एक्स्प्लोर

Nagarjuna Akkineni : समंथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाबद्दल नागार्जुन यांची माहिती; काय म्हणाले नागा चैतन्यचे वडील?

नागा चैतन्यचे वडील अभिनेता नागार्जुन अक्किनेनी (Nagarjuna Akkineni) यांनी माहिती दिली आहे.

Samantha and Naga Chaitanya Divorce : अभिनेत्री समंथा (Samantha) आणि नागा चैतन्य  (Naga Chaitanya) यांनी  गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या चाहत्यांना घटस्फोटाबद्दल माहिती दिली. काही दिवसांपूर्वी नागा चैतन्यने एका मुलाखतीमध्ये समंथासोबतच्या घटस्फोटाबद्दल त्याचे मत व्यक्त केले होते. आता याविषयी नागा चैतन्यचे वडील अभिनेता नागार्जुन अक्किनेनी (Nagarjuna Akkineni) यांनी माहिती दिली आहे. 

एका मुलाखतीमध्ये नागार्जुन यांनी सांगितले की, 'सर्वात आधी समंथानं घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. नागा चैतन्यनं तिचा निर्णय स्वीकारला. त्या दोघांना माझी काळजी होती. त्यांना वाटत होते की मी त्यांच्या या निर्णयाबाबत काय मत मांडेल? किंवा आपल्या कुटुंबाचे काय होईल? त्यांच्या लग्नाला चार वर्ष झाली होती. तेव्हा दोघांमध्ये कोणतेही मतभेद नव्हते. त्या दोघांनी 2021 चे न्यू ईअर एकत्र साजरे केले.जेव्हा ते दोघे रिलेशनमध्ये आले तेव्हा सर्वात आधी त्यांच्या नात्याबद्दल मला माहित होते.'

समंथानं तिच्या आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स देखील केल्या होत्या. ती पोस्ट समंथानं काही दिवसांपूर्वी डिलीट केली. त्यामुळे आता समंथा आणि नागा चैतन्य पुन्हा एकत्र येणार का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. 

समंथा आणि नागा चैतन्यची अशी होती लव्ह स्टोरी 
‘ये माया चेसावे’ या तेलगू चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान समंथा आणि नागा चैतन्यची भेट झाली. त्यानंतर ‘ऑटोनगर सूर्या’ या चित्रपटाच्या सेटवर ते पुन्हा भेटले. 6 ऑक्टोबर  2017 रोजी समंथा आणि नाग चैतन्य लग्नबंधनात अडकले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

बहुचर्चित 'Shark Tank'शोचे परिक्षक कोट्यावधींच्या कंपन्यांचे मालक; पाहा कोण आहेत?

The Kapil Sharma Show  : अक्षयनं घेतला कपिलचा आशीर्वाद? कपिलनं सांगितला फोटो मागील किस्सा

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

South OTT Release This Week: या आठवड्यात साउथ चित्रपटांचा ओटीटीवर डंका, 'पल्लीचट्टम्बी' पासुन ते 'कॉन सिटी' पर्यंत प्रदर्शित होणारे 6 अप्रतिम चित्रपट
या आठवड्यात साउथ चित्रपटांचा ओटीटीवर डंका, 'पल्लीचट्टम्बी' पासुन ते 'कॉन सिटी' पर्यंत प्रदर्शित होणारे 6 अप्रतिम चित्रपट
Atul Kulkarni on CJP Protest: आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा
आजच्या पिढीने गांधी अन् आंबेडकरांचा वारसा पुन्हा जिवंत केला; अभिनेता अतुल कुलकर्णींचा आंदोलनास थेट पाठिंबा
आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात ‘मन मंदिरा - गजर भक्तीचा’मध्ये नामस्मरणाचा सुरेल सोहळा!
आषाढी एकादशीच्या भक्तिमय वातावरणात ‘मन मंदिरा - गजर भक्तीचा’मध्ये नामस्मरणाचा सुरेल सोहळा!
CJP आंदोलनात पोलिसांची गाडी रोखली; 40 मिनिटे भर पावसात उभी राहिलेली अभिनेत्री कोण?
CJP आंदोलनात पोलिसांची गाडी रोखली; 40 मिनिटे भर पावसात उभी राहिलेली अभिनेत्री कोण?

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
जळगावात विचित्र तिहेरी अपघात; आयशर अन् एसटीचालक जखमी, बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले
Embed widget