Naga Chaitanya आणि Sobhita Dhulipala च्या लग्नाचं अॅग्रीमेंट तयार, किती कोटींची डिल कन्फर्म?
Naga Chaitanya, Sobhita Dhulipala: नागा चैतन्य, शोभिता धुलिपाला लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. काही काळ डेट केल्यानंतर दोन्ही स्टार्सनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाची तारीख निश्चित झाली असून, तयारी सुरू झाली आहे.
Naga Chaitanya Sobhita Dhulipala Wedding: लगीनसराई (Naga Chaitanya Sobhita Dhulipala Marriage) जोरात सुरू आहे. अशातच सेलिब्रिटी कसे मागे राहतील, यंदाच्या वेडिंग सीझनमध्ये फिल्म इंडस्ट्रीमधील धडाकेबाज सुपरस्टार नागार्जुनचा (Nagarjuna) मोठा मुलगा नागा चैतन्य दुसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार आहे. मॉडल आणि अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत (Sobhita Dhulipala) नागा चैतन्य (Naga Chaitanya) लग्नगाठ बांधणार आहे. यापूर्वी नागा चैतन्य आणि लेडी सुपरस्टार समंथा प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांचा विवाह झाला होता. पण काही कारणास्तव दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. काही काळ डेट केल्यानंतर दोन्ही स्टार्सनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाची तारीख निश्चित झाली असून, तयारी सुरू झाली आहे.
सध्या नागार्जुनच्या घरात लगीनघाई सुरू आहे. अशातच नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. दोघांच्या लग्नाचं अॅग्रीमेंट झाल्याची माहिती मिळत आहे. अॅग्रीमेंटमध्ये कोट्यवधींचं डील झाल्याची माहिती मिळत आहे.
View this post on Instagram
Naga Chaitanya आणि Sobhita Dhulipala ची लगीनघाई
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला 4 डिसेंबर 2024 रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्याही लग्नाबाबतच्या सर्व घडामोडींवर चाहते बारिक नजर ठेवून आहेत. दोघांच्या वेडिंग डेस्टिनेशनपासून सर्व विधी, दोघांचे लूक या सर्व गोष्टींबाबर चाहत्यांना उत्सुकता आहे. दोघांच्या लग्नसोहळ्याची झलक चाहत्यांना पाहायची आहे. आता यासंदर्भातच मोठी अपडेट समोर येत आहे. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाल यांनी त्यांच्या लग्नाच्या फुटेजचे हक्क OTT प्लॅटफॉर्मला विकले आहेत.
दोघांनी लग्नाचे हक्क विकले...
ट्रेड एनालिस्ट मनोबाला विजयाबलान यांनी एका वेबसाईटशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी त्यांच्या लग्नाचे डिजिटल अधिकार OTT प्लॅटफॉर्मवर विकले आहेत आणि तेही मोठ्या रकमेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या करारातून या जोडप्याला तब्बल 50 कोटी रुपये मिळणार आहेत. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही, तरी नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला दोघांकडूनही यासंदर्भात कोणत्याही वृत्ताची पुष्टी करण्यात आलेली नाही.
Nayanthara नंही विकलेले लग्नाचे राईट्स
नागा चैतन्य आणि शोभिता दोघांनीही त्यांच्या लग्नाबाबत अद्याप कोणाशीही कसलीच चर्चा केलेली नाही. तसेच, लग्नाचे हक्क विकण्यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. अशातच जर, दोघांनीही आपल्या लग्नाचे हक्क विकले असतील तर, आपल्या लग्नाचे हक्क विकणारा नागा चैतन्य साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा दुसरा अभिनेता ठरेल, यापूर्वी साऊथ इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश शिवन दोघांनी आपल्या लग्नाचे राइट्स विकले होते. दोघांच्या लग्नाची झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक होतो, नेटफ्लिक्सन 'नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल' डॉक्युमेंट्री रिलीज केल्यानंतर चाहत्यांना नयनताराच्या लग्नाची झलक पाहायला मिळाली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :