एक्स्प्लोर

'बाई, तू काय राष्ट्रपती आहेस का?', नाव न घेता नसिरुद्दीन शाहांचे कंगनाला खडे बोल

ज्येष्ठ चतुरस्र अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी कंगना रणौतचं नाव न घेता चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. सुशांतवर जर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळायला हवाच. त्याची एक प्रोसेस असते, असं त्यांनी म्हटलंय.

मुंबई :'समझनेवालों को इशारा काफी होता है, आता सगळेच गप्प आहे. सगळे घाबरलेले आहेत. आता पुढचं वक्तव्य ती कुणाविरोधात करेल याचा काही नेम उरलेला नाही. आपल्या प्रत्येक वक्तव्यासोबत तिला बळच येऊ लागलं आहे. असं चालणार नाही. आता ती म्हणतेय, करण जोहरची पद्मश्री काढून घ्या. बाई, तू काय राष्ट्रपती आहेस का?', असा थेट सवाल ज्येष्ठ चतुरस्र अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी केला आहे. कंगना रणौतचं नाव न घेता नसिरुद्दीन शाह यांनी काही मुद्दे मांडले आहेत. ते म्हणाले, सुशांतवर जर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय मिळायला हवाच. त्याची एक प्रोसेस असते. ती सिस्टिम त्यांचं काम करत आहे. अशावेळी प्रत्येकवेळी आपण त्यात पडलंच पाहिजे असं नाही. कुणाची पद्मश्री काढून घ्यायची आणि कुणाची नाही, हे तिला सांगण्याचा अधिकार नाही. उलट आपल्यापैकी एकात तिला तिची जागा दाखवण्याची हिंमत आहे, याबद्दल आपण त्यांचे आभार मानायला हवेत. असंही शाह म्हणाले. यावर कंगनाचे अद्याप उत्तर आलेलं नाही. पण नसिरुद्दीन शाह यांनी पहिल्यांदा टिप्पणी केल्यावर मात्र कंगनाने नसीर यांचं कौतुक केलं होतं. इतक्या महान अभिनेत्याच्या शिव्याही आशीर्वादासारख्या असतात असं तिच्या टीमने ट्विट केलं होतं. कंगनाच्या वक्तव्यामुळे तिची आई मात्र काळजीत, आईचं मृत्युंजयाला साकडं सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगना रणौतने आपल्या भात्यातून एकेक बाण काढून अनेक कलाकार, दिग्दर्शकांवर तो साधला आहे. यात करण जोहर, जावेद अख्तर, आदित्य चोप्रा, सलमान खान, तापसी पन्नू, स्वरा भास्कर, महेश भट्ट, अलिया भट्ट आदींचा समावेश होतो. प्रत्येकवेळी तिने स्टेटमेंट केलं की माध्यमांनी त्या स्टेटमेंटला उचलून धरलं आहे. त्यामुळे कंगना आता काय बोलेल याची शाश्वती इंडस्ट्रीला राहिलेली नाही. अनेक लोक घाबरले आहेत. आता पुढचं नाव ती आपलं घेईल का असंही अनेकांना वाटतं आहे. त्यामुळे कुणीच तिच्या वक्तव्यांवर फार काही बोलत नासलेलं दिसतं. अशावेळी नसिरुद्दीन शाह यांची आलेली टिप्पणी बरंच काही सांगून जाणारी आहे. संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Sairat Fame Actor Arbaz Shaikh: 'माझ्या बापाला मरताना नाही पाहायचंय, त्याला वाचवायचंय...'; 'सैराट' फेम सल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल, हमसून हमसून रडत अरबाज शेखचं मदतीचं आवाहन
'माझ्या बापाला मरताना नाही पाहायचंय, त्याला वाचवायचंय...'; 'सैराट' फेम सल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल, हमसून हमसून रडत अरबाज शेखचं मदतीचं आवाहन
OTT webseries: एकदा पाहायला सुरुवात केली की थांबणार नाही! स्कॅम, फ्रॉड आणि थराराने भरलेल्या 'या' 3 OTT वेब सीरिज पाहाच
एकदा पाहायला सुरुवात केली की थांबणार नाही! स्कॅम, फ्रॉड आणि थराराने भरलेल्या 'या' 3 OTT वेब सीरिज पाहाच
Maniesh Pauls Mother Death: टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
टीव्ही होस्ट मनीष पॉलवर दुखा:चा डोंगर, आईचे निधन; अभिनेता शोकसागरात बुडाला
अखेर सस्पेन्स संपला! 'सौभाग्यवती वृंदा मोहन'चा खरा नायक समोर; या लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री
अखेर सस्पेन्स संपला! 'सौभाग्यवती वृंदा मोहन'चा खरा नायक समोर; या लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एन्ट्री

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
Sharad Pawar and Rohit Pawar: विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Embed widget