एक्स्प्लोर

Nana Patekar Slams Actress On Set: भर सेटवर नाना पाटेकरांनी अभिनेत्रीच्या कानशिलात लगावली; संतापलेल्या अभिनेत्रीनेही हात उगारला अन् शुटिंगच थांबलं, नेमकं काय घडलेलं?

तिनेही सगळ्यांसमोर नानांना तितक्याच जोरात प्रत्युत्तर दिलं. या घटनेमुळे सेटवर इतकी खळबळ उडाली की दिग्दर्शकाला शूटिंगच थांबवावं लागलं.

Nana Patekar Slapped Actress in Real On Set: अभिनयात वास्तववाद आणण्यासाठी कलाकार काय काय करतात, याच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत. पण, अनेकदा काही अनपेक्षित प्रकार घडतात. एकदा नाना पाटेकर ( Nana Patekar) यांनी भूमिकेत इतके समरस होऊन गेले होते की त्यांनी चक्क सहकलाकार अभिनेत्रीला खरोखरीच कानशिलात लगावली होती. विशेष म्हणजे, ती अभिनेत्रीही गप्प बसली नाही. तिनेही सगळ्यांसमोर नानांना तितक्याच जोरात प्रत्युत्तर दिलं. या घटनेमुळे सेटवर इतकी खळबळ उडाली की दिग्दर्शकाला शूटिंगच थांबवावं लागलं.

सेटवर अभिनेत्रीला खरोखरच कानशिलात लगावली..

नाना पाटेकर यांनी 80 आणि 90 च्या दशकात अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले. आजही ते 'संकल्प'सारखा चित्रपटांमध्ये दिसतात. नाना पाटेकर यांच्या अभिनय आणि संवादफेकीची कायमच चर्चा होते. पण, काम करत असताना नाना पाटेकरांनी आपल्या सहअभिनेत्रीला खरोखरीच कानशिलात लगावलेली. हा किस्सा आहे 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'यशवंत' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा. अजय देवगणच्या 'फुल और कांटे ' चित्रपटातून पदार्पण केलेली अभिनेत्री मधु यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या घटनेचा खुलासा केलाय. त्या म्हणाल्या, "आम्ही यशवंत चित्रपटात एका अत्यंत महत्त्वाच्या दृश्याचा शूटिंग करत होतो.तेव्हा मी मेथड ऍक्टर बनण्याचा प्रयत्न करत होते. त्या सीनमध्ये मला रडायचं होतं. डोळ्यांत ग्लिसरीन टाकण्याची तयारी होती, पण नाना सरांनी त्याला विरोध केला. ते म्हणाले, 'भावना जगून दाखव, अश्रू खरे यायला हवेत."

मात्र कितीही प्रयत्न करूनही मधु यांच्या डोळ्यांत अश्रू येत नव्हते. त्यानंतर अचानक घडलेल्या घटनेने त्या हादरून गेल्या. "रिहर्सलमध्ये असं काही झालं नव्हतं. पण शॉट सुरू असताना नाना सरांनी अचानक मला खरोखरच जोरदार कानशिलात लगावली. काही क्षण मला काय झालं हेच कळलं नाही, माझ्या डोळ्यातून खरंच पाणी आलेलं " असं मधु यांनी सांगितलं. 

अभिनेत्रीला सुचलंच नाही, उलट्या हाताने ...

मधु पुढे म्हणाल्या, "त्या काळात माझा स्वभाव खूप तापट होता. त्यांनी मला कानाखाली मारल्यानंतर माझ्या डोक्यात इतकी सणक गेली की मीही कसलाही विचार न करता त्यांना परत एक जोरदार लगावून दिली. तो माझा नैसर्गिक प्रतिसाद होता."

विशेष म्हणजे हा सीन पती-पत्नीमधील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता. दोघांनी एकमेकांना खरंच मारल्यामुळे कॅमेऱ्यात कैद झालेले भावही पूर्णपणे नैसर्गिक होते.नानांनी देखील मान्य केलेलं की परत उलटून मारणे ही तिची एक नैसर्गिक आणि प्रामाणिक प्रतिक्रिया होती. पण यानंतर सेटवरील वातावरण काहीसे तणावपूर्ण झाल्याने दिग्दर्शक आणि पुढील शूट न करता संपूर्ण दिवसाचेच पॅकअप जाहीर केले.

