एक्स्प्लोर

राज ठाकरेंसमोर अर्जुन कपूरचं 'जय महाराष्ट्र', रोहित शेट्टीने सांगितलं सिनेमाचं मराठीपण; 'मनसे'च्या दीपोत्सवाला 'सिंघम 3च्या' टीमची हजेरी

MNS Dipostav : मनसेकडून दादरमधील शिवाजी पार्क परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सिंघम 3च्या टीमने हजेरी लावली.

MNS Dipostav :  दादरमधील शिवाजी पार्क (Shivaji Park) परिसरामध्ये मागील अनेक वर्षांपासून मनसेकडून (MNS) दीपोत्सवाचं आयोजन केलं जातं. मनसेकडून संपूर्ण शिवाजी पार्क परिसरात रोषणाई केली जाते. या दीपोत्सावाचा शुभारंभ दिवाळीच्या पहिल्या दिवशी करण्यात आला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि सिंघम-3च्या (Singham) संपूर्ण टीमने हजेरी लावली होती. राज ठाकरे यांच्यासह रोहित शेट्टी, अजय देवगण, टायगर श्रॉफ आणि अर्जून कपूर हे कलाकार उपस्थित होते. 

रोहित शेट्टीचा सिनेमा मराठमोळाच असतो - राज ठाकरे

राज ठाकरेंनी यावेळी सिनेमाला शुभेच्छा देताना म्हटलं की, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा. आज दिवाळीचा पहिला दिवस आणि 1 तारखेला सिनेमा येतोय. त्या सिनेमाविषयी तुम्हाला सांगायची गरज नाही. आज अजय देवगण, आपल्यासमोर एक सिंह आलेलाच आहे. रोहित शेट्टी यांचा सिनेमा म्हटल्यावर तो मराठमोळाच सिनेमा असतो हे आपल्याला माहितेय. या शिवाजी पार्कच्या मराठमोळ्या वातावरणामध्ये सिंघमची सगळी टीम इकडे यावी अशी माझी मनापासून इच्छा होती. ते सगळेजण इथे आले यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे. 

माझा सिनेमा मराठीच असतो - रोहित शेट्टी

रोहित शेट्टीने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, माझा सिनेमा मराठीच असतो फक्त त्यात कलाकार हिंदी असतात.. सिंघमवर तुम्ही भरभरुन प्रेम केलंय. आता त्याचा तिसरा भागही येतोय त्यावरही भरभरुन प्रेम करा...

अर्जुन कपूरकडून जय महाराष्ट्र!

अर्जुन कपूरने म्हटलं की, तुमच्या सगळ्यासाठी हा सिनेमा बनवला आहे. त्यामुळे थिएटरमध्ये जाऊन तो पहा. राज साहेब खूप आभार तुम्ही आम्हाला इथे बोलावलंत. मराठी बोलायचा विचार करुन आलो होतो पण शब्दच सुचत नाहीयेत. पण पुढच्या वेळी येईन तेव्हा नक्की मराठीतच बोलेन.. तोपर्यंत जय महाराष्ट्र..

अजय देवगणने मराठी बोलणं टाळलं

दरम्यान यावेळी अजय देवगणने मराठी बोलणं टाळलं. त्याचप्रमाणे दीपोत्सवासाठी आमंत्रित केल्याबद्दल राज ठाकरेंचेही आभार मानले. त्याने म्हटलं की, 'मी थोडं तोडकं मोडकं मराठी बोललो तर घरीही मला शिव्या पडतील. राजसाहेब खूप धन्यवाद त्यांनी आम्हाला इथे बोलावलं. तुम्ही सगळ्यांनीही सिंघम बघा आणि कसा वाटला ते कळवा.. '

ही बातमी वाचा : 

Mirzapur The Film: प्रीक्वल, सिक्वेल अन् स्पिन-ऑफ! मोठ्या पडद्यावर 'मिर्झापूर'ची गोष्ट काय असणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 18 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सShashikant Shinde meet Ajit Pawar : नागपुरातील निवासस्थानी शशिकांत शिंदे-अजित पवार भेटTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 18 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :18 डिसेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPO : पैसे तयार ठेवा...अमेरिकन कंपनीची भागिदारी असलेल्या कंपनीचा 1600 कोटींचा आयपीओ येणार, कमाईची मोठी संधी
IPO: पैसे तयार ठेवा, 1600 कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना मोठी संधी
Sanju Samson : चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
चुकीला माफी नाही....! संजू सॅमसनला एकदिवसीय संघातून दाखवला बाहेरचा रस्ता; नेमकं काय घडलं? 
Ajit Pawar : दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
दोन दिवसांपासून गायब असलेले अजितदादा अधिवेशनात भाग घेणार, दिल्ली दौरा नव्हे तर 'हे' मोठं कारण समोर
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
महायुतीचे खातेवाटप ठरलं! 'अर्थ' अजितदादांना तर शिंदेंच्या शिवसेनेच्या खात्यात बदल, गृहखात्यासह महत्त्वाच्या खात्यांवर भाजपचा वरचष्मा, सूत्रांची माहिती
Ind vs Aus 3rd Test : पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
पहिल्या डावात टीम इंडिया 260 धावांवर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियाकडे 185 धावांची आघाडी, तरीही तिसरी कसोटी होणार रद्द?
IPO : MobiKwik, विशाल मेगा मार्ट, साई लाइफ सायन्सेसचे आयपीओ लिस्ट होणार, गुंतवणूकदार मालामाल होणार,GMP कितीवर? 
शेअर बाजारात 3 मेनबोर्ड आयपीओचं लिस्टिंग, गुंतवणूकदार मालामाल होणार, GMP कितीवर?
EPFO :पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, व्याजदराबाबत नवी अपडेट, ईपीएफओ मोठ्या निर्णयाच्या तयारीत 
मोठी बातमी, पीएफ खातेदारांना दिलासा मिळणार, व्याजदराबाबत मोठी अपडेट, ईपीएफओची विशेष रणनीती
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
SBI बँकेत मोठी भरती, 13735 जागांसाठी निघाली जाहिरात; लगेच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स
Embed widget