एक्स्प्लोर

Khashba Teaser Out: फॅन्ड्री, सैराटनंतर नागराज मंजुळे यांचा 'खाशाबा' येतोय सगळे रेकोर्ड मोडायला! 2 मिनिट 8 सेकंदाच्या टीझरचा धुमाकूळ

आता तो डिजिटल प्लॅटफॉर्मसवर रिलीज करण्यात आला आहे. नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट महाराष्ट्रातील संघर्षशील कुस्तीपटूची कहाणी सांगतो.

Khashaba Teaser: जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्स यांनी आज बहुप्रतिक्षित  "खाशाबा" चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करत , 1 जानेवारी 2027 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत माहिती दिली. 'धुरंधर', 'धुरंधर : द रिव्हेंज' आणि 'राजा शिवाजी' यासारखे सलग यशस्वी चित्रपट देत, भारतीय चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या जिओ स्टुडिओजने आणखी एक महत्त्वाकांक्षी निर्मिती केली आहे.  फॅन्ड्री आणि 'सैराट' सारख्या राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेल्या चित्रपटांनंतर दिग्दर्शक नागराज मंजुळे "खाशाबा" निमित्त पुन्हा एकदा एका भव्य आणि प्रेरणादायी कथेसह प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. चित्रपटगृहांमध्ये प्रथम प्रदर्शित झालेल्या खाशाबा च्या टिझरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आता तो डिजिटल प्लॅटफॉर्मसवर रिलीज करण्यात आला आहे.  पारंपरिक कुस्तीच्या आखाड्याचे भव्य चित्रण, दमदार दृश्यरचना, उत्कंठावर्धक वातावरण,  संघर्षाची भावनिक तीव्रता आणि चित्रपटाचा सिनेमॅटिक आवाका या टीझर मधून प्रभावीपणे अनुभवायला मिळतो. 

नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट महाराष्ट्रातील संघर्षशील कुस्तीपटूची कहाणी सांगतो.  अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावत भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करणाऱ्या खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित आहे. 

'खाशाबा' हा चित्रपट स्वतंत्र भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र आणि दिग्गज कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक पटकावले आणि भारतीय क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल असा इतिहास घडवला. भारतीय क्रीडाक्षेत्रातील हा अभिमानास्पद प्रवास मोठ्या पडद्यावर भव्य स्वरूपात साकारत हा चित्रपट प्रादेशिक सिनेमातील सर्वात मोठ्या क्रीडापटांपैकी एक ठरण्याची क्षमता बाळगून आहे.

संगीत क्षेत्रातील दिग्गज जोडी अजय-अतुल यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे. खाशाबा यांच्या भूमिकेसाठी एका नव्या चेहऱ्याची निवड करण्यात आली असून, त्याची घोषणा लवकरच करण्यात येईल. या नवोदित कलाकारासोबत त्याबरोबरच जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, वैभव मांगले, छाया कदम, आणि गार्गी कुलकर्णी यांसारख्या एकापेक्षा एक दमदार कलाकारांचा सहभाग आहे.जिओ स्टुडिओज आणि आटपाट प्रॉडक्शन्स प्रस्तुत 'खाशाबा' या चित्रपटाची निर्मिती ज्योती देशपांडे आणि गार्गी कुलकर्णी यांनी केली असून दिग्दर्शन नागराज मंजुळे यांचे आहे. 'खाशाबा' 1 जानेवारी २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' हरपला, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...
'नटसम्राट' हरपला, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन, 75व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...
Drishyam 3 Sameer Deshmukh: 'दृश्यम'मधील सॅम, पहिल्या पार्टमध्ये फक्त 15 मिनिटांचा स्क्रिन टाईम, नंतर एक सेकंदही दिसला नाही, तरी सेंटर ऑफ स्टोरी राहिलेला समीर देशमुख आता करतोय काय?
'दृश्यम'मधील सॅम, पहिल्या पार्टमध्ये फक्त 15 मिनिटांचा स्क्रिन टाईम, नंतर एक सेकंदही दिसला नाही, तरी सेंटर ऑफ स्टोरी राहिलेला समीर देशमुख आता करतोय काय?
Dhruv Rathee Abhijeet Dipke CJP Protest: ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
ध्रुव राठी भारतात दाखल, जंतर-मंतरवर येण्याचं आवाहन; प्रकाश राज म्हणाले, ‘आली रे आली ग्यानू तुझी बारी आली’
Rajpal Yadav Supreme Court Hearing: 'मी स्वतःच एक तमाशा बनलोय...'; राजपाल यादवचा कोर्टातच इमोशनल ड्रामा, चेक बाउन्स प्रकरणात अडचणी वाढणार?
'मी स्वतःच एक तमाशा बनलोय...'; राजपाल यादवचा कोर्टातच इमोशनल ड्रामा, चेक बाउन्स प्रकरणात अडचणी वाढणार?

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget