(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BookMyShow वर तिकीट भ्रष्टाचार, वेळीच आवरा नाहीतर 'हॉट प्ले' बघायला मिळेल; COLD PLAY च्या कॉन्सर्टवरुन मनसे आक्रमक
COLD PLAY कॉन्सर्टवरुन मनसे आता आक्रमक झाल्याचं पाहायाल मिळत आहे. तसेच मनसेकडून BookMyShow ला इशारा देखील देण्यात आलाय.
COLD PLAY Concert in Mumbai : COLD PLAYसध्या मुंबईत एका कॉन्सर्टची तुफान चर्चा सुरु आहे. मुंबईत जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या या कॉन्सर्टची तिकीटं आता हाऊसफुल्ल झाल्याचं चित्र आहे. मुंबईत लवकरच COLD PLAY चा कॉन्सर्ट पार पडणार आहेत. 18 जानेवारी 2025 ते 21 जानेवारी 2025 असा हा कॉन्सर्ट पार पडणार आहे. पण त्या कॉन्सर्टला जाण्यासाठी जवळपास संपूर्ण देशातून लोकं इच्छुक असल्याचं चित्र आहे. असं असलं तरीही या कॉन्सर्टवरुन मनसे (MNS) मात्र आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.
दरम्यान या COLD PLAY च्या कॉन्सर्टवरुन मनसे सध्या आक्रमक झाल्याचं चित्र आहे. कारण या कॉन्सर्टच्या तिकीटाचा भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय. मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत BookMyShowला इशारा देखील दिला असल्याचं पाहायला मिळतंय.
अमेय खोपकरांचं ट्विट काय?
अमेय खोपकरांनी BookMyShow वर आरोप करत म्हटलं की, BookMyShow चा भ्रष्टाचार ???जगविख्यात COLD PLAY concert ची तिकिटं काढण्यासाठी लाखो तरूण मोबाईल, लॅपटॉप घेऊन बसले असताना कुणालाही तिकीट मिळत नाही आणि Viagogo सारख्या platforms वर Black market मधे लाखो रूपयांना विकली जातात ??? खुले आम चाललेल्या या भ्रष्टाचाराला वेळीच आळा घाला आणि तरूणांना न्याय द्या. नाहीतर पुन्हा आम्हाला उतरावं लागेल आणि ColdPlay च्या जागी HotPlay बघायला लागेल !!!
BookMyShow चा भ्रष्टाचार ???
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) September 23, 2024
जगविख्यात COLD PLAY concert ची तिकिटं काढण्यासाठी लाखो तरूण मोबाईल, लॅपटॉप घेऊन बसले असताना कुणालाही तिकीट मिळत नाही आणि Viagogo सारख्या platforms वर Black market मधे लाखो रूपयांना विकली जातात ???
खुले आम चाललेल्या या भ्रष्टाचाराला वेळीच आळा घाला आणि…
ColdPlayचा कॉन्सर्ट पाहण्यासाठी बरेच तरुण इच्छुक आहेत. कारण हा एक इंटरनॅशनल बँड असून त्यांची सध्या वर्ल्ड टूर सुरु आहे. त्यांचा भारत दौरा हा जानेवारीमध्ये होणार असून 18 ते 21 जानेवारीदरम्यान हा कॉन्सर्ट भारतात होणार आहे. पण त्याच्या तिकीटाचे दर हे अधिक असल्यामुळे त्यामध्ये काळाबाजार होत असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आलाय. यावर आता BookMyShow काही पावलं उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.