Tanushree Dutta & Nana Patekar: मराठी असल्याने नाना पाटेकरला पोलीस आणि राजकारण्यांचा पाठिंबा; गँगस्टर मन्या सुर्वे त्याचा भाऊ होता; अभिनेत्री तनुश्री दत्ताचे सनसनाटी आरोप
Nana Patekar & Tanushree Dutta: नाना पाटेकर यांच्यासारखे राक्षसी वृत्तीचे लोक असतात, त्यांचा इगो आणि अहंकार खूप मोठा असतो. नाना पाटकेर यांची मंत्र्यांसोबत उठबस असते.

Tanushree Dutta & Nana Patekar: मी अभिनेता नाना पाटेकर याच्याविरोधात 'मी टू' केस केली होती, तेव्हापासून मला त्रास दिला जात आहे. नाना पाटेकर (Nana Patekar) हा मराठी व्यक्ती आहे. राजकारण्यांसोबत त्याची उठबस असल्याने पोलिसांचाही त्याला पाठिंबा आहे, असा खळबळजनक आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) हिने केला. नाना पाटेकर याच्यासारखे लोक राक्षसी वृत्तीचे असतात. यांचा इगो, अहंकार खूप मोठा असतो. तुम्ही यांचा मुखवटा फाडता तेव्हा त्यांच्यासाठी ही मोठी गोष्ट असते. या लोकांना समोरच्याला उद्ध्वस्त करायचे असते, असे तनुश्री दत्ता हिने म्हटले. ती बुधवारी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होती.
मी नाना पाटेकर याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पण नाना पाटेकर मराठी माणूस असल्याने पोलिसांनी त्याला मदत केली. महाराष्ट्रात बाहेरचा माणूस मरेल, पण मराठी माणूस गुन्हेगार असेल तरी त्याला पोलीस पाठिंबा देतात. मंत्रीही त्याला पाठिंबा देतात. यामुळे नाना पाटेकरची हिंमत वाढली, इगो वाढला आणि त्याने मला त्रास देऊन संपवून टाकण्याचा चंग बांधला, असे तनुश्री दत्ता हिने म्हटले.
Nana Patekar: नाना पाटेकर हा गँगस्टर मन्या सुर्वेचा भाऊ: तनुश्री दत्ता
नाना पाटेकर याने यू-ट्युबच्या मुलाखतीत स्वत:च सांगितले होते की, मी अभिनेता नसतो तर अंडरवर्ल्ड डॉन झालो असतो. गँगस्टर मन्या सुर्वे हा माझा चुलत भाऊ होता. नाना पाटेकरने स्वत:च तशा फुशारक्या मारल्या होत्या. यावरुन नाना पाटेकर हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे सिद्ध होते, असे तनुश्री दत्ता हिने म्हटले. राज्यातील अनेक मंत्र्यांची नाना पाटेकर यांच्यासोबत उठबस असते. मी नाना पाटेकर यांच्या अनेक मंत्र्यांसोबतचे फोटो बघितले आहेत. पोलीस बिचारे काय करणार? त्यांचे बॉस असलेले मंत्री हे नाना पाटेकर याच्यासारख्या गुन्हेगारासोबत फिरत असतील तर पोलीस स्वत:ची नोकरी धोक्यात कशाला टाकतील? ही सगळी एक इकोसिस्टीम तयार झाली आहे. नाना पाटेकर याला पोलिसांचा पाठिंबा आणि सॉफ्ट कॉर्नर आहे. त्यामुळे सरकार आणि पोलिसांना माझ्याशी काहीही देणघेणं पडलेले नाही, असा आरोप तनुश्री दत्ता हिने केला.
आणखी वाचा























