युझवेंद्र-धनश्रीच्या घटस्फोटाची चर्चा, उर्फी मात्र चांगलीच भडकली; म्हणाली प्रत्येक वेळी महिलाच...
गेल्या काही दिवसांपासून युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्या नात्याची चर्चा चालू आहे. त्यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं म्हटलं जातंय.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपटू युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्या घटस्फोटाची चर्चा चालू आहे. दोघांमध्ये बिनसलं असून लवकरच ते विभक्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावर व्यक्त होताना दोघेही एकमेकांचा उल्लेख टाळत आहेत. दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं आहे. असं असतानाच या दोघांच्या कथित घटस्फोटाच्या चर्चांवर आपल्या अनोख्या कपड्यांमुळे लाईमलाईटमध्ये असणारी उर्फी जावेद मात्र चांगलीच भडकली आहे. तिने यझवेंद, धनश्री यांचे थेट नाव घेऊन ट्रोलर्स आणि धनश्रीला दोष देणाऱ्यांची कानउघडणी केली आहे.
धनश्री वर्णाची केली पाठराखण
सध्या युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचं नातं सगळीकडे चर्चेचा विषय ठारलाय. त्यांच्याविषयी सोशल मीडिया तसेच माध्यमांत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. यावरच उर्फी जावेदने आपलं मत व्यक्त केलंय. तिने इन्टाग्रामवर एका स्टोरीच्या माध्यमातून या प्रकरणात धनश्री वर्माची पाठराखण केली आहे. नेमकं काय घडलंय? याची पुरेशी कल्पना नसताना नेहमी महिलांनाच जबाबदार का धरलं जातं? अस जळजळीत सवाल तिने केलाय.
उर्फी जावेदच्या इन्स्टा स्टोरीमध्ये नेमकं काय होतं?
उर्फी जावेदने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये तिने एक स्क्रिनशॉट अपलोड केला होता. सोबतच इंग्रजी भाषेत तिचं मत व्यक्त केलं होतं. 'जेव्हा कधी एखादा क्रिकेटपटू ब्रेकअप करतो किंवा घटस्फोट घेण्याचा निर्णय घेता तेव्हा प्रत्येक वेळी महिलेलाच छळलं जातं. तिलाच दोष दिला जातो. क्रिकेट खेळणारा क्रिकेटपटू हा आपला हिरो आहे, असं आपल्या डोक्यात असल्यामुळे हे सर्वकाही केलं जातं. युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यात नेमकं काय घडलंय, याची कोणालाही कल्पना नाही. हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यातही नेमकं काय घडलं होतं, याची आपल्याला कल्पना नाही. मात्र फक्त महिला असणं हा नताशा आणइ धनश्री यांची चूक आहे. त्यामुळेच त्यांना दोषी ठरवलं जातंय,' असं मत तिने मांडलंय.
महिलाच जबाबदार असते का?
तसेच, विराट कोहली क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करू शकत नव्हता. त्या काळातही त्याची पत्नी अनुष्का शर्मालाच लोक दोषी ठरवत होते. त्यामुळे पुरुषाच्या अपयशामागे किंवा पुरुषाच्या कोणत्याही कृतीमागे महिलाच जबाबदार असते का? वर उल्लेख केलेले सर्व पुरुष हे चांगले शहाणे आहेत. त्यांचा मेंदूदेखील चांगला कार्यरत आहे. आपण काय करतोय, हे त्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे महिलांना दोष देण्यात अर्थ नाही, असंही उर्फी जावेद म्हणाली आहे.
दोघांनीही सोशल मीडियावर मांडली भूमिका
दरम्यान, माध्यमात धनश्री आणि युझवेंद्र यांचं बिनसल्याच्या बातम्या आल्यानंतर या दोघांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काहीही माहीत नसताना माझी प्रतीमा मलीन केली जात आहे, असं धनश्रीने म्हटलंय. तर कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असं युझवेंद्रने आवाहन केलंय. त्यामुळे आगामी काळात यांच्या नात्यात नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हेही वाचा :