एक्स्प्लोर

'आता कानाखालीच वाजवावी लागेल', Indian Idol मध्ये अलिबागसंदर्भात टिप्पणी, मनसे आक्रमक

रविवारी झालेल्या कार्यक्रमात आदित्य नारायणने अलिबाग से आया हूं क्या.. अशा अर्थाची टिप्पणी केली. साहजिकच यामुळे अलिबागकर नाराज झाले आहेत. याची दखल मनसे चित्रपट सेनेच्या अमेय खोपकर यांनी घेतली

मुंबई : इंडियन आयडॉलचा सध्याचा नवा सीझन सातत्याने चर्चेत येतो आहे. काही दिवसांपूर्वी किशोरकुमार यांच्या गाण्यावर झालेल्या शोबद्दल अमितकुमार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर या स्पर्धेचा पहिला विजेता अभिजीत सावंत यानेही सध्या हा शो गाण्यापेक्षा प्रेमप्रकरणावर जास्त केंद्रित झाल्याची टीका केली होती. आता या शोचा होस्ट आदित्य नारायणच्या एका टिप्पणीने पुन्हा एकदा नवा वाद उद्भवला आहे. 

सध्या या शोचं चित्रिकरण दमण इथे सुरू आहे. रविवारी झालेल्या कार्यक्रमात आदित्य नारायणने अलिबाग से आया हूं क्या.. अशा अर्थाची टिप्पणी केली. साहजिकच यामुळे अलिबागकर नाराज झाले आहेत. याची दखल मनसे चित्रपट सेनेच्या अमेय खोपकर यांनी घेतली आणि त्यांनी तातडीने फेसबुक लाईव्ह करवी काही गोष्टी सांगितल्या. या लाईव्हमध्ये ते बोलल्यानुसार त्यांनी या शोबद्दल नाराजी व्यक्त केली. इतकंच नव्हे, तर ज्या मंचावरून हे वाक्य बोललं गेलं, त्याच मंचावरून त्याची माफीही मागितली गेली पाहिजे असा आग्रह धरला आहे. या लाईव्हमध्ये खोपकर यांनी आपलं बोलणं आदित्य यांचे वडील प्रख्यात गायक उदित नारायण यांच्याशीही झाल्याचं सांगितलं आहे. 

याबद्दल माहिती देताना खोपकर म्हणाले, आदित्यच्या या वाक्याबद्दल मी उदित नारायण यांच्याशी बोललो आहे. गेल्या काही महिन्यांपासून आदित्यच्या अनेक तक्रारी येऊ लागल्या असल्याची कल्पना मी त्यांना दिली आहे. आपल्या मुलाला त्यांनी तशी कल्पना द्यावी याबद्दलही हे बोलणं झालं असल्याची माहीती त्यांंनी दिली. शिवाय, अलिबागकरांचा हा अपमान यापूर्वीही झाला आहे. वारंवार याबद्दल कल्पना देऊनही अलिबागकरांचा अपमान केला जातो आहे. आधी विनंती मग ताकीद आणि शेवटी कानाखाली आवाज अशी आपल्या कामाची पद्धत असते. आता पहिल्या दोन गोष्टी आपण केलेल्या आहेत. यापुढे असं काही झालं तर थेट कानाखालीच वाजवली जाईल याची नोंद सर्वांनी घ्यावी असा इशाराही खोपकर यांनी दिला. 

अलिबागकरांना यामुळे नाहक मनस्ताप झाला आहे याची कल्पना आपल्याला असून आपल्याला जे शक्य आहे ते आपण करू याची ग्वाहीही खोपकर यांनी दिली आहे.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Republic Day 2026 Maharashtra Tableau: प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ, पहिली झलक, गणपती बाप्पाचं दर्शन
प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ, पहिली झलक, गणपती बाप्पाचं दर्शन
Mumbai Crime Malad Railway station: धक्का लागल्याचा राग आला, कॉलेज प्रोफेसरला पोटात चाकू खुपसून संपवलं, मालाड रेल्वे स्टेशनवरची धक्कादायक घटना
धक्का लागल्याचा राग आला, कॉलेज प्रोफेसरला पोटात चाकू खुपसून संपवलं, मालाड रेल्वे स्टेशनवरची धक्कादायक घटना
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
Maharashtra Live blog: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन परतले, 30 लाख कोटींचे सामंजस्य करार
Maharashtra Live blog: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन परतले, 30 लाख कोटींचे सामंजस्य करार

व्हिडीओ

Special Report Greenland : ग्रीनलँडवर अमेरिकेची वक्रदृष्टी का? काय आहे ग्रीनलँडचा इतिहास?
Ladki bahin Yojana : लाडकी बहीण योजनेशी संबंधित तक्रारीचे निवारण करण्यासाठी हेल्पलाईन
Sanjay Raut PC :  राजकारणात गुलामांचा बाजार, अजितदादांना महायुतीतून बाहेर पडावं लागणार- संजय राऊत
Kamal Khan News : ओशिवरा गोळीबारप्रकरणी अभिनेता कमाल खान अटकेत, नेमकं प्रकरण काय?
Nashik Currency : खळबळजनक! 2 हजारांच्या नोटांनी भरलेला 400 कोटींचा कंटेनर लूटला!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Republic Day 2026 Maharashtra Tableau: प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ, पहिली झलक, गणपती बाप्पाचं दर्शन
प्रजासत्ताक दिनी दिल्लीच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ, पहिली झलक, गणपती बाप्पाचं दर्शन
Mumbai Crime Malad Railway station: धक्का लागल्याचा राग आला, कॉलेज प्रोफेसरला पोटात चाकू खुपसून संपवलं, मालाड रेल्वे स्टेशनवरची धक्कादायक घटना
धक्का लागल्याचा राग आला, कॉलेज प्रोफेसरला पोटात चाकू खुपसून संपवलं, मालाड रेल्वे स्टेशनवरची धक्कादायक घटना
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
डोळ्यावर गॉगल, डोक्यावर देवानंदसारखी कॅप; शरद पवारांचे साथीदार 82 व्या वर्षी ZP निवडणुकांच्या प्रचारात
Maharashtra Live blog: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन परतले, 30 लाख कोटींचे सामंजस्य करार
Maharashtra Live blog: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरुन परतले, 30 लाख कोटींचे सामंजस्य करार
Sanjay Raut : मुंबईचा भूमिपुत्र ठाकरेंसोबत राहिला, विरोधी बाकावर 100 पेक्षा जास्त नगरसेवक असणं सत्ताधाऱ्यांना आव्हान : संजय राऊत
भाजपची प्रवृत्ती सहकाऱ्यांवर तलवार चालवण्याची, आम्ही त्यातून कसे बसे निसटलो : संजय राऊत
Mauni Roy: वृद्ध अंकलचे अश्लील चाळे, कमरेवर हात .. लाईव्ह कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
वृद्ध अंकलचे अश्लील चाळे, कमरेवर हात .. लाईव्ह कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्रीसोबत गैरवर्तन, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
Prithviraj Chavan : दावोस दौऱ्यावर टीका करणे अयोग्य, पण अदानी, लोढांसारख्या स्थानिक कंपन्याबरोबर करार हा एक क्रूर विनोद; पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका
दावोस दौऱ्यावर टीका करणे अयोग्य, पण अदानी, लोढांसारख्या स्थानिक कंपन्याबरोबर करार हा एक क्रूर विनोद; पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका
America : भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
भारतावर रशियन तेल खरेदीमुळं लादलेलं 25 टक्के टॅरिफ रद्द होण्याची शक्यता, अमेरिकेकडून मोठे संकेत
Embed widget