Sharmishtha Raut : 'निर्माता म्हटलं की सगळ्यांना करण जोहर दिसतो पण...'; निर्माती म्हणून शर्मिष्ठा राऊतने शेअर केला अनुभव
Sharmishtha Raut : अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत हीने मालिकांसह आता सिनेमांच्या निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. त्यानिमित्ताने तिने तिचा अनुभव शेअर केलाय.
Sharmishtha Raut : 'नाच गं घुमा' (Naach G Ghuma) या सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत (Sharmishtha Raut) ही पुन्हा एकदा निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली. याआधी देखील तिने मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांच्यासह वाळवी, आत्मपॅम्फ्लेट या सिनेमांमध्ये सहनिर्माती म्हणून काम केलं होतं. तसेच शर्मिष्ठाने मालिकाविश्वातही निर्माती म्हणून पाऊल ठेवलं आहे. पण निर्माती म्हणून येणाऱ्या अडचणी या सगळ्यावर शर्मिष्ठाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
शर्मिष्ठाने नाच गं घुमा या सिनेमाच्या निमित्ताने मित्रम्हणे लाईमलाईट या युट्युब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी शर्मिष्ठाने तिच्या निर्माती म्हणून असलेल्या अडचणी सांगितल्या. तसेच निर्माती म्हणून तिचा अनुभव कसा होता, यावरही शर्मिष्ठाने भाष्य केलं आहे. आमच्याकडे पिढीजात पैसा नसतो, त्यासाठी लोक काढावं लागतं, पैसा जमवावा लागतो, असं शर्मिष्ठाने म्हटल.
निर्माता म्हटलं की सगळ्यांना करण जोहर दिसतो - शर्मिष्ठा राऊत
मला मधुगंधाचा फोन आला की एक नवा सिनेमा लिहिलाय. पण यावेळी आपण कोणत्याही प्रोडक्शन हाऊसकडे जात नाही आहोत, आपणच ती प्रोड्युस करतोय. आपल्याच पैशे टाकायचे आहेत त्याच्यामध्ये. तेव्हा मी तिला म्हटलं की जर स्वत:चेच पैसे टाकायचे आहेत, तर मी आणि तेजसही यामध्ये येऊ इच्छितो तुला चालेल का? ती हो म्हणाली पण परेश दादा खूप टेन्शनमध्ये होता. तिलाही थोडं टेन्शन आलं होतं, की शर्मिष्ठा कसं करणार आहेस, कारण खूप पैसे लागणार आहेत, यासाठी. कारण मालिका सुरु होती, लोन असतं. काय असं निर्माता म्हटलं की आपल्याला करण जोहर दिसतात. की पिढीजात चालत आलेला पैसा आहे आणि तोच रोलिंगमध्ये आहे. मराठीत कोणताही असा निर्माता नाही की अरे पिढीजात निर्मीती करावी लागते. आम्हाला बँकांमधून लोन घ्यावं लागतं किंवा घरावर लोन उचलावं लागतं. त्यानंतर ते व्याजासहित फेडावंही लागंत.
'अभिनेत्री म्हणून निर्मात्यांची अडचण मी समजू शकते'
मी सुरुवातीला मधुगंधाला असिस्ट करायला लागले. रोज वेगवेगळी आव्हानं होती. पोलीस परवानगी, त्यासाठीची धावपळ हे सगळं पाहावं लागतं. तुम्ही समोरच्याला गृहित धरु नाही शकत. कारण शुटींगच्या दरम्यान बऱ्याच अडचणी येतात. कधी लोकेशन बदलतं, कधी कपड्यांचा प्रोब्लेम येतो. पण सुकन्याताईसह सगळे कलाकार हे मदत करणारे इच्छिणारे असतात. कारण त्यांनाही त्यांची जाण असते. कुठे काय प्रोब्लेम होऊ शकतो, हे त्यांना माहितेय. हे लोकं असेत की ह्यांनी झाडाखाली मेकअप केलेले आहेत, टेम्पोमध्ये चढून साड्या बदलल्या आहेत. पण हे त्यांनी तेव्हा केलं म्हणून आता त्यांना तेच करायला सागणं हे आपण नाही करु शकत. त्यांना जर आपली अडचण सांगितली तर त्यावेळी त्याही समजूनच घेतात, की काय करायचं, असा अनुभव शर्मिष्ठाने शेअर केला.