एक्स्प्लोर

Munawar Faruqui : डोंगरीतील चाहत्यांच्या गर्दीबाबत मुन्नवर फारुकीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला

Munawar Faruqui : छोट्या पडद्यावरिल बिग बॉस 17 (Big Boss 17) या रिअॅलिटी शोचा मुन्नवर फारुकी (Munawar Faruqui) हा विजेता ठरला. बॉलिवूड अभिनेता सलमान खानकडून (Salman Khan) त्याला विजयी घोषित करण्यात आल्यानंतर तो ट्रॉफी घेऊन डोंगरीत पोहोचला.

Munawar Faruqui : छोट्या पडद्यावरिल बिग बॉस 17 (Big Boss 17) या रिअॅलिटी शोचा मुन्नवर फारुकी (Munawar Faruqui) हा विजेता ठरला. बॉलिवूड अभिनेता सलमान खानकडून (Salman Khan) त्याला विजयी घोषित करण्यात आल्यानंतर तो ट्रॉफी घेऊन डोंगरीत पोहोचला. यावेळी मुन्नवरला शुभेच्छा देण्यासाठी आणि त्याच्या स्वागतासाठी डोंगरीत चाहात्यांची मोठी गर्दी जमली होती. बॉलिवूडचा किंगखान शारुख बाहेर पडल्यानंतर चाहते त्याला पाहण्यासाठी गर्दी करतात. त्याप्रमाणे मुन्नवरलाही लोकांचे प्रेम मिळाले. दरम्यान, डोंगरीत जमलेल्या गर्दीबाबत मुन्नवर फारुकीने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाला मुन्नवर फारुकी?

शारुख खानला पाहण्यासाठी जशी गर्दी जमते. तशीच गर्दी तुला पाहण्यासाठी जमली होती. त्याबद्दल तुला काय वाटतं? असा सवाल फारुकीला विचारण्यात आला होता. यावर प्रत्युत्तर देताना मुन्नवर म्हणाला, "मी बिग बॉस 17 चा खिताब जिंकला होता त्यामुळे गर्दी झाली. शारुख भाई रोज आले तरीही एवढीच गर्दी जमेल. आमच्यात कधीही तुलना शक्य नाही. मात्र, हे लोकांचे प्रेम आहे. पण शारुखसोबत कोणी मला 1 टक्क्याने जरी तुलना करत असेल तर माझं आयुष्य सफलतेकडे जात आहे, असे मी समजेन."

मुन्नवरच्या चाहत्याविरोधात दाखल पोलिसांत तक्रार

बिग बॉस 17 चा विजेता मुन्नवर फारुकी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुन्नवरचा चाहता युसूफ खान यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आलाय. मुंबई पोलीस आयुक्तांच्या परवानगीशिवाय ड्रोनचा वापर करता येत नाही. मात्र, मुन्नवरच्या चाहत्यांकडून ड्रोनचा वापर करण्यात आला. त्यामुळेच हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी ड्रोनवर नजर ठेवली होती. पोलिसांनी ड्रोन हाताळणाऱ्या व्यक्तीचा शोध देखील घेतला. 

मुन्नवरला ट्रॉफी आणि 50 लाखांचे बक्षीस मिळाले

मुन्नवर फारुकीला बिग बॉस 17 चा खिताब जिंकल्यानंतर 50 लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले होते. तसेच त्याला एक कार देखील बक्षीस म्हणून मिळाली होती. 28 जानेवारीला मुनव्वरचा वाढदिवस होता.  मुनव्वर फारुकीला वाढदिवशी चाहत्यांनी मोठं गिफ्ट मिळालं. त्याला बिग बॉस 17 या कार्यक्रमाची ट्रॉफी सलमान खानच्या हस्ते देण्यात आली होती. 

 

Credit - Viral Bhiyani

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

इतर महत्वाच्या बातम्या 

Salman Khan Out From No Entry 2 : 'नो एन्ट्री 2' मधून भाईजान सलमानचा पत्ता कट, 'या' 3 अभिनेत्यांना मिळाली संधी

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून हतकडी सोडली अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून हतकडी सोडली अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून हतकडी सोडली अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून हतकडी सोडली अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Sunil Tatkare : आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
ZP शाळेतील शिक्षकाविरुद्द तक्रार, पोक्सोअंतर्गत गुन्हा; शिक्षणाधिकाऱ्यानं केलं निलंबित
ZP शाळेतील शिक्षकाविरुद्द तक्रार, पोक्सोअंतर्गत गुन्हा; शिक्षणाधिकाऱ्यानं केलं निलंबित
Embed widget