्याचं कारण नाही. कारण, प्रेक्षकांच्या लाडका लालू कंडक्टर आता टीसी झाला आहे. अशोक सराफ यांचा नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटातील पहिला लूक समोर आला यामध्ये ते कंडक्टर ऐवजी तिकीट चेकरच्या भूमिकेत दिसत आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sachin Pilgaonkar Official (@sachin.pilgaonkar)

ही बातमी वाचा : 

गेम ऑफ थ्रोन्समधील पात्राचे नाव ठेवल्याने 6 वर्षीय मुलीचा पासपोर्ट नाकारला, नेमकं प्रकरण काय?

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget