एक्स्प्लोर

Mira Velankar : 'तो' सीन करताना भूमिकेत आहे हेच विसरुन गेले, शिवा मालिकेतील 'सिताई'ने सांगितला आईपणाचा अनुभव

Mira Velankar : शिवा या मालिकेत सीताईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मीरा वेलणकरने नुकतच तिच्या आयुष्यातल्या आईपणाचा एक गोड अनुभव सांगितला आहे. 

Mira Velankar : प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं स्थान हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आणि गरजेचं असतं. मुलासाठी असणारं आईचं हळवं मन याची प्रत्येकालाच कल्पना आहे. खऱ्या आयुष्यात असो किंवा मालिकांमध्ये आई आणि मुलांमधील कोणताही हळवा क्षण पाहताना कोणाच्याही डोळ्यात आपसूकच पाणी येतं. असाच एक अनुभव एका मराठी अभिनेत्रीने (Marathi Actress) शेअर केला आहे. 

येत्या 12 मे रोजी मातृदिन साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने झी मराठी वाहिनीवरील शिवा या मालिकेत सिताईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मीरा वेलणकरने तिच्या आईपणाचा अनुभव सांगितला आहे. मालिकेच्या एका सीनदरम्यान मी विसरुनच गेले की भूमिकेत आहे, असं या अभिनेत्रीने सांगितलं. त्याचप्रमाणे खऱ्या आयुष्यातीलही आईपणाचा अनुभव या अभिनेत्रीने यावेळी शेअर केला आहे. 

'तो सीन करताना माझ्या मनाची खूप चलबिचल झाली'

मीरा वेलणकरने सांगितलं की, शिवा मालिकेत मी आशुची आई आहे. त्यामध्ये त्याचं आणि माझं नातं खूपच प्रेमळ आहे. माझा मुलगा फक्त 12 वर्षांचाच आहे. शिवा' मालिकेच्या  निम्मिताने मला कळेल की मला पुढे जाऊन कसं  वागायला हवे आणि कसं नाही. यानिमित्ताने मालिकेच्या शुटींगदरम्यानचा एक किस्सा सांगते. कारण एकदा तुम्ही आई झालात की तुमच्यात एक प्रेमभावना असते, मग ते ऑनस्क्रीन मुलगा असो किंवा खरा मुलगा.त्यादिवशी आम्ही एक सीन करत होतो जिथे आशु रात्रभर घरी आलेला नसतो. आई म्हणून मी अत्यंत काळजीत असते मग अचानक तो घरी येतो मी त्याला पाहते आणि रडायलाच लागते. तेव्हा माझ्या मनात हे चालू होतं की खऱ्या आयुष्यात जर माझा मुलगा घरी आला नाही तर मी काय करेन. त्या विचाराने शॉट देता देता माझं डोळे पाणावले. तो सीन करताना माझ्या मनाची खूप चलबिचल झाली.

त्यावेळी मला समजलं संयम किती महत्त्वाचा आहे - मीरा वेलणकर

मीराने पुढे म्हटलं की, माझा मुलगा जन्माला आला तेव्हा सुरवातीचे काही दिवस माझ्या डोक्यात हाच विचार चालू असायचा की त्याने खाल्लं का, त्याची अंघोळ झाली का, त्याला आता भूक लागली असेल का?  ह्या सर्वामध्ये मी हे विसरून जायचे  की माझी विश्रांती झाली आहे की नाही. हे सगळं फक्त आईपण अनुभवल्यावरच होऊ शकत. कुठली ही गोष्ट असो ती अभ्यासपूर्व करायची अशी माझी पद्धत आहे म्हणून मी गरोदर असताना प्रेग्नन्सी, पोस्ट-प्रेग्नन्सी, मुलाचं संगोपन, मुलाचा विकास  ह्या सगळ्याची खूप पुस्तक वाचली होती खूप माहिती होती पण जेव्हा मी खऱ्या अर्थानी आई झाले तेव्हा कळले की ती माहिती आहे,  अनुभव नाही. माझा मुलगा खूप लाजाळू आणि अंतर्मुख होता त्याला शाळेत आणि लोकांशी रमायला वेळ लागायचा आणि ह्यामुळे मी तिथे असणं अपरिहार्य असायचं, मी कधी-कधी थकून जायचे  त्यावेळी मला समजले की संयम किती महत्वाचं आहे

आईचेही मानले आभार

मातृदिनानिमित्तान मीराने तिच्या आईचे देखील आभार मानले आहेत. यावर तिने म्हटलं की, आई म्हणून माझ्या हे लक्षात आलं  की माझ्या मुलाचा स्वभाव वेगळा आहे आणि मी ते स्वीकारले तेव्हा त्याच्यातला ही बदल मला दिसू लागला आता त्याच्याकडे पाहून कोणी म्हणणार नाही की तो अंतर्मुख होता इतका उस्फुर्त मुलगा आहे. आम्ही तिघी बहिणी, माझी आई शिक्षिका होती आणि ती घर आणि काम दोनी सांभाळायची ती माझी हिरो आहे. मी तिला इतकच बोलू शकते खूप खूप धन्यवाद कारण ती जे करू शकली ती एक सुपरवुमनच करू शकते. 

ही बातमी वाचा : 

Amol Kolhe : पुढील पाच वर्षे अभिनयातून ब्रेक, अमोल कोल्हेंचं स्पष्टीकरण; 'मालिका नाही पण महानाट्य करणार'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 17 January 2025Baramati Father Killer Son : बापच उठला लेकराच्या जीवावर! 9 वर्षाच्या चिमुरड्याची बापाकडून हत्याWalmik Karad Special Report :कोट्याधीश कराड, पुण्यात घबाड; कराडच्या संपत्तीमुळे ईडीची एन्ट्री होणार?Saif Ali Khan Special Report : सैफ, सेफ आणि सवाल; सैफवरील हल्ल्याचंही राजकारण सुरु

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget