Muzammil Ibrahim On Pooja Bhatt: 'कलाकारांनी कुत्र्यासारखं असायला हवं...'; पूजा भट्टबाबत सुपरस्टार अभिनेत्याचा खळबळजनक खुलासा
Muzammil Ibrahim On Pooja Bhatt: बॉलिवूड अभिनेत्यानं पुजा भट्टबाबत धक्कादायक दावा केला असून ती सिनेमाच्या सेटवर अभिनेत्याला शिवीगाळ करायची असं त्यानं म्हटलं आहे.

Muzammil Ibrahim On Pooja Bhatt: बॉलिवूडचं (Bollywood) जग जेवढं लांबून ग्लॅमरस दिसतं, तेवढाच आतून काळाकुट्ट अंधारानं माखलेलं आहे. बॉलिवूडची काळी बाजू अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी समोर येऊन सांगितली आहे. अशातच आता आणखी एका अभिनेत्यानं प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत केलेल्या खळबळजनक खुलाशामुळे चर्चांना उधाण आलं आहे. बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मुझम्मिल इब्राहिमनं (Muzammil Ibrahim) इंडस्ट्रीत स्वतःला सिद्ध केलं. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये बोलताना इंडस्ट्रीतील अनेक गोष्टींचा धक्कादायक खुलासा केला आहे. मुझम्मिल इब्राहिमनं 'धोखा' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमाचं दिग्दर्शन महेश भट्ट (Mahesh Bhatt) आणि पूजा भट्ट (Pooja Bhatt) यांनी केलेलं. मुझम्मिल इब्राहिमनं आता सिनेमाच्या शुटिंगवेळी पूजा भट्ट अत्यंत वाईट वागणूक दिल्याचं सांगितलं आहे.
Muzammil Ibrahim सिद्धार्थ कन्ननच्या पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणाला की, "मी प्रोफेशनल नाही, असं त्यावेळी मला पूजा भट्ट म्हणाली होती. ती ज्या पद्धतीनं राग व्यक्त करायची, वागायची त्यामुळे कलाकारांचा आदर होत असे. मी चांगला अभिनेता होतो, त्यामुळे महेश भट्ट यांना मी आवडायचो. मी लहान होतो. माझं वय फक्त 20 वर्षे होतं."
"धोखाच्या सेटवर मला जी वागणूक दिली गेली, त्याबद्दल मी बोलूदेखील शकत नाही. ती घृणास्पद वागणूक होती. पूजा शिवीगाळ करायची. ज्या पद्धतीने मला वागवलं गेले, त्यानंतर मला त्यांच्याकडून अपेक्षा राहिल्या नाहीत. धोखा चित्रपटाच्या सेटवर आलेल्या अनुभवानंतर मला भीती वाटू लागली. मला वाईट स्वप्न पडायची. मी भारताचा सुपरमॉडेल होतो. तिथं मला फार वेगळ्या पद्धतीची वागणूक मिळायची आणि या चित्रपटाच्या सेटवर मला अपमानजनक वागणूक मिळाली. महेश भट्ट सरांना ते सर्व कळत होतं. त्यांनी पूजा भट्टला अनेकदा सांगितलं देखील हे करू नकोस. पण भट्ट सर सेटवर नसताना परिस्थिती खूपच वाईट असायची.", असं मुझम्मिल इब्राहिमनं म्हटलं आहे.
'मी असंही ऐकलंय की, पूजा भट्ट म्हणायची की, कलाकारांनी कुत्र्यासारखं असायला हवं. जेव्हा सांगेल तेव्हा त्यांनी बसलं पाहिजे. मला त्रास देण्यासाठी लेख लिहिले गेले, त्यामुळे मला भीती वाटायची. त्या परिस्थितीचा परिणाम मला स्वत:वर होऊ द्यायचा नव्हता. माझा दिवस चांगला जावा, यासाठी मी प्रार्थना करायचो. मला डिप्रेशनचा सामना करावा लागलेला.", असं मुझम्मिल इब्राहिमनं सांगितलं आहे.
दीपिका पादुकोणनं मला प्रपोज केलेलं : मुझम्मिल इब्राहिम
मुजम्मिल इब्राहिमनं पॉडकास्टमध्ये बोलताना सांगितलं की, "आम्ही दोन वर्ष डेट केलं. मी तिला मुंबईत भेटणारा पहिला माणूस होतो. ते माझं पहिलं सीरिअस रिलेशनशिप होतं. दीपिकानं मला पहिल्यांदा प्रपोज केलं. पण, तिनं नाही, मी तिला सोडून दिलं, त्यामुळेच आमचं ब्रेकअप झालं. पण मला त्याचा पश्चात्ताप नाही. मला कधीही कोणालाही सोडून गेल्याचा पश्चात्ताप नाही. तसेच, मी त्यावेळी स्टार होतो, ती नव्हती. ती एक मॉडेल होती, पण मी आधीच एक प्रसिद्ध अभिनेता होतो."























