एक्स्प्लोर

Ravi Kishan Praises Dada Kondke: रवि किशन यांनी केलं दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांचं कौतुक; म्हणाले, 'त्यांच्या विनोदाचं अचूक टायमिंग अन्...'

Ravi Kishan Praises Dada Kondke: अभिनेते रवि किशन यांनी 'कोण होणार मराठी करोडपती'मध्ये हजेरी लावली.

Ravi Kishan on Dada Kondke: 'कोण होणार मराठी करोडपती' (Kon Honaar Marathi Crorepati) या शोमध्ये आतापर्यंत दिग्गज कलाकारांची हजेरी पाहायला मिळाली. दरम्यान, आता या शोच्या विशेष भागात गोरखपूरचे खासदार आणि अभिनेता रवि किशन (Ravi Kishan) यांनी शोमध्ये हजेरी लावली. सूत्रसंचालक आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) हिच्यासोबत गप्पा मारताना रवि किशन यांनी अनेक किस्से शेअर केले. सोशल मीडिया सेन्सेशन ते रातोरात इंटरनेटवर मिळालेली प्रसिद्धी यावर त्यांनी भाष्य केलं आहे.  विशेष म्हणजे रवि किशन यांनी दिवंगत अभिनेते आणि विनोदवीर दादा कोंडके (Dada Kondke) यांच्या विनोदावर भरभरुन गप्पा मारल्या.  इतकंच नाही तर, रवि किशन 20 लिटर दुधाने आंघोळ करतात, या अफवांवरही आपले मौन सोडले आहे.  'कोण होणार मराठी करोडपती' या शोमध्ये रवि किशन यांनी अनेक रंजक किस्से शेअर केले. 

दादा कोंडकेंचं रवि किशन यांच्याकडून भरभरुन कौतुक (Ravi Kishan Praises Dada Kondke on KBC)

रवि किशन यांनी अलिकडेच 'कोण होणार मराठी करोडपती' च्या सेटवर हजेरी लावली. तसेच प्रश्नांच्या खेळात उत्तरं दिली. तसेच खेळ खेळत असताना त्यांनी विविध किस्से शेअर केले.  मिळालेल्या माहितीनुसार,  'कोण होणार मराठी करोडपती'चा हा एपिसोड 28 नोव्हेंबर रोजी सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर प्रसारित होणार आहे. यावेळी त्यांनी दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांचं भरभरुन कौतुक केलं. दादा कोंडके यांचं कौतुक करताना रवि किशन यांनी  भाबड्या नाम्या या पात्राचं कौतुक केलं. भाबड्या नाम्या एखादं वाक्य अगदी निरागसपणे बोलून जायचा. दादा कोंडके यांच्या विनोदाचं आणि डायलॉग डिलिव्हरीचंही कौतुक केलं. यावरुन रवि किशन यांना मराठी सिनेसृष्टीतील अष्टपैलू अभिनेते दादा कांडके यांच्याप्रति विशेष प्रेम आणि आदर असल्याचं दिसून आले. 

दादा कोंडके यांच्याबाबत रवि किशन म्हणाले की, 'दादा कोंडके यांच्या विनोदाचं टायमिंग अचूक असायचं.  त्यांचे चित्रपट आणि विशेष विनोद हे सगळं काही वेगळं असायचं.  लोकांनी त्यांच्या सिनेमांचे अनेक अर्थ काढले. परंतु, दादा कोंडके यांच्या नजरेतून पाहिल्यास, त्यांच्या प्रत्येक विनोदात समाजासाठी नेहमी एक संदेश असायचा', असं रवि किशन म्हणाले.  यावेळी त्यांनी, प्रत्येक शॉटपूर्वी 20 लिटर दुधात गुलाबाच्या पाकळ्या टाकून आंघोळ करतो,  या अफवेचेही खंडन केले.  माहितीनुसार, हा एपिसोड 28 नोव्हेंबर रोजी प्रसारित होणार असून, या एपिसोडमध्ये आणखी कोणते किस्से पाहायला मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Phulwara First Look: 'पदर उठला'; 'फुलवरा' सिनेमाचा भन्नाट फर्स्ट लूक रिलीज, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री मुख्य भूमिकेत, दुसरी कोण?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Phulwara First Look: 'पदर उठला'; 'फुलवरा' सिनेमाचा भन्नाट फर्स्ट लूक रिलीज, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री मुख्य भूमिकेत, दुसरी कोण?
'पदर उठला'; 'फुलवरा' सिनेमाचा भन्नाट फर्स्ट लूक रिलीज, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री मुख्य भूमिकेत, दुसरी कोण?
Chinmayee Sumeet: अमिताभ बच्चन, अंबानींना मराठी आलं नाही तरी तुम्हाला चालतं, फक्त गरीब रिक्षावाल्यांनाच धाक दाखवता; मराठी भाषा सक्तीवर चिन्मयी सुमीत यांचं रोखठोक मत
अमिताभ बच्चन, अंबानींना मराठी आलं नाही तरी तुम्हाला चालतं, फक्त गरीब रिक्षावाल्यांनाच धाक दाखवता; मराठी भाषा सक्तीवर चिन्मयी सुमीत यांचं रोखठोक मत
Tejashri Pradhan Atharva Sudame: 'मला अथर्व सुदामेचे व्हिडीओ आवडतात...'; तेजश्री प्रधानला कोणता Influencer सर्वात जास्त आवडतो? म्हणाली...
'मला अथर्व सुदामेचे व्हिडीओ आवडतात...'; तेजश्री प्रधानला कोणता Influencer सर्वात जास्त आवडतो? म्हणाली...
Rahul Gandhi Riteish Deshmukh Genelia: विरोध झुगारुन रितेशने जिनेलियाला मांडीवर बसवून फोटो काढला, राहुल गांधींकडून पोस्ट शेअर, बॅकग्राऊंडला शाहरुखचं गाणं
विरोध झुगारुन रितेशने जिनेलियाला मांडीवर बसवून फोटो काढला, राहुल गांधींकडून पोस्ट शेअर, बॅकग्राऊंडला शाहरुखचं गाणं
Advertisement

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivajinagar Court Mangesh Kiwale Case: आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case: शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Pune Bopdev Accident : पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
Rajasthan : राजस्थानात 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्री भजनलाल शर्मांच्या जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा पराभव  
राजस्थानमध्ये 37 पैकी 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचा पराभव
Pune Firing Case : दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Embed widget