नाना पाटेकरांच्या वागणुकीविषयी सांगताना अभिनेत्री मधू यांनी म्हटलं " नाना पाटेकर यांनी माझ्याशी कधीही गैरवर्तन केले नाही.जेव्हा त्यांना वाटायचे की मी माझ्या अभिनयात सुधारणा करावी, तेव्हाच ते नाराज व्हायचे. मी ग्लिसरीन वापरायचे आणि शॉर्ट दिल्यानंतर भूमिकेतून बाहेर पडले की ते नाराज व्हायचे ' असं त्यांनी म्हटलं.

Madhu Shah:मधु शाह सध्या काय करतात?

अभिनेत्री मधुशाह यांनी अजय देवगणचा 'फुल और कांटे' चित्रपटातून पदार्पण केलं होतं. या चित्रपटानंतर ही अभिनेत्री रातोरात प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी हिंदी आणि दाक्षणात्य चित्रपटांमध्ये ही काम केलं. मात्र जवळपास 80 चित्रपटांनंतर त्यांनी निवृत्ती घेतली. 2023 मध्ये समंथाच्या 'शानकुट्टलम' या चित्रपटातून त्यांनी पुनरागमन केलेले. यापूर्वी कंगना राणावतच्या थलाईवी चित्रपटात त्यांनी काम केले. सध्या मनोज बाजपेयींच्या गव्हर्नर चित्रपटामुळे त्या चर्चेत आहेत. आज अनेक वर्षांनंतर समोर आलेल्या या किस्स्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. नाना पाटेकर आणि मधु यांच्या त्या सीनची पुन्हा एकदा आठवण चाहत्यांना झाली आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jai Jai Swami Samarth: 'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ
'जय जय स्वामी समर्थ'मध्ये गुरुपौर्णिमेचा महासोहळा! प्रथमच पाच गुरुंच्या दिव्य दर्शनाचा लाभ
Dev Anands Son Suniel Anand: बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
बॉलिवूडवर शोककळा! ज्या ठिकाणी देव आनंद यांचा मृत्यू, त्याच रुग्णालयात मुलाने घेतला अखेरचा श्वास, कारणही समोर
Kangana Ranaut Statement Gen Z: तरुणींना 'गटार छाप' म्हटल्यानंतर कंगना रणौतचं आणखी वादग्रस्त वक्तव्य, जेन झीच्या आई-वडिलांबाबत नेमकं काय म्हणाली?
तरुणींना 'गटार छाप' म्हटल्यानंतर कंगना रणौतचं आणखी वादग्रस्त वक्तव्य, जेन झीच्या आई-वडिलांबाबत नेमकं काय म्हणाली?
Trending CJP Protest Song: जंतर-मंतर आंदोलन संपलं, पण 8 वर्षांपूर्वीचं हे गाणं ठरलं आंदोलनाचा आवाज; सोशल मीडियावर अजूनही होतंय ट्रेंड
जंतर-मंतर आंदोलन संपलं, पण 8 वर्षांपूर्वीचं हे गाणं ठरलं आंदोलनाचा आवाज; सोशल मीडियावर अजूनही होतंय ट्रेंड
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
Priyanka Gandhi : लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
लाज वाटायला पाहिजे तिथे निर्लज्जपणे धर्मेंद्र प्रधानांचं स्वागत केलं गेलं, विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला? प्रियंका गांधींचा संतप्त सवाल
Shalarath ID Fraud Nashik : शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
शालार्थ आयडी घोटाळ्यात मोठी कारवाई! भाजप पदाधिकाऱ्याला सोलापुरातून अटक; शासनाची 160 कोटींची फसवणूक
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांना सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आईने दागिने विकले, वडिलांना सावकाराकडून कर्ज घेतले; श्रीकांत शिंदेंचं संसदेत भावनिक भाषण
Paper Leak Bill : कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
कसली कारवाई करताय? नीट पेपरफुटीतील 45 पैकी 44 आरोपींना जामीन दिला; काँग्रेस खासदाराने आकडेवारी मांडली, लोकसभेत रणकंदन
Nitin Gadkari: नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
नितीन गडकरींचे डीपफेक व्हिडिओ; मेटा, गुगलविरुद्ध न्यायालयात, हायकोर्टात 5 ऑगस्टला होणार सुनावणी
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
2 लाखांची कर्जमाफी जुमला? धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना 94 हजारांचाच लाभ, पासबुक दाखवत संताप; दत्तात्रय भरणेंचं स्पष्टीकरण
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
जुनी ओळख, नवं प्रेम; सोशल मीडियामुळे 10 वर्षानंतर भेटले, दोघांनीही आयुष्य संपवले; दोन कुटुंबाची राखरांगोळी
Embed widget